रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वर्ष अखेर आढावा 2022 : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

Posted On: 04 JAN 2023 4:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 जानेवारी 2023

 

ठळक वैशिष्ट्ये 2022

1. महामार्ग विकासाला मोठी चालना

a पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 57,020 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन/ पायाभरणी

b रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 230,802 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन / पायाभरणी

 2. रस्ते जोडणीला प्रोत्साहन:

a पुरस्कार/बांधकाम: मंत्रालयाने 5337 किमी राष्ट्रीय महामार्ग बांधले आणि 29 डिसेंबर 2022 पर्यंत 6318 किमी राष्ट्रीय महामार्ग (तात्पुरती आकडेवारी) पुरस्कृत केले.

b पर्वतमाला अंतर्गत रोपवे प्रकल्पांवर भर.

3. राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरणाच्या अनुषंगाने देशातील लॉजिस्टिक विकासाला मोठी चालना दिली जाईल, असे पंतप्रधानांनी जाहीर केले

a देशभरात 27 ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे (द्रुतगती मार्ग) विकसित केले जात आहेत

b सार्वजनिक- खाजगी भागीदारीतून (पीपीपी मोड) प्रथम मल्टिमोडल लॉजिस्टिक पार्कस (एमएमएलपी) सुरू करण्यात आली.

c आणखी 3 एमएमएलपीसाठी बोली प्रक्रिया सुरू आहे

4. नागरिकांसाठी ऑनलाइन सेवांची संख्या 18 वरून 58 पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) ला भेट द्यावी लागणार नाही.

5. भारत मालिकेची व्याप्ती वाढली; सध्या नियमित नोंदणी चिन्ह असलेली वाहने भारत मालिकेत  रूपांतरित केली जाऊ शकतात.

6. बीएस VI वाहनांमध्ये सीएनजी (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) आणि एलपीजी (लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस) किटच्या रेट्रोफिटमेंटला परवानगी आहे.

7. ग्राहकांना माहितीवर आधारित निर्णय घेता यावा म्हणून भारत नवीन मोटार मूल्यांकन कार्यक्रम (न्यू कार ॲसेसमेंट प्रोग्रास- एन कॅप) सुरक्षा रेटिंग सादर केले.

8. हिट अँड रन मोटार अपघातातील पीडितांना गंभीर अपघातासाठीची नुकसान भरपाई 12,500 रूपयांवरून 50,000 पर्यंत आणि मृत्यूसाठीची नुकसानभरपाई 25,000 रूपयांवरून 2 लाख  रूपयांपर्यंत वाढवण्यात आली.

9. हरित इंधन आणि वाहनांना चालना देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांची सुरक्षा वाढवण्यासाठी पावले उचलली

10. राष्ट्रीय महामार्गालगत अमृत सरोवर बांधणे

11. मुंबई शेअर बाजारात आणि राष्ट्रीय शेअर बाजारात

सूचीबद्ध भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पायाभूत सुविधा गुंतवणूक ट्रस्ट (एनएचएआय इन्फ्रास्ट्रक्चर इनव्हेस्टमेंट) बाँड्स

12. रस्ते, वाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्रांमधील समस्यांवर चर्चा करण्यासाठी बेंगळुरू येथे "मंथन" परिषद आयोजित केली गेली.

 राष्ट्रीय महामार्ग: बांधकाम आणि कामगिरी

1. देशातील रस्त्यांचे जाळे: जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रस्त्यांचे जाळे भारतात तयार करण्यात आले. सुमारे 63.73 लाख किमीचे हे जाळे आहे.

 रस्त्यांच्या विविध श्रेणींची लांबी खालीलप्रमाणे आहे.

राष्ट्रीय महामार्ग: 1,44,634 किमी

राज्य महामार्ग: 1,86,908 किमी

इतर रस्ते: 59,02,539 किमी

मालवाहतूक आणि प्रवाशांची वाहतूक अधिक चांगल्या रीतीने करून देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात राष्ट्रीय महामार्ग अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात.

हे मंत्रालय आणि त्याच्या अंमलबजावणी करणार्‍या संस्थांनी गेल्या 8 वर्षांत भारतातील राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधांची क्षमता वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत.

30 नोव्हेंबर 2022 पर्यंत देशातील राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी 1,44,634 किमी होती.

Sr. No.

Year

Length (in km)

1

2014-15

97,830

2

2015-16

1,01,010

3

2016-17

1,14,158

4

2017-18

1,26,500

5

2018-19

1,32,500

6

2019-20

1,32,995

7

2020-21

1,38,376

8

2021-22

1,41,345

9

2022-23

1,44,634*

 (* Till 30 November 2022)

Sr. No.

Year

Award

(in km)

Construction (in km)

Construction (in km / day)

1

2014-15

7,974

4,410

12.1

2

2015-16

10,098

6,061

16.6

3

2016-17

15,948

8,231

22.6

4

2017-18

17,055

9,829

26.9

5

2018-19

5,493

10,855

29.7

6

2019-20

8,948

10,237

28.1

7

2020-21

10,964

13,327

36.5

8

2021-22

12,731

10,457

28.6

9

2022-23

6318 (till 29 Dec 2022)

5337 (till 29 Dec 2022)

 

           

भारतमाला परियोजना: देशभरातील वस्तू आणि लोकांच्या वाहतुकीची कार्यक्षमता विकसित करणे हे भारतमाला परियोजनेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. भारतमाला परियोजनेचा पहिला टप्पा ऑक्टोबर 2017 मध्ये मंजूर झाला. 34,800 किमी राष्ट्रीय महामार्गांच्या विकासाद्वारे पायाभूत सुविधांमधील तफावत दूर करण्यावर हा टप्पा लक्ष केंद्रित करतो. पायाभूत सुविधा मिळण्यामधले सातत्य आणि रस्त्याच्या वापरकर्त्यांचा अनुभव याच्याशी सुसंगत कॉरिडॉर आधारित राष्ट्रीय महामार्ग विकासावर या परियोजनेने भर दिला आहे. आर्थिक कॉरिडॉर विकास, आंतर-कॉरिडॉर आणि फीडर मार्ग विकास, राष्ट्रीय कॉरिडॉर कार्यक्षमता सुधारणा, सीमा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडलेले रस्ते, किनारी भाग आणि बंदरांशी जोडलेले आणि द्रुतगती मार्ग हे या परियोजनेचे प्रमुख घटक आहेत.

नॅशनल हायवे इन्फ्रा ट्रस्ट (NHAI InvIT) बाँड्स: मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात 28 ऑक्टोबर 2022 रोजी NHAI InvIT बाँड्स यशस्वीरित्या सूचीबद्ध झाले. रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय महामार्ग इन्फ्रा ट्रस्ट (एनएचआयटी) ने सुरक्षित, रेटेड, लिस्टेड, रिडीमेबल, सिक्युरिटीज (बॉन्ड्स) 25 वर्षांच्या दीर्घ मुदतीच्या परिपक्वतेसह नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचरच्या इश्यूद्वारे 1,500 कोटी रुपये जमा केले.

सहामाही 7.9% देय असलेले, वर्षासाठी 8.05% व्याजावर कार्य करणाऱ्या कूपनवर रोखे जारी करण्यात आले होते.

किरकोळ गुंतवणूकदारांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी किमान गुंतवणुकीची रक्कम 10,000/- इतकी कमी ठेवण्यात आली होती.

एनएचआयटी बाँड्सना अनेक गुंतवणूकदारांकडून प्रचंड व्याज मिळाले आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी व्यवहार लवकर बंद करण्याचे आवाहन करण्यात आले.

7. अमृत सरोवर:

तलावांचा विकास आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी आझादी का अमृत महोत्सव, अमृत सरोवर च्या अंतर्गत अभियान हाती घेण्यात आलं आहे. माती, गाळ आणि या जलाशयांमधून काढलेल्या इतर गोष्टी राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामासाठी वापरल्या जात आहेत.

8. नितीन गडकरी यांनी प्रथमच तारण रोख्यांचा प्रारंभ केला.

या नव्या तारण/हमी रोख्यांमुळे पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी रोख रकमेची तरलता आणि क्षमता या दोन्हींच्या उपलब्धतेला नक्कीच चालना मिळेल आणि पायाभूत सुविधा क्षेत्राला बळकटी मिळेल.

नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन / पायाभरणी

  • 4,135.91 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन
  • विकासकामांत 3,500 कोटी रूपयांच्या जेएनपीटी पोर्ट रोड कनेक्टिव्हिटी प्रकल्पाचे राष्ट्रार्पण आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्प आणि प्रस्तावित नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाचे पूर्वेकडील प्रवेशद्वार (3 एप्रिल)  यांची पायाभरणी करण्यात आली.
  • जळगावमध्ये 2,460 कोटी रूपयांच्या 16  राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन व पायाभरणी केली. धुळे येथे 1,791.46 कोटी रुपयांच्या 2 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी केली (22 एप्रिल)
  • औरंगाबादमध्ये 5569 कोटी रुपयांच्या 7 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन(24 एप्रिल)
  • सोलापूरमध्ये 8,181 कोटी रूपये किमतीच्या 292 किमी लांबीच्या 10 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन (25 एप्रिल)
  • अहमदनगर येथे 331.17 कोटी रुपये खर्चून राष्ट्रीय महामार्ग-61 वर 3.8 किमी लांबीच्या 4-लेन एलिव्हेटेड स्ट्रक्चर फ्लायओव्हरच्या बांधकामाचे उद्घाटन केले. (19 नोव्हेंबर)

पंतप्रधानांनी 2 नवीन रोपवे प्रकल्पांची पायाभरणी केली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील गौरीकुंड ते केदारनाथ आणि गोविंदघाट ते हेमकुंड साहिब यांना जोडणाऱ्या दोन नवीन रोपवे प्रकल्पांची पायाभरणी केली. केदारनाथमधील रोपवे सुमारे 9.7 किमी लांबीचा असेल आणि तो केदारनाथला गौरीकुंडशी जोडेल.  त्यामुळे दोन ठिकाणांमधला प्रवास वेळ 6-7 तासांवरून कमी होऊन फक्त 30 मिनिटे होईल. हेमकुंड रोपवे हेमकुंड साहिबला गोविंदघाटाला जोडेल. त्याची लांबी सुमारे 12.4 किमी असेल आणि प्रवासासाठी एका दिवसापेक्षा जास्त इतका लागणारा वेळ कमी होऊन फक्त 45 मिनिटात हा प्रवास होईल. हा रोपवे घंगारिया इथल्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्स या राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वाराला जोडला जाईल.

आधार वापरून वाहतूक संबंधित सेवांचा लाभ घेण्यासाठी सुविधा: ड्रायव्हिंग परवाना, कंडक्टर परवाना, वाहन नोंदणी, परमिट, मालकीचे हस्तांतरण इत्यादी 18 नागरिक केंद्रित सेवा वाढवून 58 सेवा  सुरू करण्यासाठी मंत्रालयाने अधिसूचना जारी केली. त्याद्वारे आरटीओत जाण्याची गरज उरली नाही. या सेवांचा लाभ ऐच्छिक आधारावर आधार प्रमाणीकरणाच्या मदतीने घेता येतो. संपर्करहित आणि फेसलेस पद्धतीने अशा सेवा प्रदान केल्याने नागरिकांचे अनुपालन ओझे कमी होऊन वेळेची बचत होते. आरटीओमध्ये जाऊन पूर्वी जी पायपीट व्हायची ती लक्षणीयरीत्या कमी झाल्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढण्याची शक्यता आहे.

भारत (BS) मालिकेची व्याप्ती वाढवली:

मंत्रालयाने गव्हर्निंग भारत मालिका नोंदणी चिन्ह नियमांमध्ये सुधारणा अधिसूचित केल्या. मंत्रालयानं 2021 मध्ये नोंदणी चिन्ह मालिका सादर केली होती. या नियमांच्या अंमलबजावणीदरम्यान, अनेक भारत मालिकांची परिसंस्था मजबूत करण्यासाठी निवेदने प्राप्त झाली आहेत. भारत मालिकेच्या अंमलबजावणीत आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न म्हणून आणि त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी मंत्रालयाने नवीन मुख्य वैशिष्ट्यांसह नवीन नियम अधिसूचित केले आहेत.

रस्ता सुरक्षा: प्रतिबंधात्मक उपाय

  • साइड/साइड टॉरसो एअर बॅग आणि बाजूचा पडदा/ट्यूब एअर बॅग संबंधित नियम: मंत्रालयाने 30 सप्टेंबर 2022 च्या अधिसूचनेद्वारे नवीन नियमावली समाविष्ट करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
  • CMVR, 1989 च्या नियम 125 मधील उप-नियम 9B हा M1 श्रेणीच्या वाहनांमध्ये साइड/साइड टॉरसो एअरबॅग्ज आणि साइड पडदा/ट्यूब एअरबॅग्ज फिटमेंटसाठी तरतूद करण्यासाठी केला आहे.
  • अशा एअरबॅगची आवश्यकता वेळोवेळी सुधारणा केलेल्या AIS-099 च्या अनुपालनासह सत्यापित केली जाईल. सदर नियमाची अंमलबजावणी 1 ऑक्टोबर 2023 पासून प्रस्तावित आहे
  • सीट बेल्ट: मंत्रालयाने 30 सप्टेंबर 2022 रोजीच्या अधिसूचनेद्वारे मसुदा जारी केला. या अधिसूचनेत M1 श्रेणी ( प्रवासी वाहतूक करण्यासाठी वापरले जाणारे मोटार वाहन, ज्यामध्ये ड्रायव्हरच्या सीट व्यतिरिक्त 8 पेक्षा जास्त जागा नाहीत) त्या वाहनांमध्ये 1 एप्रिल 2023 रोजी आणि नंतर उत्पादित तीन पॉइंट सीट बेल्ट असलेली सर्व समोरासमोरील आसने प्रस्तावित आहेत.
  • महिला प्रवाशांची सुरक्षा (निर्भया रचनात्मक चौकटी अंतर्गत प्रकल्प): भारत सरकारने या अंतर्गत एक समर्पित निधी स्थापन केला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाद्वारे प्रशासित निर्भया योजनेतून आंध्र प्रदेश, उत्तर सरकारकडून राज्य मार्ग परिवहन महामंडळांना आणि बंगलोर महानगर परिवहन मंडळाला सार्वजनिक रस्ते वाहतुकीत महिलांची सुरक्षा वाढवण्यासाठी स्वतंत्र प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असून त्या प्रकल्पांची अंमलबजावणी विविध टप्प्यांत सुरू आहे.

