इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु उद्या डिजिटल इंडिया पुरस्कार 2022 प्रदान करणार

Posted On: 06 JAN 2023 2:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 जानेवारी 2023

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु उद्या, 7 जानेवारी 2023 रोजी विजेत्यांना डिजिटल इंडिया पुरस्कार 2022 प्रदान करणार आहेत.

भारताचे, डिजिटल सक्षम समाजात आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेत परिवर्तन करण्यासाठी  भारत सरकारने डिजिटल इंडिया कार्यक्रमाचा दृष्टीकोन समोर ठेवला आहे. सर्व स्तरांवरील सरकारी संस्थांच्या अभिनव डिजिटल उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी डिजिटल इंडिया पुरस्कार (https://digitalindiaawards.gov.in) दिले जातात. केवळ सरकारी संस्थांनाच नव्हे तर स्टार्ट-अप आणि तळागाळातील डिजिटल उपक्रमांना डिजिटल इंडियाच्या लक्ष्याची पूर्तता करण्यासाठी प्रेरित करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हे डिजिटल इंडिया अवॉर्ड्स ( DIA) 2022 चे उद्दिष्ट आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, दळणवळण आणि रेल्वे मंत्री, अश्विनी वैष्णव, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे (MeitY) सचिव, अल्केश कुमार शर्मा आणि इतर मान्यवर नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात होणार्‍या या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

हा कार्यक्रम 7 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता सुरू होईल आणि दूरदर्शनवरून थेट प्रसारित होईल आणि नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर(NIC) च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ही त्याचे थेट प्रक्षेपण होईल:

NIC वेबकास्ट-  http://webcast.gov.in/digitalindiaawards

YouTube-  https://www.youtube.com/nationalinformaticscentre

ट्विटर-  https://twitter.com/NICMeity

फेसबुक-  https://www.facebook.com/NICIndia

नॅशनल पोर्टल ऑफ इंडिया (https://india.gov.in) च्या अंतर्गत डिजिटल इंडिया अवॉर्ड्सची सुरुवात केली गेली आहे, ज्याच्या माध्यमातून सर्व स्तरांवरील भारतीय सरकारी संस्थांद्वारे दिल्या जाणार्‍या माहिती आणि सेवांना एकल-खिडकी सुविधा प्रदान करते. या राष्ट्रीय पोर्टलची डिझाईन, निर्मिती आणि देखरेख भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY), नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या (NIC) माध्यमातून केली जाते.

डिजिटल इंडिया पुरस्कारांसाठी, सरकारी संस्थांच्या डिजिटल उपक्रमांची  नामांकनासह  निवड प्रक्रिया, राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलद्वारे (https://awards.gov.in), हे पोर्टल गृह व्यवहार मंत्रालयाच्या पुरस्कार महासंचालनालयाच्या माध्यमातून व्यवस्थापित केले जाते. सर्व राष्ट्रीय पुरस्कारांचे व्यवस्थापन करण्यासाठी  पंतप्रधानांच्या निर्देशानुसार एकीकृत पोर्टल विकसित आणि कार्यान्वित करण्यात आले आहे.यानंतर नामांकन प्रक्रिया भारतीय तंत्रज्ञान संस्था  (आयआयटी ) दिल्ली, या भागीदाराद्वारे अर्जांची   क्रमवारी केली जाते तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखालील   सरकार, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधींच्या परीक्षण समितीद्वारे  विजेत्यांची निवड केली जाते.

केंद्र सरकारची मंत्रालये/विभाग/कार्यालये/संस्था, राज्य सरकारचे विभाग/कार्यालये/संस्था, जिल्हा प्रशासन आणि परदेशातील भारतीय दूतावास  या पुरस्कारांसाठी अर्ज पाठवण्यासाठी  पात्र आहेत.

