पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी महाराष्ट्रात मुंबई मेट्रोच्या गुंदवली ते मोगरा स्थानकांदरम्यान मेट्रोमधून केला प्रवास


मुंबई 1 मोबाईल ॲप आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचा पंतप्रधानांनी केला शुभारंभ

प्रविष्टि तिथि: 19 JAN 2023 9:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जानेवारी 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत मेट्रो रेल्वेच्या गुंदवली ते  मोगरा या स्थानाकांदरम्यान मेट्रो गाडीमधून प्रवास केला. त्यांनी मुंबई 1 मोबाईल ॲप आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (मुंबई 1) चा शुभारंभ केला, आणि या वेळी आयोजित मेट्रो फोटो प्रदर्शन आणि त्रिमिती मॉडेलला भेट दिली. मेट्रोच्या प्रवासादरम्यान पंतप्रधानांनी विद्यार्थी, दैनंदिन प्रवासी आणि मेट्रोच्या बांधकामात सहभागी असलेल्या श्रमिकांशी संवाद साधला.

यावेळी पंतप्रधानांबरोबर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते.

पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट केले आहे:

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई मेट्रो मध्ये.

त्यापूर्वी आज पंतप्रधानांनी मुंबई मेट्रो रेल्वे मार्गिका 2अ आणि 7 चे लोकार्पण केले, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा पुनर्विकास प्रकल्प आणि सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची  पायाभरणी केली, 20 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे उदघाटन केले, आणि मुंबईमधील सुमारे 400 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरण प्रकल्पाची सुरुवात केली.

पार्श्वभूमी

पंतप्रधानांनी मुंबई 1 मोबाईल अॅप आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (मुंबई 1) चा शुभारंभ केला. या अॅपमुळे प्रवास सुलभ होईल, मेट्रो स्थानकांच्या प्रवेशद्वारावर ते दाखवता येईल आणि त्याच्या मदतीने युपीआय (UPI) द्वारे तिकीट खरेदी करता येईल. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (मुंबई 1) सुरुवातीला मेट्रो कॉरिडॉरमध्ये वापरता येईल, आणि त्यानंतर उपनगरी रेल्वे आणि बसेस यासह अन्य सार्वजनिक परिवहन सेवांसाठीही त्याचा विस्तार केला जाईल. प्रवाशांना अनेक कार्ड्स अथवा रोख रक्कम बाळगावी लागणार नाही, एनसीएमसी कार्ड जलद, संपर्करहित, डिजिटल व्यवहार पुरवेल, ज्यामुळे अखंड अनुभवाची प्रक्रिया सुलभ होईल.

 

 

 

 

 

 

 

R.Aghor/R.Agashe/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1892341) आगंतुक पटल : 266
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Bengali , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam , Malayalam