शिक्षण मंत्रालय
                
                
                
                
                
                    
                    
                        भारत आणि सिंगापूर नैसर्गिक मित्र, दोन्ही देशांमध्ये शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रात भक्कम बंध- धर्मेंद्र प्रधान
                    
                    
                        
सिंगापूरच्या नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या शिष्टमंडळाने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घेतली भेट 
                    
                
                
                    Posted On:
                18 JAN 2023 5:42PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 18 जानेवारी 2023
ठळक मुद्दे :
	- यावेळी झालेल्या चर्चेत, शिक्षण क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करणे, त्यातही नवोन्मेषाचे लोकशाहीकरण, उद्यमशीलतेला प्रोत्साहन आणि युवकांसाठी अधिक संधी निर्माण करणे, यावर भर देण्यात आला.
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्याविकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज सिंगापूरच्या नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठाच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. सिंगापूर उच्च आयोगाच्या प्रधान  सचिव अमांडा क्वेक यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या या शिष्टमंडळासोबत नवोन्मेषाचे लोकशाहीकरण करणे, उद्योजकता वाढवणे आणि तरुणांसाठी संधी निर्माण करणे यावर लक्ष केंद्रित करून शिक्षण क्षेत्रातील सहकार्य मजबूत करण्यावर चर्चा करण्यात आली.
भारत आणि सिंगापूर हे शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रात मजबूत संबंध असलेले नैसर्गिक मित्र आहेत. आम्ही सिंगापूरसोबत शैक्षणिक आणि उद्योगांच्या सहभागासह परस्पर सहकार्य वाढविण्यास उत्सुक आहोत,असे धर्मेंद्र प्रधान यावेळी म्हणाले.
 
 


 
 
 
 
 
 
N.Chitale/R.Aghor/P.Malandkar
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com   /PIBMumbai
/PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai
                
                
                
                
                
                (Release ID: 1892007)
                Visitor Counter : 255