पुरस्कारांच्या 7 व्या आवृत्तीची घोषणा खालील सात श्रेणींमध्ये करण्यात आली आहे. :

1.नागरिकांचे डिजिटल सक्षमीकरण: जीवनमान सुलभतेसाठी सर्वत्र वापरण्यासाठी मान्यता, डिजिटल संसाधनांचा कधीही कुठेही वापर करण्यासाठी आणि सहभागी प्रशासन आणि डिजिटल साक्षरतेमध्ये आघाडीवर असलेल्या सहकार्याला प्रोत्साहन देणे

Award

Winners

Platinum

e-NAM (Ministry of Agriculture and Farmers Welfare)

Gold

Transport Mission Mode Project (eTransport) (Ministry of Road Transport and Highways)

Silver

Judgment Search Portal (e-Committee, Supreme Court of India)

2.तळागाळात राबवण्यात येणारे  डिजिटल उपक्रम:  पंचायत, स्थानिक  स्वराज्य  संस्था आणि उपजिल्हा स्तरावर कृषी, आरोग्य, शिक्षण, रोजगार, कामगार, कौशल्य इ. यांसारख्या क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता , ब्लॉकचेन, ड्रोन, आयओटी , एमएल , जीआयएस , इत्यादी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर  करणाऱ्या उपक्रमांचा सन्मान

Award

Winners

Platinum

e-Vivechna App (Madhya Pradesh)

Gold

DeGS Computer Basic Training (Jharkhand)

Silver

Ksheerasree Portal (Kerala)

3.व्यवसाय सुलभतेसाठी डिजिटल उपक्रम: व्यावसायिक उपक्रमांची स्थापना, संचालन आणि कार्यान्वयन  यामध्ये वेळ, खर्च आणि प्रयत्न कमी करून महत्त्वपूर्ण प्रभाव निर्माण करणाऱ्या डिजिटल उपक्रमांना प्रतिष्ठा मिळवून देणे

Award

Winners

Platinum

Mine Mitra (Uttar Pradesh)

Gold

eAbkari (Odisha)

Silver

Invest Punjab (Punjab)

4. डेटा समायिकीकरण  आणि सामाजिक आर्थिक विकासासाठी वापर: विश्लेषण, निर्णय घेणे, नवोन्मेष , आर्थिक विकास आणि सार्वजनिक हितासाठी देशात एक सचेत डेटा व्यवस्था  तयार  करण्यासाठी मंत्रालये/विभाग/संस्था, राज्ये, स्मार्ट शहरे आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे सरकारी डेटा केंद्रीय भांडारात सामायिक करणे.

Award

Winners

Platinum

Smart Cities Mission (Ministry of Housing and Urban Affairs)

Gold

Central Board of Secondary Education (CBSE)

Silver

Center for e-governance (Karnataka)

5.सार्वजनिक डिजिटल मंच  - केंद्रीय मंत्रालये, विभाग आणि राज्ये:   व्यापक व्याप्तीसह  आणि समाजात अत्यंत प्रभावशाली असलेल्या सार्वजनिक डिजिटल मंचाची  रचना आणि अंमलबजावणीमध्ये उत्कृष्टतेचा सन्मान करणे

Award

Winners – States

Platinum

Duare Sarkar (West Bengal)

Gold

e-Services Manipur (Manipur)

 

Award

Winners – Central Ministries, Departments

Platinum

ICEGATE Portal (Ministry of Finance, Department of Revenue)

Gold

eShram (Ministry of Labour and Employment)

 

6. स्टार्टअप्सच्या सहकार्याने डिजिटल उपक्रम: डिजीटल प्रशासनात  सुधारणा करण्यासाठी  आणि/किंवा परिवर्तनासाठी, डिजिटल सेवांचा अनुभव सुधारण्यासाठी आणि नागरिकांच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी स्टार्टअप्सच्या सहकार्याने सरकारी संस्थांद्वारे उत्कृष्टतेचा सन्मान

Award

Winners

Platinum

Digital Workforce Management System (Kerala)

Gold

Smart Nutrient Management of the Soil (Telangana)

Silver

Digital Deposit Refund System (Uttarakhand)

7.भारत सरकारच्या संकेतस्थळांच्या  मार्गदर्शक तत्वांचे (जीआयजीडब्लू )आणि उप्लब्धतेसंदर्भातील  मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणारे सर्वोत्तम वेब आणि मोबाइल उपक्रम : वेब आणि मोबाइल उपक्रमांमधील  समृद्ध आशय आणि कोणत्याही उपकरणावर  अडथळा मुक्त प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी पुरस्कार

Award

Winners

Platinum

Bilaspur District Website (Chhattisgarh)

Gold

Website of Kottayam District (Kerala)

Silver

Website of Central Institute of Petrochemicals Engineering and Technology (Ministry of Chemicals and Fertilizers, Department of Chemicals and Petro-chemicals)

 

S.Patil/Sonal C/Vikas/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1889125) Visitor Counter : 285


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi , Telugu