उपराष्ट्रपती कार्यालय
83 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते होणार उद्घाटन
Posted On:
09 JAN 2023 5:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जानेवारी 2023
उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड 11 जानेवारी 2023 रोजी जयपूर येथे 83 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करतील.
अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद ही भारतातील विधिमंडळांची सर्वोच्च संस्था असून 2021 मध्ये या संस्थेने आपली शंभर वर्षे पूर्ण केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिमला येथे 2021 मध्ये 82 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित केले होते. पहिली अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद 1921 मध्ये शिमला येथेच झाली होती.
जयपूर शहरात चौथ्यांदा या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
आगामी 83 व्या सत्रात दिवसभराच्या चर्चेत समकालीन प्रासंगिकतेच्या खालील विषयांवर लक्ष केंद्रित केले जाईल -
- लोकशाहीची जननी म्हणून जी-20 मध्ये भारताचे नेतृत्व.
- संसद आणि विधिमंडळ अधिक प्रभावी, उत्तरदायी आणि फलदायी बनवण्याची गरज.
- संविधानाच्या भावनेनुसार विधिमंडळ आणि न्यायपालिका यांच्यात सुसंवादी संबंध राखण्याची गरज.
- यावेळी पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटनही होणार आहे.
लोकसभेचे अध्यक्ष, राजस्थानचे मुख्यमंत्री, राज्यसभेचे उपसभापती आणि राज्यभरातील विधान मंडळांचे पीठासीन अधिकारी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1889803)
Visitor Counter : 399