लॉजिस्टिक्स संलग्न महामार्ग पायाभूत सुविधा

जालन्यातील मल्टिमोडल लॉजिस्टिक पार्क (एमएमएलपी) साठी सामंजस्य करार:

नितीन गडकरी आणि केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग तसेच आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड आणि जेएनपीटी यांच्यात जालना येथे मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क विकसित करण्यासाठा सामंजस्य करार झाला.

पोर्ट कनेक्टिव्हिटी

भारतात एकूण 226 बंदरे आहेत.त्यातील 12 प्रमुख बंदरे आहेत.

सध्या कार्यरत/अंमलबजावणीच्या टप्प्यात असलेल्या 87 बंदरांचा कनेक्टिव्हिटी किंवा क्षमता वाढीच्या दृष्टीने मूल्यांकनासाठी विचार केला जात आहे. देशात प्रमुख आणि प्रमुख नसलेली 55 बंदरे, एकूण 2,779 किमी लांबीचे हिंटरलॅण्ड प्रकल्प यापूर्वीच सुरू करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत 294 किमी लांबीचे 8 प्रकल्प पूर्ण झाले आहेत.

1,645 किमी लांबीचे 14 प्रकल्प कार्यान्वित आहेत, 363 किमी लांबीचे 13 प्रकल्प आणि 476 किमी लांबीचे 20 प्रकल्प अद्याप पूर्ण होणे बाकी आहेत.

केंद्र सरकार आणि प्रायोजक पुरस्कृत हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग किंवा 4 लेन+ कनेक्टिव्हिटी असलेली 45 सागरी बंदरे उपलब्ध करून दिली जातील

विक्रम/ पुरस्कार

  • विक्रमांच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहे. बिटुमिनस मिक्सच्या सर्वाधिक प्रमाणाचा विक्रम केल्याबद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने पुरस्कार दिला आहे.
  • सर्वात लांब फ्लेक्सीबल फूटपाथ (DBM कोर्स) असलेला रस्ता 100 तासात बांधण्याचे काम पीएनसी इन्फ्राटेक लिमिटेडला देण्यात आले. 8-लेन प्रवेश-नियंत्रित हा रस्ता या कंपनीने बांधून पूर्ण केला. भामिया गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग-47 च्या जंक्शनपासून सुरू झालेला हा रस्ता  पंचमहाल जिल्ह्यातील बलेतिया गावात संपतो.
  • टीम महाराष्ट्र मेट्रो आणि एनएचएआय टीमने 10 जुलै रोजी विश्वविक्रम केला.  महामार्गावर नागपूर उड्डाणपुलासह सर्वात लांब डबल डेकर व्हायाडक्ट (3.14 किमी) बांधला आणि मेट्रो रेलला सिंगल कॉलम पिअरवर आधार दिला.
  • एनएचएआय ने सर्वात जास्त वेळ सतत ठेवल्याबद्दल गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला आहे. अमरावती आणि अकोला जिल्ह्यांमधील राष्ट्रीय महामार्गावर 105 तास 33 मिनिटांत 75 किलोमीटरची बिटुमिनस लेन तयार करण्यासाठी स्वतंत्र सल्लागारांच्या अंमलबजावणी टीमसह 720 कामगारांनी रात्रंदिवस काम केले. एकल-लेन अखंडित एकूण 75 किलोमीटर लांबीचा हा बिटुमिनस काँक्रीटचा रस्ता 37.5 किलोमीटरच्या दोन पक्क्या लेनच्या समतुल्य आहे. हे काम 3 जून रोजी सकाळी 7:27 वाजता सुरू झाले आणि 7 जून रोजी 5 वाजता पूर्ण झाले. याआधीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा कतारच्या दोहा येथे बिटुमिनस 25.275 किलोमीटरचा रस्ता बांधण्यासाठी झाला होता. फेब्रुवारी 2019 मध्ये काम सुरू होऊन ते 10 दिवसात पूर्ण झाले होते.

 

S.Thakur/P.Jambhekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1888893) Visitor Counter : 1081


Read this release in: English , Hindi , Bengali , Tamil