संरक्षण मंत्रालय

प्रजासत्ताक दिन सोहळा 2023: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त 23 आणि 24 जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे लष्करी मेळावा आणि आदिवासी नृत्य महोत्सवाचे आयोजन

Posted On: 07 JAN 2023 1:24PM by PIB Mumbai

 

प्रजासत्ताक दिन 2023 अंतर्गत तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त (पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो), 23 आणि 24 जानेवारी 2023 रोजी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे लष्करी मेळावा आणि आदिवासी नृत्य महोत्सव 'आदी शौर्य - पर्व पराक्रम' चे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसीय या महोत्सवात सशस्त्र दलांचा पराक्रम आणि भारताच्या आदिवासी संस्कृतीच्या परंपरागत सौंदर्याचे दर्शन घडवले जाईल.  याची मोफत तिकिटे www.bookmyshow.com वर उपलब्ध आहेत.

कार्यक्रमात लष्करी मेळावा (पॅरामोटर ग्लायडिंग, हॉट एअर बलून, हॉर्स शो, मोटर सायकल डिस्प्ले, एअर वॉरियर ड्रिल, नेव्ही बँड) आणि देशभरातील आदिवासी कलाकारांचे पारंपारिक नृत्य सादरीकरण (खुखरी नृत्य, गटका, मल्लखांब, कलारीपायटू, थांगटा) यांचा समावेश आहे. या भव्य सोहळ्यात प्रसिद्ध गायक कैलाश खेर हे देखील सादरीकरण करणार आहेत.

देशाच्या शूरवीरांच्या बलिदानाचे स्मरण करणे आणि भारताला अद्वितीय आणि वैविध्यपूर्ण बनवणारा समृद्ध सांस्कृतिक वारशाचा उत्सव साजरा करणे, हा या उत्सवाचा उद्देश आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे शौर्याचे  एकत्रितपणे स्मरण करुन तो साजरे करणे हा यामागचा उद्देश आहे. भारताचा अस्सल आत्मा आत्मसात करत  एक मजबूत आणि समृद्ध 'नव भारत' घडवण्यासाठी वचनबद्ध व्हा.  संरक्षण मंत्रालय आणि आदिवासी व्यवहार मंत्रालय संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन करत असून, भारतीय तटरक्षक दल समन्वयक आहे.

****

H.Raut/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1889347) Visitor Counter : 244