आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली एम्स भुवनेश्वर येथे सेंट्रल इन्स्टिट्यूट बॉडी ऑफ ऑल एम्सची सहावी बैठक संपन्न
Posted On:
08 JAN 2023 8:16PM by PIB Mumbai
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज सर्व नवीन एम्सच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट बॉडी (CIB) च्या 6 व्या बैठकीला संबोधित केले. त्यांच्यासमवेत आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार, खासदार डॉ.अनिल जैन, खासदार रमेश भिदुरी आणि नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही.के. पॉल हे उपस्थित होते.
“ही बैठक केवळ पूर्वीच्या निर्णयांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी नाही तर सर्व सहभागींच्या समृद्ध अनुभव आणि कौशल्यावर आधारित अंतर्दृष्टी, नवीन कल्पना, नाविन्यपूर्ण विचार आणि सूचना जाणून घेण्यासाठी एक चिंतन शिबिर आहे”, असे डॉ. मांडविया सर्व सहभागींचे स्वागत करताना म्हणाले. सर्व एम्स या आरोग्य सेवेच्या प्रमुख राष्ट्रीय संस्था असून त्यांना जागतिक उत्कृष्टतेच्या संस्था बनवण्याच्या दृष्टीकोनावर त्यांनी भर दिला. हे केवळ उच्च दर्जा, वैद्यकीय सेवा , उच्च दर्जाचे वैद्यकीय शिक्षण आणि अत्याधुनिक संशोधनाद्वारेच शक्य होऊ शकते, असेही ते म्हणाले.
एम्सच्या ब्रँडला अधिक उंचीवर नेण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे डॉ.भारती प्रवीण पवार यांनी अधोरेखित केले. सहभागी प्रतिनिधींनी जागतिक स्तरावर यशस्वी ठरलेल्या वैद्यकीय संस्थांच्या कामकाजाच्या मॉडेलचा अभ्यास करावा आणि स्थानिक पातळीवर त्या सर्वोत्तम पद्धती लागू कराव्यात अशा सूचना पवार यांनी दिल्या. आभा ओळखपत्र आणि इतर सरकारी योजनांबद्दल लोकांमध्ये अधिक जागरूकता निर्माण करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या.
***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1889644)
Visitor Counter : 190