संरक्षण मंत्रालय

यंदाच्या प्रजासत्ताक दिन समारंभाचा एक भाग म्हणून अनेक नव्या कार्यक्रमांचे आयोजन

Posted On: 18 JAN 2023 9:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जानेवारी 2023

 

26 जानेवारी 2023 रोजी भारत 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करेल. त्यात पारंपरिक कार्यक्रमांबरोबर अनेक नवीन कार्यक्रमांची रेलचेल आहे. दिल्लीतील कर्तव्यपथावर सशस्त्र दल आणि निमलष्करी दलाच्या तुकड्या भव्य पारंपरिक मार्च पास्ट  करतील. त्याव्यतिरिक्त राज्ये आणि केंद्रीय मंत्रालये/विभागांद्वारे देशाच्या संस्कृतीचे दर्शन घडवून आणण्यासाठी चित्ररथांच्या माध्यमातून एक झलक; मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम; विजय चौकात बिटिंग द रिट्रीट समारंभ, अॅक्रोबॅटिक मोटरसायकल राइड आणि फ्लाय-पास्ट तसेच  एनसीसी रॅली अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. संरक्षण सचिव गिरीधर अरमाणे यांनी नवी दिल्ली येथे एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पंतप्रधानांचा लोकसहभागाच्या  दृष्टीकोन प्रतिबिंबित करण्यासाठी सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाचा सोहळा 23 जानेवारी रोजी म्हणजे महान राष्ट्रीय आयकॉन नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी सुरू होईल आणि 30 जानेवारी रोजी, शहीद दिनाच्या दिवशी या सोहळ्याचा समारोप होईल. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेल्या दिग्गजांना, लोकांना आणि आदिवासी समुदायांना अभिवादन करण्यासाठी हा सोहळा आयोजित केला आहे.

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचा एक भाग म्हणून अनेक नवीन कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. यामध्ये लष्करी टॅटू आणि आदिवासी नृत्य महोत्सव; वीर गाथा 2.0; वंदे भारतम नृत्य स्पर्धेची दुसरी आवृत्ती; नॅशनल वॉर मेमोरियल येथे सैन्य आणि तटरक्षक बँडचे प्रदर्शन; एनडब्ल्यूएम येथे अखिल भारतीय शालेय बँड स्पर्धा; बीटिंग द रिट्रीट सोहळ्यादरम्यान ड्रोन शो आणि प्रोजेक्शन मॅपिंग यांचा समावेश आहे.

खास निमंत्रित

यावर्षीच्या कार्यक्रमांसाठी सेंट्रल व्हिस्टा, कर्तव्य पथ, नवीन संसद भवन यांच्या बांधकामात सहभागी श्रमयोगी तसेच दूध, भाजी विक्रेते आणि रस्त्यावरील विक्रेते अशा समाजातील सर्व स्तरातील सामान्य लोकांना निमंत्रण पाठविण्यात आले आहे. या विशेष निमंत्रितांची आसनव्यवस्था  खास करून कर्तव्य पथावर केली जाणार आहे.

 

 

 

 

N.Chitale/P.Jambhekar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1892071) Visitor Counter : 221