पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी गयानाचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मोहम्मद इरफान अली यांची घेतली भेट

Posted On: 12 JAN 2023 3:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जानेवारी 2023

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज नवी दिल्लीत गयाना सहकारी प्रजासत्ताकचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद इरफान अली यांची भेट घेतली.

संपूर्ण तेल आणि वायू परिसंस्थेमध्ये सहकार्य वाढविण्याबाबत उभय  नेत्यांनी फलदायी आणि समावेशक चर्चा केली तसेच दोन्ही देशांदरम्यान अस्तित्वात असलेल्या समन्वयांची नोंद घेतली.

उभय पक्षांनी द्विपक्षीय ऊर्जा भागीदारीतील अलीकडील घडामोडींची दखल घेतली. 31 ऑक्टोबर 2022 रोजी अबू धाबी येथे अबुधाबी आंतरराष्ट्रीय पेट्रोलियम प्रदर्शन आणि परिषद (एडीआयपीइसी) -2022 दरम्यान हरदीप पुरी आणि  गयानाचे नैसर्गिक संसाधन मंत्री विक्रम भारत यांची भेट झाली तर ऑगस्ट 2022 मध्ये भारतीय ऊर्जा क्षेत्रातल्या सार्वजनिक कंपनीच्या प्रतिनिधींनी गयानाला भेट दिली.

तेल आणि वायू क्षेत्रात  दीर्घकालीन मागणी, गयानामधील उत्खनन आणि उत्पादन कृतींमध्ये सहभाग,  तांत्रिक सहकार्य आणि क्षमता वाढीसह थेट सरकार ते सरकार सहकार्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.

या चर्चेतले मुद्दे पुढे नेण्यासाठी दोन तांत्रिक पथके स्थापन करण्याचे त्यांनी मान्य केले. फेब्रुवारी 2023 मध्ये गयानाचे उपाध्यक्ष भरत जगदेव यांच्या भारत भेटीदरम्यान भविष्यातील सहकार्याची रूपरेषा निश्चित केली जाईल.

गयाना पॉवर आणि गॅस इंक (गयाना सरकारची संपूर्ण मालकीची कंपनी) आणि इंजिनियर्स इंडिया लिमिटेड (ईआयएल) यांच्यात गयाना येथे एकात्मिक नैसर्गिक वायू द्रवरूप ( एनजीएल) प्लांट आणि 300 मेगावॅट कम्बाईंड सायकल गॅस टर्बाईन (सीसीजीटी) पॉवर प्लांट प्रकल्पासाठी सल्लामसलत सेवा प्रदान करण्यासाठी झालेल्या करारावरही उभय नेत्यांनी स्वाक्षरी केली.

S.Kane/P.Jambhekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1890713) Visitor Counter : 116


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu