विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

आगामी काळात जागतिक स्तरावरील भूमिका बजावण्यासाठी सक्षम होता यावे यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टीकोन साकार करण्यासाठी भारताने जागतिक मानकांच्या स्तरावर राहण्याचा निर्धार केल्याचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन


नागपूरमधील विज्ञान काँग्रेसच्या पार्श्वभूमीवर डॉ. जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्लीतल्या माध्यमांसह प्रादेशिक माध्यमांशी साधला संवाद

Posted On: 03 JAN 2023 10:16PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 जानेवारी 2023

 

आज येथे भारतीय विज्ञान काँग्रेसच्या निमित्ताने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि भू-विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, आगामी काळात जागतिक स्तरावरील भूमिका बजावण्यासाठी सक्षम होऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टीकोन साकार करण्यासाठी भारताने जागतिक मानकांच्या स्तरावर राहण्याचा निर्धार केला आहे.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, "महिला सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान" ही  यावर्षीच्या विज्ञान काँग्रेसची मध्यवर्ती संकल्पना अतिशय योग्य आणि विचारशील होती.

मंत्री म्हणाले, परिषदेत सर्वांगीण विकास, चक्राकार अर्थव्यवस्था आणि शाश्वत उद्दिष्टे यावर चर्चा केली जाईल, त्याचवेळी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील महिलांच्या विकासामधील संभाव्य अडथळ्यांवरही चर्चा केली जाईल.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, मोदी सरकारच्या गेल्या साडेआठ वर्षांच्या कार्यकाळात भारताने विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यामध्ये नवी उंची गाठली, आणि एव्हिएशन (हवाई) परिसंस्थेची पूर्ण क्षमता जाणून घेण्यासाठी, खासगी क्षेत्रासाठी अवकाश क्षेत्र खुले करण्यासारखे धाडसी निर्णय घेतले. भू-स्थानिक मार्गदर्शक सूचनांना मंत्रिमंडळाची मान्यता, ड्रोन धोरण आणि ब्लू इकॉनॉमीवरील मोदींचा भर, यासारख्या निर्णयांमुळे पुढील दशकात भारताला जगातील पहिल्या 5 देशांमध्ये निश्चितपणे स्थान मिळेल, असे माध्यम प्रतिनिधींच्या काही प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी सांगितले.

डॉ जितेंद्र सिंह यांनी माहिती दिली की, भारत जागतिक नवोन्मेष निर्देशांक क्रमवारी 2022 मध्ये 40 व्या स्थानावर, जागतिक संशोधन प्रकाशनात तिसऱ्या आणि नवीन स्टार्ट अप परिसंस्थेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. यामधून पंतप्रधानांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यावर दिलेले विशेष लक्ष सूचित होते, ज्यामुळे नवनवीन शोध लावण्यासाठी आणि नवीन कल्पनांसह प्रश्न सोडवण्यासाठी देशातील युवा वर्गाच्या कल्पनाशक्तीला चालना मिळाली.  

108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये शाश्वत विकास, महिला सक्षमीकरण आणि हे सर्व बाजूंनी साध्य करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भूमिका या विषयांवर चर्चा केली जाईल, असेही मंत्री म्हणाले.

 

* * *

S.Patil/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1888449) Visitor Counter : 157