रेल्वे मंत्रालय
आरपीएफ मध्ये कॉन्स्टेबलच्या 19800 पदांच्या सोशल मीडियावरील बनावट भरती अधिसूचनेबाबत स्पष्टीकरण
प्रविष्टि तिथि:
10 JAN 2023 8:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जानेवारी 2023
रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) मध्ये पोलीस शिपाई (कॉन्स्टेबल) पदाच्या 19800 जागांच्या भरतीबाबत सोशल मिडिया, अर्थात समाज माध्यमे आणि वर्तमानपत्रांमध्ये एक बनावट संदेश प्रसारित केला जात आहे. या निवेदना द्वारे सूचित केले जाते की आरपीएफ किंवा रेल्वे मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा कोणत्याही छापील किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमा द्वारे अशी कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही.
ही बातमी खोटी आहे आणि त्याकडे सर्वांनी दुर्लक्ष करावे, याचा पुनरुच्चार करण्यात येत आहे.
* * *
S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1890122)
आगंतुक पटल : 256