वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

व्यापार धोरण मंचामुळे भारत आणि यूएसए या दोन्ही देशांसाठी सुविहित, मैत्रीपूर्ण आणि विश्वासार्ह व्यावसायिक वातावरण निर्माण झाले आहे: पीयूष गोयल

Posted On: 12 JAN 2023 5:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जानेवारी 2023

 

भारत अमेरिका व्यापार धोरण मंचामुळे दोन्ही बाजूंच्या व्यवसायांना त्यांच्या व्यापार आणि गुंतवणुकीचा विस्तार करण्यासाठी एक सुविहित, मैत्रीपूर्ण आणि विश्वासार्ह व्यावसायिक वातावरण मिळाले आहे असे  केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री, पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. वॉशिंग्टन डीसी येथे तेराव्या मंत्रिस्तरीय व्यापार धोरण मंच (टीपीएफ) संवादाच्या समारोपानंतर ते आज माध्यमांना माहिती देत होते.

डब्लूटीओ विवादांचे निराकरण करणेकोळंबीची निर्यात पुन्हा सुरू करणे, व्यवसाय व्हिसाची गती वाढवणे, लवचिक पुरवठा साखळी, डेटा प्रवाह आणि हवामानातील बदलांना संबोधित करणे या मुद्द्यांवर 13व्या मंत्रिस्तरीय टीपीएफ संवादात चर्चा करण्यात आली अशी माहिती गोयल यांनी दिली.

दोन्ही देशांनी त्यांच्यातील प्रलंबित डब्लूटीओ विवादांवर द्विपक्षीय तोडगा काढण्यावर चर्चा केली. या मुद्द्यांवर येत्या काही महिन्यांत समाधानकारक निकालाची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दोन्ही बाजूंच्या व्यावसायिक व्यक्तींचे स्थलांतर जलद आणि सुलभ करण्यासाठी भारताने अमेरिकेला व्यावसायिक (बिझनेस) व्हिसा जारी करण्याची विनंती केली आहे असे त्यांनी सांगितले.

सेमीकंडक्टर, संरक्षण उत्पादन, गुणवत्ता मानकांबाबत कायदे मजबूत करणे यासारख्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी भारताच्या प्रयत्नांशी संबंधित इतर अनेक पैलूंवर चर्चा करण्यात आली असे ते म्हणाले. नवी दिल्ली येथे फेब्रुवारीमध्ये आयपीईएफवरील चर्चेच्या पुढील फेरीचे आयोजन भारत करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

आपल्या भेटीदरम्यान अमेरिकी कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची त्यांनी भेट घेतली. भौगोलिक क्षेत्रासंबंधितचे अवलंबित्व वैविध्यपूर्ण करण्यासाठी, स्वत:च्या उत्पादन प्रकल्पांचा विस्तार करण्यासाठी अमेरिकी उद्योग भारताकडे एक विश्वासू भागीदार म्हणून पाहत आहेत असे त्यांनी सांगितले.

बी 20 प्रतिबद्धते अंतर्गत स्टार्टअप 20 सारखे नवीन उपक्रम देखील सुरू केले जातील असे ते म्हणाले.

 

 

 

 

S.Kane/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1890751) Visitor Counter : 121


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu