विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
भारताच्या भू-अवकाशीय व्यवस्थेमध्ये नवोन्मेष आणि स्टार्ट-अपला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी "जिओस्पेशियल हॅकॅथॉन" ची केली सुरुवात
या “जिओस्पेशियल हॅकॅथॉन” चा 10 मार्च 2023 रोजी समारोप होईल. या जिओस्पेशियल हॅकॅथॉन मध्ये दोन गटात आव्हाने असतील -संशोधनातले आव्हान (रिसर्च चॅलेंज) आणि स्टार्ट-अप मधील आव्हान. हे आव्हान स्वीकारून जिओस्पेशिअल सिलेक्ट प्रॉब्लेम स्टेटमेंटसाठी सर्वोत्कृष्ट उपाय शोधणाऱ्यांमधून 4 विजेत्यांची निवड केली जाईल.
Posted On:
14 JAN 2023 6:21PM by PIB Mumbai
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार) ; पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री (PMO), कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले की, भारताच्या भविष्यातील अर्थव्यवस्थेसाठी नवीन उदयोन्मुख तंत्रज्ञानावर आधारीत स्टार्टअप्स महत्त्वाचे ठरतील.
आज सकाळी नवी दिल्ली येथे “जिओस्पेशिअल हॅकेथॉन” ला सुरुवात केल्यानंतर, डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, हे हॅकेथॉन भारताच्या भू-अवकाशीय पूरक व्यवस्थेमध्ये नवोन्मेष आणि स्टार्टअपला प्रोत्साहन देईल. यावेळी त्यांनी देशाच्या भूस्थानिक अर्थव्यवस्थेच्या उभारणीत सहभागी होण्याचे आणि योगदान देण्याचे आवाहन देशातील तरुणांना केले.
मंत्री म्हणाले की, आपली अर्धी लोकसंख्या 40 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे आणि ती खूप महत्वाकांक्षी आहे आणि भारतीय स्टार्ट-अप अर्थव्यवस्थेने 2022 मध्ये युनिकॉर्न क्लबमध्ये 100 व्या भारतीय स्टार्ट-अपचा समावेश करून एक मोठा टप्पा ओलांडला, याचेच ते द्योतक आहे.
डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीनुसार, भारत भू-स्थानिक क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे आणि सरकार, उद्योग आणि वैज्ञानिक समुदाय यांच्यातील योग्य समन्वयामुळे आर्थिक उत्पादनात कमालीची वाढ होईल आणि त्यामुळे वर्ष 2030 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 10 ट्रिलियन डॉलर बनण्यास मदत होईल.
या जिओस्पेशियल हॅकॅथॉनचे नियोजन, सहभाग आणि डिझाइन केल्याबद्दल डॉ. जितेंद्र सिंह यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भारतीय सर्वेक्षण संस्था, आयआयआयटी(IIIT) हैदराबाद आणि मायक्रोसॉफ्ट इंडियाचे कौतुक केले, जे भारताच्या भू-अवकाशीय धोरणाचे औपचारिक व्यासपीठ म्हणून काम करेल, जे भारताला येणाऱ्या काळात भू-स्थानिक क्षेत्रात जागतिक नेता बनवण्यासाठी मदत करेल आणि या क्षेत्रात भारताला खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर करण्यास मदत करेल. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर या उदात्त मोहीमेमध्ये सहभागी झालेल्या सर्व भागीदार संस्था, शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था, उद्योग आणि विचारवंत यांचेही त्यांनी अभिनंदन केले.
डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, या जिओस्पेशियल हॅकॅथॉनचे उद्दिष्ट केवळ सार्वजनिक आणि खाजगी भू-स्थानिक क्षेत्रातील भागीदारींना प्रोत्साहन देणे हेच नाही तर आपल्या देशाच्या भू-स्थानिक स्टार्ट-अप इकोसिस्टमला बळकट करणे हा आहे. ते पुढे म्हणाले की, शाश्वत विकास उद्दिष्टे 2030 साध्य करण्यासाठी, प्रभावी धोरण आखण्यासाठी, कार्यक्रम ठरवण्यासाठी आणि प्रकल्प कार्यान्वयन करण्यासाठी आपल्या देशाकडे विश्वसनीय भू-अवकाशीय माहिती असणे आवश्यक आहे.
या “जिओस्पेशियल हॅकॅथॉन” चा 10 मार्च 2023 रोजी समारोप होईल. या हॅकॅथॉनमध्ये दोन गटात आव्हाने असतील -संशोधनातले आव्हान (रिसर्च चॅलेंज) आणि स्टार्ट-अप मधील आव्हानं.हे आव्हान स्वीकारून जिओस्पेशिअल सिलेक्ट प्रॉब्लेम स्टेटमेंटसाठी सर्वोत्कृष्ट उपाय शोधणाऱ्यांमधून 4 विजेत्यांची निवड केली जाईल.
***
S.Patil/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1891253)
Visitor Counter : 234