संरक्षण मंत्रालय

पृथ्वी-2 या लघु पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे ओडिशाच्या समुद्र किनार्‍यावरुन यशस्वी प्रशिक्षण प्रक्षेपण

Posted On: 10 JAN 2023 10:08PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 जानेवारी 2023

 

ओडिशाच्या समुद्र किनार्‍यावरील चांदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रावरुन, पृथ्वी-2 या लघु पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे 10 जानेवारी 2023 रोजी यशस्वी प्रशिक्षण प्रक्षेपण करण्यात आले. पृथ्वी-2 क्षेपणास्त्र, ही एक सुस्थापित प्रणाली असून, भारताच्या आण्विक  हल्लारोधी शक्तीचा अविभाज्य भाग आहे. या क्षेपणास्त्राने चाचणीच्या वेळी अत्यंत अचूक लक्ष्य गाठले. तसेच प्रशिक्षण प्रक्षेपणाच्या वेळी क्षेपणास्त्राच्या सर्व परिचालनविषयक आणि तांत्रिक बाबींची यशस्वी हाताळणीही झाली.

 

* * *

S.Patil/R.Aghor/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1890143) Visitor Counter : 189


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi