पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

भारताचे जी 20 अध्यक्षपद आणि जपानचे जी 7 अध्यक्षपद पातळीवरील सहकार्य ही "वसुधैव कुटुंबकम" च्या दिशेने जगाचे भविष्य घडवण्यासाठी दोन्ही देशांना एक अनोखी संधी : केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव

Posted On: 12 JAN 2023 3:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जानेवारी 2023

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज नवी दिल्लीत जपानचे पर्यावरण मंत्री अकिहिरो निशिमुरा यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. जी 7/जी 20 सहयोग, पर्यावरणासाठी जीवनशैली (लाईफस्टाइल फॉर एनवॉयर्नमेंट-LiFE), सागरी आणि प्लास्टिक कचरा, संयुक्त राष्ट्रांची हवामान बदल परिषद (कॉप-27) आणि जैव विविधतेवर अधिवेशन (सीबीडी) 15 यासह अनेक मुद्द्यांवर बैठकीत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.

भूपेंद्र यादव म्हणाले की हा योगायोग आहे की जपान आणि भारत या दोन्ही देशांनी अनुक्रमे जी7 आणि जी 20 चे अध्यक्षपद स्वीकारले आहे आणि त्यामुळे दोन्ही देशांना जगाचे भविष्य घडवण्यासाठी विषयपत्रिका आणि प्राधान्यक्रम ठरवण्याची संधी आहे. वसुधैव कुटुंबकम किंवा एक पृथ्वी • एक कुटुंब • एक भविष्य ही भारताच्या जी20 अध्यक्षतेची संकल्पनादेखील आहे. भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या काळात, अनेक मंत्रालये आणि विभागांमधील सर्व कार्यरत गटांसाठी लाईफ -LIFE ही एक महत्त्वाची प्राथमिकता आहे, असे त्यांनी सांगितले.  त्यांनी भारताच्या जी-20 अध्यक्षपदासाठी जपानचा पाठिंबाही मागितला आणि जपानच्या जी-7 अध्यक्षपदासाठी भारताकडून पाठिंब्याचे आश्वासनही दिले.

भारतात नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी जपानने केलेल्या प्रयत्नांची त्यांनी दखल घेतली आणि त्यांचे कौतुक केले. पुनर्सर्जक  अर्थव्यवस्था आणि संसाधन कार्यक्षमता, कमी कार्बन तंत्रज्ञान, ग्रीन हायड्रोजन या क्षेत्रात भारत आणि जपान दरम्यान द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला.

औद्योगिक विकासाला शाश्वत उत्पादनाकडे वळवणे आणि शाश्वत वापराला चालना देणारे साधन बनवणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

 

 

 

S.Kane/P.Jambhekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1890736) Visitor Counter : 170