सांस्कृतिक मंत्रालय

केंद्रीय सांस्कृतिक कार्य आणि शिक्षण मंत्रालयाद्वारे संयुक्तपणे संगीत आणि नाट्यपरंपरांवर आधारित‘धारा’ या उपक्रमाचे आयोजन

Posted On: 07 JAN 2023 6:42PM by PIB Mumbai

 

ठळक वैशिष्ट्ये :

  • या उपक्रमाचा उद्देश हा देशातील परफॉरमिंग कलापरंपरांचे पुनरुज्जीवन करुन त्या पुन्हा लोकप्रिय करण्याच्या दृष्टीने एक दूरदृष्टी आराखडा तयार करणे आणि या कलाक्षेत्रांना भेडसावणाऱ्या आव्हानांचा सामना करणे आहेे . 

 

केंद्रीय सांस्कृतिक आणि शिक्षण मंत्रालयाने, संयुक्तरित्या पाच आणि सहा जानेवारी 2023 रोजी, तामिळनाडूत तंजावूरच्या एसएएसटीआरए या अभिमत विद्यापीठात, संगीत आणि नाट्य परंपरेवर आधारित, ‘धाराहा महोत्सव आयोजित केला होता. यात, ब्रहत, प्राच्यम आणि संगम चर्चा यांचेही सहकार्य त्यांना लाभले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत, भारतीय ज्ञानपरंपरेच्या विविध शाखांविषयी, जनजागृती करणे, त्यांचे जतन करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे, अशा उद्देशाने, धारा, ही परिषदांची मालिका आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश, भारतातील प्रयोग  कला (परफॉरमिंग आर्ट्स) परंपरांचे पुनरुज्जीवन करणे, त्यांचे जतन आणि प्रोत्साहन देण्यासाठी, व्हीजन आराखडा- 2047 तयार करणे, तसेच या क्षेत्रासमोर असलेल्या आव्हानांवर चर्चा करणे हा आहे.

या धारा कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या डॉ. पद्मा सुब्रह्मण्यम (अध्यक्ष, नृत्योदय), प्रा. गंटी एस मूर्ती (राष्ट्रीय समन्वयक, आयकेएस विभाग), डॉ. आर. चंद्रमौली (रजिस्ट्रार, सस्त्रा विद्यापीठ), श्रीनिवासन या मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. सांस्कृतिक मंत्रालयाकडून अय्यर आणि प्रा. अनुराधा चौधरी (जनसंपर्क समन्वयक), आयकेएस विभाग) यांनी आभार मानले.

आपल्या बीजभाषणात, डॉ. पद्मा सुब्रह्मण्यम यांनी भारताच्या समृद्ध अमूर्त वारशाचे वैभव, आपल्याला भेडसावणाऱ्या चिंता आणि आपल्या परफॉर्मिंग कलांचा भविष्यातील  आराखडा थोडक्यात मांडला. भारतीय कला या आपल्यातील दैवी अस्तित्वाची जाणीव करुन देणारा मार्ग आहे. अनेक संकटांनंतरही अभंग राहिलेल्या भारतीय संस्कृतीविषयी अभिमान कसा विकसित व्हायला हवाहे त्यांनी सांगितले.

पुढील दोन दिवस सलग चाललेल्या चर्चासत्रामध्ये, देशभरातील प्रख्यात अभ्यासक, संशोधक, नवोदित आणि शिक्षणतज्ञ कर्नाटक, हिंदुस्थानी आणि लोक (गायन आणि वाद्य) संगीत आणि नृत्य परंपरेचे प्रतिनिधित्व करणारे मान्यवर आले होते.

उपक्रमात सहभागी प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांनी कन्नन बालकृष्णन यांच्या नेतृत्वाखालील चमूची जुगलबंदी, तारा किणी यांच्या नेतृत्वाखालील सुनाद आणि संगीत परंपरा यांचे प्रतिनिधित्व करणारी चमू, नाट्य परंपराचे प्रतिनिधित्व करणारे थोकचोम टोलेन मीतेई यांचे मणिपुरी नृत्य सादरीकरण आणि संगीतमय सादरीकरण यासारखे मंत्रमुग्ध करणारी सादरीकरणे पाहिली. तसेच, रेवती साकळकर यांच्या नेतृत्वाखाली लोकसंगीताचा मेळा झाला.

उपक्रमाच्या अखेरीस, परिषदेतील विद्यार्थी आणि वक्ते यांनी येत्या काही वर्षात ह्या क्षेत्रात करावयाच्या अनेक कामांसाठीचे मुद्दे मांडले. यात, भारताच्या या प्राचीन कला परंपरेच्या जतनासाठीचे आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठीचे अनेक मुद्दे आहेत.  ह्याच सगळ्या मुद्यांचा अंतर्भाव करुन, एक सूत्रबद्ध आराखडा- धारा- व्हीजन संगीत आणि नाट्य परंपरा, 2047 प्रसिद्ध केला जाणार आहे.

****

G.Chippalkatti/R.Aghor/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1889433) Visitor Counter : 161