वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारताचा विदेशी व्यापार: डिसेंबर 2022
Posted On:
16 JAN 2023 5:44PM by PIB Mumbai
भारताच्या एकूण निर्यातीत (वस्तू आणि सेवा एकत्रित), गेल्या वर्षी (एप्रिल-डिसेंबर 2021) याच कालावधीच्या तुलनेत एप्रिल-डिसेंबर 2022 मध्ये 16.11 टक्के सकारात्मक वाढीचा अंदाज आहे.जागतिक मंदीच्या काळातही भारताची देशांतर्गत मागणी स्थिर राहिल्यामुळे,एप्रिल-डिसेंबर 2022 मध्ये एकूण आयात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 25.55 टक्क्यांनी वाढ दर्शवेल असा अंदाज आहे.
डिसेंबरमध्ये भारताची एकूण निर्यात (वस्तू आणि सेवा एकत्रित) 61.82 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी नोंदवण्यात आली. निर्यातीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत (-) 5.26 टक्के नकारात्मक वाढ दिसून आली.डिसेंबर 2022* मध्ये एकूण आयात 73.80 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी असण्याचा अंदाज आहे, हा अंदाज आयातीत मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत (-) 1.95 टक्क्यांनी नकारात्मक वाढ दर्शवतो.
तक्ता 1: डिसेंबर 2022 दरम्यान व्यापार*
|
|
December 2022
(USD Billion)
|
December 2021
(USD Billion)
|
Merchandise
|
Exports
|
34.48
|
39.27
|
Imports
|
58.24
|
60.33
|
Services*
|
Exports
|
27.34
|
25.98
|
Imports
|
15.56
|
14.94
|
Overall Trade
(Merchandise +Services) *
|
Exports
|
61.82
|
65.25
|
Imports
|
73.80
|
75.27
|
Trade Balance
|
-11.98
|
-10.02
|
* सूचना : भारतीय रिझर्व्ह बँकेने ने जाहीर केलेली सेवा क्षेत्राची ताजी आकडेवारी नोव्हेंबर 2022 ची आहे. डिसेंबर 2022 ची आकडेवारी हा एक अंदाज आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेकडून यानंतर जाहीर करण्यात येणाऱ्या आकडेवारीच्या आधारे ती सुधारित केली जाईल.(ii) एप्रिल-डिसेंबर 2021 आणि एप्रिल-सप्टेंबर 2022 साठीची आकडेवारी प्रो रेटा तत्वानुसार देय आकडेवारीची तिमाही शिल्लक वापरून त्याप्रमाणानुसार सुधारित करण्यात आली आहे.
· एप्रिल-डिसेंबर 2022* मध्ये भारताची एकूण निर्यात (वस्तू आणि सेवा एकत्रित) 568.57 अब्ज अमेरिकी डॉलर्स अनुमानित आहे. एप्रिल-डिसेंबर 2022* मध्ये एकूण आयात 686.70 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी असल्याचा अंदाज आहे
तक्ता 2: एप्रिल-डिसेंबर 2022 दरम्यान व्यापार*
|
April-December 2022
(USD Billion)
|
April-December 2021
(USD Billion)
|
Merchandise
|
Exports
|
332.76
|
305.04
|
Imports
|
551.70
|
441.50
|
Services*
|
Exports
|
235.81
|
184.65
|
Imports
|
134.99
|
105.45
|
Overall Trade (Merchandise+
Services) *
|
Exports
|
568.57
|
489.69
|
Imports
|
686.70
|
546.95
|
Trade Balance
|
-118.12
|
-57.26
|
Fig 2: Overall Trade during April-December 2022*
- डिसेंबर 2022 मध्ये व्यापारी मालाची निर्यात 34.48 अब्ज डॉलर्स होती, तर डिसेंबर 2021 मध्ये ती 39.27 अब्ज डॉलर होती
- डिसेंबर 2021 मधील 60.33 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या तुलनेत डिसेंबर 2022 मध्ये व्यापारी मालाची आयात 58.24 अब्ज अमेरिकी डॉलर्स होती
आलेख 3: डिसेंबर दरम्यान माल व्यापार
- व्यापारी मालाची निर्यात एप्रिल-डिसेंबर 2021 या कालावधीतील 305.04 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या तुलनेत एप्रिल-डिसेंबर 2022 या कालावधीत 332.76 अब्ज डॉलर्स होती.
- एप्रिल-डिसेंबर 2021 या कालावधीतील 441.50 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या तुलनेत एप्रिल-डिसेंबर 2022 या कालावधीत व्यापारी मालाची आयात 551.70 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी होती.
- एप्रिल-डिसेंबर2021 मध्ये 136.45 अब्ज अमेरिकी डॉलर्स असणारी मालाची व्यापारी तूट एप्रिल-डिसेंबर 2022 मध्ये 218.94 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी होती.
Fig 4: Merchandise Trade during April-December 2022
- चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारतीय अर्थव्यवस्थेची लवचिक वाढ, प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगवान, स्थूल आर्थिक स्थैर्य बळकट करणारी आहे. डिसेंबर 2022 मध्ये आर्थिक घडामोडींची वाढ नोंदवणारे केवळ भारत आणि आयर्लंड हे देश आहेत असेही या अहवालात सूचित करण्यात आले आहे.
***
N.Chitale/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1891704)
Visitor Counter : 1060