इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

हवा गुणवत्ता निरीक्षण प्रणाली तंत्रज्ञानाचा (एआय-एक्यूएमएस व्ही 1.0) इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान सचिवांनी केला प्रारंभ

Posted On: 18 JAN 2023 2:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जानेवारी 2023

इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान सचिव अल्केश कुमार शर्मा यांनी इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय समर्थित प्रकल्पांतर्गत विकसित केलेल्या हवा गुणवत्ता निरीक्षण प्रणाली  तंत्रज्ञानाचा (AI-AQMS v1.0) नवी दिल्लीत केला आरंभ.

कोलकात्याच्या अत्याधुनिक संगणन विकास केंद्राने (सी-डॅक) वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या आयएसएम, धनबाद यांच्या सहकार्याने कृषी आणि पर्यावरणासंदर्भातील इलेक्ट्रॉनिक्स आणि आयसीटी ऍप्लिकेशन्सवरील राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत,(AgriEnIcs)' वातावरणातील हवेच्या निरंतर विश्लेषणासाठी, हवेचे निरीक्षण केंद्र विकसित केले आहे ज्यामध्ये पीएम 1.0, पीएम 2.5, पीएम 10.0, एसओ2, एनओ2, सीओ, ओ2, वातावरणातील तापमान, सापेक्ष आर्द्रता इत्यादी बाबींचा समावेश आहे.

तंत्रज्ञान हस्तांतरण करतानाची काही क्षणचित्रे

हवा गुणवत्ता निरीक्षण प्रणाली (AI-AQMS v1.0), निवडलेल्या जे.एम. एनवायरोलॅब प्रायव्हेट लिमिटेडकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.  विविध खाण आणि सिमेंट उद्योगांमध्ये तैनात करण्यासाठी या समान तंत्रज्ञानाचे अधिक व्यावसायिकीकरण केले जाईल. या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण (टीओटी) नवी दिल्लीत इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय येथे करण्यात आले. यावेळी सी- डॅक, कोलकताचे  वरिष्ठ संचालक आणि केंद्र प्रमुख, आणि  जे.एम. एनवायरोलॅब प्रायव्हेट लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपा तनेजा, यांनी तंत्रज्ञान हस्तांतरण  करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान  सचिव अल्केश कुमार शर्मा, अतिरिक्त सचिव भुवनेश कुमार,मंत्रालयाच्या गट समन्वयक सुनीता वर्मा,पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे (माहिती तंत्रज्ञान) संचालक, नवीन कुमार विद्यार्थी,आयसीएआर - सीआयएफआरायचे संचालक डॉ. बसंता कुमार दास, सी-,डॅक , कोलकाताचे वरिष्ठ संचालक आणि केंद्र प्रमुख देबाशिष मुझुमदार,इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे ' डी' वैज्ञानिक ओम कृष्ण सिंह यांच्यासह अन्य उद्योग भागीदार, प्रकल्प चमू सदस्य आणि विविध वापरकर्ते आणि मंत्रालयाचे प्रतिनिधित्व करणारे इतर सन्माननीय मान्यवर यांच्या उपस्थितीत हे तंत्रज्ञान हस्तांतरण करण्यात आले.


G.Chippalkatti/S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1891946) Visitor Counter : 238