वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
स्टार्ट अप इंडिया नवोन्मेष सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी उद्यमशीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या कार्यशाळा आणि वेबिनार्सचे आयोजन
Posted On:
12 JAN 2023 7:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जानेवारी 2023
स्टार्ट अप इंडिया नवोन्मेष सप्ताहाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी, देशभरात, उद्यमशीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या कार्यशाळा आणि वेबिनार्सचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
स्टार्टअप्स आणि इनोव्हेशन या विषयावर, स्टार्ट अप इंडियाने, केंद्रीय मंत्रालये तसेच सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या मदतीने, एक गोलमेज परिषद आयोजित केली होती. यक परिषदेत, विविध मंत्रालयांच्या नवोन्मेष आणि उद्यमशीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या, सध्याच्या धोरणांचा परामर्श घेण्यात आला, तसेच या धोरणांवर आधारित काय पावले उचलता येतील, यावर मंथन झाले. 19 पेक्षा जास्त मंत्रालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांनी स्टार्ट अप क्षेत्रातील संधी आणि स्टार्टअप व्यवस्था देशात अधिक वाढवण्यासाठी भविष्यातील योजना यावरील चर्चामध्ये आपली मते मांडली.
त्याशिवाय, “नवोन्मेषाच्या संधी देण्यात सरकारची भूमिका’ या विषयावरही स्टार्ट अप इंडिया ने एक वेबिनार आयोजित केले होते. या वेबिनारमध्ये, विविध क्षेत्रातील तज्ञांनी, नियामक सुधारणा, खरेदी आणि नवोन्मेशी तंत्रज्ञानाचा शोध, या बाबतीत, सरकार काय भूमिका पार पाडू शकते, यावर मार्गदर्शन केलं.
लखनौ, कर्नाटक, अहमदाबाद, उत्तराखंड आणि ओडिशा इथेही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
वक्त्यानी त्यांचे स्टार्ट अप क्षेत्रातले अनुभव यावेळी सांगितले. तसेच या प्रवासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात ग्राहक कसे मिळवायचे, याचेही मार्गदर्शन केले.
S.Kane/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1890803)
Visitor Counter : 177