संरक्षण मंत्रालय

राष्ट्रीय गिर्यारोहण आणि साहसी क्रीडा संस्थेचे (निमास) पथक 6 देशांच्या सायकलिंग मोहिमेवर


या मोहिमेत हे पथक 50 दिवसात 6 देशांमध्ये 5,300 किमी प्रवास करणार

Posted On: 17 JAN 2023 7:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 जानेवारी 2023

 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव"  निमित्ताने  दिरांग-स्थित राष्ट्रीय गिर्यारोहण आणि साहसी क्रीडा संस्था (निमास) चे 4 सदस्यीय पथक उद्या 18 जानेवारी 2023 रोजी व्हिएतनाममधील हनोई येथून 6 देशांच्या सायकलिंग मोहिमेला सुरुवात करण्यासाठी सज्ज झाले आहे. व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, थायलंड आणि मलेशियामार्गे 50 दिवसांत सुमारे 5300 किमी अंतराचा प्रवास करून 8 मार्च 2023 रोजी सिंगापूरमधील एस्प्लनेड पार्क (आयएनए युद्ध स्मारक ) येथे या मोहिमेचा समारोप होईल. वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी 16 जानेवारी 2023 रोजी नवी दिल्ली येथून हा चमू हनोईमध्ये दाखल झाला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गेल्या वर्षी 18 एप्रिल 2022 रोजी  त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या संस्थेच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत या मोहिमेला मान्यता दिली होती.

16 जानेवारी रोजी नवी दिल्ली येथून या मोहिमेला संरक्षण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांनी  निमासच्या  सचिवांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवला. चार सदस्यीय पथकाचे नेतृत्व कर्नल आर.एस. जामवाल करत आहेत.

6 दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांना भेट देणारी ही अशा प्रकारची पहिली सायकलिंग मोहीम आहे. सिंगापूर मधील  आयएनए स्मारक येथे हे पथक, ब्रिटीश वसाहतवादी  राजवटीतून  देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांची आहुती दिली, त्या  सर्व योद्ध्यांना श्रद्धांजली अर्पण करतील.

राष्ट्रीय गिर्यारोहण आणि साहसी क्रीडा संस्थेच्या पथकाने अलिकडेच  ईशान्येकडील सातही राज्यांचा सायकलने प्रवास करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रमाची नोंद केली आहे. त्यांनी ईशान्य प्रदेशातील सर्व 7 राज्यांमधील सर्वात उंच शिखर सायकलने  प्रवास करत सर केले. या पथकाने अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मणिपूर, नागालँड, मिझोराम आणि त्रिपुरामधून  1098  किलोमीटर अंतर सायकलने पार केले आणि या राज्यांमधील  युवा संघटनांशी संवाद साधला.

 

* * *

S.Kakade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1891851) Visitor Counter : 147


Read this release in: English , Urdu , Hindi