वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
नवोन्मेष आणि उद्योजकतेची भावना वाढीला लावण्यासाठी सुरू असलेल्या स्टार्ट अप इंडिया इनोव्हेशन सप्ताहात आज सहाव्या दिवशी अनेक कार्यक्रमांचे आयोजन
Posted On:
15 JAN 2023 10:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जानेवारी 2023
नवोन्मेष आणि उद्योजकतेची भावना वाढीला लावण्यासाठी सुरू असलेल्या स्टार्ट अप इंडिया इनोव्हेशन सप्ताहात आज सहाव्या दिवशी देशभरात अनेक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
बनस्थळी विद्यापीठातील अटल इनक्युबेशन सेंटरने दोन दिवसांचा मेगा स्टार्टअप फेस्ट दिनांक 15 आणि 16 जानेवारी ला आयोजित केला आहे. सर्जनशीलता नवोन्मेष आणि उद्योजकतेची भावना यांना प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले होते.
फेस्टच्या पहिल्या दिवशी सर्व महाविद्यालयाच्या आणि अभियांत्रिकी विभाग, व्यवस्थापन विभाग, जैव विज्ञान, औषधशास्त्र ,डिझाईन अशा संबंधित शाखांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्टार्टअप इंडियाने उद्योग-लक्ष्यी वेबिनारच्या 7 दिवसांच्या मालिकेतील 6वे सत्र स्टार्टअप्समध्ये ‘खाजगी गुंतवणूकीसंदर्भातल्या विषयावर आयोजित केले होते.
स्टार्टअप व्यवस्थेत गुंतवणूक करणाऱ्यांच्या विविध श्रेणींवर आणि स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करताना ते कोणत्या बाबी पाहतात यावर वेबीनारमध्ये मुख्य भर दिला गेला. यावर चर्चा करण्यासाठी वेबिनारमध्ये बँका, डेट फंड, प्रॉपटेक फंड यांसारखे व्यवस्था सुकर करणारे व व्यवस्थेला वेग देणारेही सामील झाले होते.
वेबीनार : येथे पाहता येईल
वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट - टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्यूबेटर मुंबईने नवोन्मेषाची जोपासना आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन या उद्देशाने मुंबईत 9 किमी तसेच 18 किमी सायक्लेथॉनचे आयोजन केले होते,
महाराष्ट्रातील औरंगाबादच्या मराठवाडा एक्सीलरेटर फॉर ग्रोथ अँड इनक्युबेशन कौन्सिलने येथे महिला उद्योजकांसाठी आणि महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्ससाठी W20 इंडियाच्या अध्यक्षा संध्या पुरेचा आणि मुख्य समन्वयक डी. पटनायक- यांच्यासमवेत ‘महिला उद्योजकांची संवाद बैठक’ आयोजित केली होती.
* * *
N.Chitale/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1891467)
Visitor Counter : 217