संरक्षण मंत्रालय
भारतीय हवाई दल आणि जपान एअर सेल्फ डिफेन्स फोर्स जपानमध्ये संयुक्त सरावासाठी सज्ज
Posted On:
07 JAN 2023 6:16PM by PIB Mumbai
देशादेशांमधील हवाई संरक्षण सहकार्याला चालना देण्यासाठी, जपानच्या हयाकुरी हवाई तळावर, 12 जानेवारी 2023 ते 26 जानेवारी 2023 याकाळात भारतीय हवाई दल आणि जपान एअर सेल्फ डिफेन्स फोर्स (जेएएसडीएफ) यांचा 'वीर गार्डियन-2023' हा संयुक्त हवाई सराव, भारत आणि जपानने आयोजित केला आहे. या हवाई सरावात सहभागी होणाऱ्या भारतीय तुकडीत चार एययू-30 एमकेआय, दोन सी-17 आणि एक आयएल-78 विमाने असतील, तर जेएएसडीएफची चार एफ-2 आणि चार एफ-15 लढावू विमाने सहभागी होतील.
1WSN.JPG)
जपानमधील टोकियो येथे 08 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या दुसऱ्या 2+2 परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रिस्तरीय बैठकीत,दोन्ही बाजूंमधील सुरक्षा सहकार्य तसेच द्विपक्षीय संरक्षण सहकार्य वाढवण्यास आणि पहिल्या संयुक्त लढाऊ जेट कवायतींसह अधिक लष्करी सरावांमध्ये सहभागी होण्याचे भारत आणि जपानने
मान्य केले. हा सराव दोन्ही देशांमधील धोरणात्मक संबंध आणि घनिष्ठ संरक्षण सहकार्यासाठी आणखी एक महत्वपूर्ण पाऊल ठरेल.
QQ2Z.jpeg)
उद्घाटनाच्या संयुक्त सरावामध्ये दोन्ही हवाई दलांमधील विविध हवाई लढाऊ कवायतींचा समावेश असेल. ते जटिल वातावरणात बहु-क्षेत्रीय हवाई युद्ध मोहिमांची प्रात्यक्षिके हाती घेतील आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करतील. दोन्ही बाजूंचे तज्ञ विविध कार्यान्वयन पैलूंवर त्यांचे कौशल्य सामायिक करण्यासाठी चर्चा करतील. 'वीर गार्डियन' या सरावामुळे मैत्रीचे दीर्घकालीन बंध दृढ होतील आणि दोन्ही हवाई दलांमधील संरक्षण सहकार्याचे मार्ग वाढतील.
****
G.Chippalkatti/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1889423)