रसायन आणि खते मंत्रालय
भारतीय औषधे आणि वैद्यकीय उपकरणे ब्युरोकडून जनऔषधी विशेष च्यवनप्राशची विक्री सुरु
हे विशेष च्यवनप्राश सर्व जनऔषधी केंद्रांवर उपलब्ध असेल
Posted On:
05 JAN 2023 6:52PM by PIB Mumbai
प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना (पीएमबीजेपी ) अंतर्गत जनऔषधी विशेष च्यवनप्राश या नवीन उत्पादनाची विक्री 5 जानेवारीपासून नवी दिल्लीतून सुरु करण्यात आली. भारतीय औषधे आणि वैद्यकीय उपकरणे ब्युरोचे (पीएमबीआय ) मुख्य कार्यकारी अधिकारी रवी दधीच यांनी या नवीन उत्पादनाच्या विक्रीचा प्रारंभ केला. हे विशेष च्यवनप्राश आता देशभरातील सर्व जनऔषधी केंद्रांवर वाजवी दरात उपलब्ध असेल.च्यवनप्राश विशेष ही एक गुणकारी प्रतिआँक्सिडीकारक (अँटिऑक्सिडेंट) पेस्ट असून सुमारे 50 औषधी वनस्पती आणि मसाल्यांच्या एकत्रित मिश्रणाने तयार केलेली पेस्ट आहे.
सध्या देशात 9000 हून अधिक जनऔषधी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. या 9000 केंद्रांच्या माध्यमातून 1759 हून अधिक औषधे आणि 280 शस्त्रक्रिया उपकरणांसह , रु. 1/- प्रति पॅड असलेल्या सुविधा सॅनिटरी पॅड्सची उपलब्धता सुनिश्चित केली जाते.खुल्या बाजारात उपलब्ध असलेल्या ब्रँडेड औषधांच्या किंमतींपेक्षा जनऔषधी औषधांच्या किमती साधारणपणे 50% ते 90% कमी असतात. एकंदरीतच , या योजनेमुळे गेल्या 8 वर्षात नागरिकांची एकूण रु. 18,000 कोटी रुपयांची बचत झाली आहे.
***
Shailesh P/Sonal/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1889128)
Visitor Counter : 168