वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
स्टार्ट अप इंडिया नवोन्मेष सप्ताहाच्या 5 व्या दिवशी उद्योजकांना पाठबळ देण्यासंदर्भात वेबिनार्स, परिषद, हॅकथॉनचे आयोजन
Posted On:
14 JAN 2023 9:44PM by PIB Mumbai
आज स्टार्ट अप इंडिया नवोन्मेष सप्ताहाच्या 5 व्या दिवशी, भारतातील उद्यमशीलता पूरक परिसंस्था साजरी करण्यासाठी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
एर्नाकुलम स्थित भारतीय माहिती तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन संस्थेने केरळ रोबो अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात केरळमधील 50 हून अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय स्पर्धेचा समावेश होता. अंतराळ, रोबोटिक्स, कोडिंग सारख्या गतिशील संकल्पनेशी संबंधित रोबो युद्ध, हॅकेथॉन आणि अन्य विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात आली.
स्टार्टअप इंडियाने रिस्पॉन्सिबल इन्व्हेस्टिंग मेकॅनिझमवर वेबिनारचे आयोजन केले होते. जबाबदार गुंतवणुक यंत्रणा आणि विद्यमान आणि होतकरू उद्योजकांना सहाय्य करण्याबाबतच्या धोरणांवर वेबिनारमध्ये भर देण्यात आला.
वेबिनार येथे पाहता येईल: https://www.youtube.com/watch?v=aAIOqmn953U
नोएडा येथील कुराटिव्हज टेक्नॉलॉजीज अँड कन्सल्टेशन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडने राष्ट्रीय स्टार्टअप दिन साजरा करण्यासाठी स्टार्टअप्ससाठी एक परिषद आयोजित केली होती. या कार्यक्रमात 'स्टार्टअपसाठी विक्री/वाढीची माहिती उलगडून सांगणे ' आणि 'स्टार्टअप्समध्ये गुंतवणूकदार कसे आणायचे' आणि गुंतवणूकदारांच्या अपेक्षा या विषयावर दोन तज्ञ पॅनेल चर्चांचा समावेश होता. प्रत्यक्ष कार्यक्रमात स्टार्टअपचे संस्थापक, विद्यार्थी आणि युवा नवोन्मेषक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आयआयएम उदयपूर इनक्युबेशन सेंटरने टीआयई उदयपूर आणि सक्षम यांच्या सहकार्याने त्यांच्या केंद्रात राष्ट्रीय स्टार्टअप दिन उत्साहात साजरा केला. त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये विशेष पॅनेल चर्चा आणि त्यानंतर काही निवडक मान्यताप्राप्त स्टार्टअप्सना सन्मानित करण्यासाठी ज्ञान सत्र आणि सत्कार समारंभाचा समावेश होता.
मुंबईच्या वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट-टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेटरने विद्यार्थी, संस्थापक आणि स्टार्टअप उत्साही लोकांसाठी उद्योजकता या विषयावर शताब्दी हॅकेथॉनचे आयोजन केले होते. त्याशिवाय, केंद्रावर ‘कल्पना आणि नवोन्मेष स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती आणि विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके देण्यात आली.
पुण्यातील 'आयडियाज टू इम्पॅक्ट्स इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेडने' आज राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात 400 हून अधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स आणि 30+ गुंतवणूकदार सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात तज्ज्ञांच्या मुख्य भाषणाने झाली, त्यानंतर पुण्यातील गुंतवणूकदारांनी ‘स्टार्टअप एक्झिट अँड फंडरेझिंग’ आणि ‘इन्व्हेस्टमेंट लँडस्केप इन इंडिया’ या विषयावर दोन पॅनेल चर्चा आयोजित केल्या होत्या.
***
S.Patil/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1891302)
Visitor Counter : 165