कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
देशातल्या 242 जिल्ह्यांमध्ये 9 जानेवारी 2023 रोजी प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी मेळाव्याचे आयोजन
Posted On:
06 JAN 2023 3:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जानेवारी 2023
ठळक मुद्दे:
- या मेळाव्यात सहभागी होऊन भारतातील तरुणांना शिकाऊ उमेदवारीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक स्थानिक व्यवसाय आणि संस्थांना आमंत्रित करण्यात आले आहे.
- मेळाव्याचे नजीकचे ठिकाण शोधण्यासाठी आणि नावनोंदणीसाठी कृपया https://www.apprenticeshipindia.gov.in/ ला भेट द्या.
कौशल्य भारत अभियानांतर्गत भारतातील तरुणांसाठी करिअरच्या संधींना चालना देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचा एक भाग म्हणून, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय 9 जानेवारी 2023 रोजी देशातील 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 242 जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी मेळाव्याचे आयोजन करत आहे.
स्थानिक तरुणांना प्रशिक्षणाद्वारे त्यांचे करिअर घडवण्यासाठी संबंधित संधी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक स्थानिक व्यवसाय आणि संस्थांना या प्रशिक्षण मेळाव्यात सहभागी होण्याकरिता आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक कंपन्यांचा सहभाग पाहायला मिळेल. सहभागी संस्थांना एकाच व्यासपीठावर संभाव्य प्रशिक्षणार्थींना भेटण्याची आणि तिथेच अर्जदारांची निवड करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे प्रशिक्षणार्थींना रोजीरोटीची आणि नवीन कौशल्ये शिकण्याची संधी मिळेल.
मेळाव्याचे नजीकचे ठिकाण शोधण्यासाठी आणि नावनोंदणीसाठी कृपया https://www.apprenticeshipindia.gov.in/ ला भेट द्या.
अतुल कुमार तिवारी, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव, म्हणाले की, प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी मेळावा हे एक व्यासपीठ आहे जे शिकाऊ उमेदवार आणि नियोक्ते यांच्यात त्वरित भेट घडवते आणि इच्छुकांना नियोक्त्यांसोबत प्रत्यक्ष संवाद साधण्याची आणि त्यांना ज्या उद्योगात प्रशिक्षण आणि करिअर करायचे आहे त्याविषयी जाणून घेण्याची संधी उपलब्ध करते.
देशात दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी शिकाऊ उमेदवारी मेळावा आयोजित केला जातो, ज्यामध्ये निवडक व्यक्तींना नवीन कौशल्ये प्राप्त करण्यासाठी सरकारी निकषांनुसार मासिक विद्यावेतन मिळते.
अधिक माहितीसाठी: https://www.msde.gov.in/ ला भेट द्या.
N.Chitale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1889144)
Visitor Counter : 308