आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेत संशोधन आणि विकास क्षेत्रातील संधी तसेच जीवन विज्ञान क्षेत्रातील नवोन्मेश या विषयावरच्या गोलमेज चर्चेला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविय यांनी केले संबोधित


"औषधांचे शोध आणि नाविन्यपूर्ण वैद्यकीय उपकरणांमध्ये अग्रेसर होण्यासाठी फार्मा-मेडटेक क्षेत्रात नवोपक्रमासाठी सक्षम परिसंस्थेला केंद्र सरकारचे प्रोत्साहन "

Posted On: 18 JAN 2023 7:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जानेवारी 2023

 

"देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेत औषधे आणि वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता, सुलभता आणि किफायतशीरतेची ग्वाही देण्यासाठी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार भारतीय जीवन विज्ञान  जागतिक स्तरावर स्पर्धात्मक क्षेत्र म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे", असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविय यांनी दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेत सांगितले. संशोधन आणि विकास क्षेत्रातल्या संधी तसेच जीवन विज्ञान क्षेत्रातील नवोन्मेश   या विषयावरच्या गोलमेज चर्चेला ते संबोधित करत होते.

परवडणारी आणि सहज उपलब्ध जीवन विज्ञान परिसंस्था स्थापन करणे, जीवन विज्ञान उद्योगातील तफावत ओळखणे, ज्ञानाच्या देवाणघेवाणीच्या संधी वाढवणे, संशोधन आणि विकासात नवकल्पनांना प्रोत्साहन देणे तसेच मजबूत संशोधन आणि विकासासाठी  गुंतवणूकीच्या संधी निश्चित करणे तसेच जीवन विज्ञान उद्योगाची स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी नावीन्यपूर्ण परिसंस्था तयार करणे हा या परिसंवादाचा उद्देश होता.

जागतिक स्तरावर आरोग्यसेवेवर होणारा वाढता खर्च, भारतीय मध्यमवर्गाच्या आकारात झालेली वाढ, सार्वत्रिक आरोग्यसेवेची बांधिलकी आणि आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (पीएम- जय) आणि प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना (पीएमबीजेपी) यासारख्या योजनांकडे लक्ष पुरवल्यामुळे फार्मा आणि मेडटेक क्षेत्रांसाठी मागणीचा मार्ग सातत्याने तयार झाला आहे.

उत्तम उपचारात्मक परिणामांची मागणी, वैयक्तिक निदानातील कल, घरात उपचार , वेअरेबल, टेलीमेडिसिन यामुळे भिन्न उत्पादने आणि सेवा प्रस्तावासाठी वाव निर्माण केला आहे.

या संधीचा लाभ घेण्यासाठी फार्मा-मेडटेक क्षेत्रांना त्यांच्या सुरक्षित कोशातून बाहेर पडण्याचे आणि त्यांच्या व्यवसाय धोरणांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणून नावीन्यपूर्णतेचा अवलंब करण्याचे आवाहन मांडविय यांनी केले. "भारत आता जागतिक स्तरावर जाण्यासाठी आणि उच्च-मूल्य उत्पादनांकडे वळण्यासाठी सज्ज आहे", असे त्यांनी सांगितले.

अत्याधुनिक उत्पादने आणि तंत्रज्ञानाचा देशातच विकास करण्यासाठी तसेच औषध क्षेत्रातील शोध आणि नाविन्यपूर्ण वैद्यकीय उपकरणांमध्ये अग्रेसर होण्यासाठी, या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण परिसंस्थेला चालना देण्यासाठी भारत फार्मा-मेडटेक क्षेत्रातील संशोधन- विकास आणि नाविन्यतेवर  एकत्रित आणि समन्वित प्रयत्न करत आहे.

केंद्र सरकार तीन प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत आहे, असे त्यांनी यासंदर्भात सांगितले:

  1. उत्पादन विकासामध्ये नावीन्य आणि संशोधन सुलभ करण्यासाठी नियामक रचनात्मक चौकट मजबूत करणे.
  2. आर्थिक आणि बिगर -आर्थिक उपायांच्या समन्वयातून नाविन्यपूर्ण गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे, ज्यामुळे फायदेशीर वित्तपुरवठा पर्यायांसह जोखीम घेणे शक्य होईल.
  3. संशोधन- विकास आणि नवोपक्रम क्षेत्रातील शाश्वत वाढीसाठी एक मजबूत संस्थात्मक यंत्रणा म्हणून नाविन्यपूर्ण आणि क्रॉस-सेक्टरल संशोधनाला समर्थन देण्यासाठी एक सुविधा देणारी परिसंस्था तयार करणे.

केंद्रीय मंत्र्यांनी आत्मनिर्भर भारत" साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाचा पुनरुच्चार केला.

संशोधन आणि विकासासाठीच्या पायाभूत सुविधांना बळकट केले तरच भारत औषधनिर्माण आणि वैद्यकीय उपकरणांमध्ये स्वावलंबी बनू शकतो असे त्यांनी सांगितले. त्यामुळे जीवरक्षक औषधे आणि औषधे उपलब्ध होण्याचे प्रमाण वाढेल आणि भारताला जागतिक फार्मास्युटिकल्स आणि वैद्यकीय उपकरणांचे निर्यात केंद्र बनण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

फार्मा-मेडटेक उद्योगांनी त्यांच्या व्यवसाय धोरणांचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणून नावीन्यपूर्णतेचा अवलंब करावा यासाठी मांडवीय यांनी प्रोत्साहन दिले.

 

 

 

 

 

 

 

 

 

N.Chitale/P.Jambhekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1892047) Visitor Counter : 166


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu