ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनटीपीसीची 295.4 बिलियन युनिट(BU) उत्पादनासह 11.6% वाढ नोंदवत लक्षणीय कामगिरी

Posted On: 03 JAN 2023 4:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 जानेवारी 2023

 

  1. एनटीपीसीने एप्रिल-डिसेंबर 2022 दरम्यान एकेरी( स्टँड अलोन) आधारावर 254.6 बिलियन युनिट(BU) वीज उत्पादन  केले, जे मागील वर्षाच्या तुलनेत 16.1% ने जास्त आहे.
  2. एनटीपीसीने 14.6 एमएमटी  उत्पादन साध्य करून कॅप्टिव्ह खाणींमधून कोळसा उत्पादनात अभूतपूर्व वाढ दर्शवली आहे.
  3. एनटीपीसी समूहाची स्थापित क्षमता 70824  मेगावॉट आहे
  4. कंपनीने  3 गिगावॉट  नवीकरणीय  क्षमता पार केली.

एनटीपीसी या भारतातील सर्वात मोठ्या वीज निर्मिती कंपनीने एप्रिल-डिसेंबर 2022 या कालावधीत 295.4 बिलियन युनिट्स चे उत्पादन करत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 11.6% वाढ नोंदवली. एकेरी( स्टँड अलोन) आधारावर, एनटीपीसीने एप्रिल-डिसेंबर 2022 दरम्यान 254.6 बिलियन युनिट्स वीजनिर्मिती ,करत मागील वर्षाच्या तुलनेत 16.1% वाढ नोंदवली आहे.

कोळसा प्रकल्पांनी  आर्थिक वर्ष 23 मध्ये 9-महिन्याच्या कालावधीसाठी 73.7% पीएलएफ  नोंदविला होता, जो  आर्थिक वर्ष 22 मध्ये याच कालावधीत 68.5% होता. एनटीपीसीची उत्कृष्ट कामगिरी एनटीपीसीचे  अभियंते, कार्यान्वयन  आणि देखभाल पद्धती आणि एनटीपीसी  प्रणाली यांच्या कौशल्याची साक्ष आहे.

तसेच, एनटीपीसी ने 14.6 एमएमटी उत्पादन साध्य करून कॅप्टिव्ह खाणीतून  कोळसा उत्पादनात अभूतपूर्व वाढ दर्शविली आहे, जी मागील वर्षाच्या याच कालावधीच्या  तुलनेत 51% आहे.

एनटीपीसी समूहाची स्थापित क्षमता 70824  मेगावॅट आहे. अलीकडेच, कंपनीने नवीकरणीय क्षमतेचा  3 गिगावॉटचा टप्पा ओलांडला आहे.

 

 

* * *

S.Patil/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1888347) Visitor Counter : 209