श्रम आणि रोजगार मंत्रालय
नोव्हेंबर 2022 मध्ये कर्मचारी राज्य विमा योजनेअंतर्गत (ईएसआय) 18.86 लाख नवीन कामगार जोडले गेले
Posted On:
20 JAN 2023 7:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जानेवारी 2023
कर्मचारी राज्य विमा योजनेअंतर्गत (ईएसआय) नोव्हेंबर 2022 महिन्याचा तात्पुरता वेतनपट आज जारी करण्यात आला. या तात्पुरत्या वेतनपटाच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर 2022 मध्ये कर्मचारी राज्य विमा योजनेअंतर्गत (ईएसआय) 18.86 लाख नवीन कामगार जोडले गेले.
वेतनपटाच्या वर्षागणिक केलेल्या तुलनेत असे आढळून येते की गेल्या वर्षी 2021 मधील याच महिन्याच्या तुलनेत निव्वळ सदस्यांच्या संख्येत नोव्हेंबर, 2022 मध्ये 5.24 लाखांनी वाढ झाली आहे. या आकडेवारीनुसार आपल्या कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणाऱ्या कर्मचारी राज्य विमा महामंडळात नोव्हेंबर, 2022 मध्ये 21,953 नवीन आस्थापनांची नोंद झाली आहे. नोंदणी केलेल्या या 18.86 लाख नवीन सदस्यांपैकी 18-25 वयोगटातील सदस्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे अंदाजे 8.78 लाख सदस्य आहे. यावरून असे दिसून येते की देशातील युवकांना उत्तम रोजगाराच्या संधी मिळत आहेत. वेतनश्रेणीच्या डेटाचे लिंगनिहाय विश्लेषण दर्शविते की नोव्हेंबर, 2022 मध्ये महिला सदस्यांची एकूण नोंदणी 3.51 लाख इतकी होती. या शिवाय नोव्हेंबर महिन्यात एकूण 63 तृतीयपंथी कर्मचार्यांनी ईएसआय योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे, असे आकडेवारीत आढळले आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) आपल्या योजनांचा लाभ समाजातील सर्व घटकांना करून देते, हे यावरून निदर्शनास येते. वेतनपट डेटा तयार करणे निर्मिती ही एक सातत्यपूर्ण क्रिया असल्याने ही वेतनपट आकडेवारी तात्पुरत्या स्वरूपाची आहे.
R.Aghor/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1892557)
Visitor Counter : 173