संरक्षण मंत्रालय
चांदीनगर इथल्या गरुड पलटण प्रशिक्षण केंद्रात (गरुड रेजिमेंटल ट्रेनिंग सेंटर) बेरेट संचलन सोहळा संपन्न
Posted On:
14 JAN 2023 7:00PM by PIB Mumbai
हवाई दलाच्या ‘गरुड’ या विशेष दलातील कमांडोंचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, आज हवाई दलाच्या चांदीनगर इथल्या गरुड पलटण प्रशिक्षण केंद्रात (गरुड रेजिमेंटल ट्रेनिंग सेंटर) बेरेट संचलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अतिविशिष्ट सेवा पदक, विशिष्ट पदक, विशिष्ट सेवा पदक प्राप्त(AVSM VM VSM) एयर मार्शल सूरत सिंग हे या संचनाचे परीक्षण अधिकारी म्हणून उपस्थित होते.
'गरुड' कमांडोंनी आपले प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल परीक्षण अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. जगभरातील बदलत्या सुरक्षाविषयक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी, कठोर प्रशिक्षण आणि विशेष दलांसाठीची कौशल्य वृद्धींगत करण्याच्या महत्वावर त्यांनी भर दिला. यशस्वी गरुड प्रशिक्षणार्थींना त्यांनी मरून बेरेट, गरुड प्राविण्य बिल्ला ( बॅज) तसेच विशेष दलाची नामपट्टी( टॅब) प्रदान केली. यावेळी त्यांनी गुणवंत प्रशिक्षणार्थींना चषकही प्रदान केले. एअर कॅडेट विक्रम डावर यांना सर्वोत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीसाठीचा चषक प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यात गरुड कमांडोंनी युद्धातील गोळीबार कौशल्य, अपहरण पीडितांची सुटका, गोळीबार कौशल्य प्रात्यक्षिक/ फायरिंग ड्रिल, प्राणघातक स्फोटकांचा वापर ( असॉल्ट एक्सप्लोसिव्ह), अडथळे ओलांडण्याचे कौशल्य प्रात्यक्षिक, भिंतीवर उभ्याने चढाई, स्लिटरिंग, दोरखंडाने डोंगर चढाई, आणि लष्करी मार्शल आर्टची प्रात्यक्षिके दाखवली.
मरून बेरेट संचलन सोहळा म्हणजे कमांडोंच्या क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या प्रशिक्षणाची सांगता आहे. हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या नव्या प्रशिक्षणार्थींचा एलीट गरुड फोर्स मध्ये समावेश केला जातो. यामुळे भारतीय हवाई दलाच्या क्षमतेतही स्वाभाविकपणे वृद्धी होत असते.
***
S.Patil/T.Pawar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1891263)
Visitor Counter : 208