श्रम आणि रोजगार मंत्रालय
वर्ष अखेर आढावा 2022: श्रम आणि रोजगार मंत्रालय
Posted On:
29 DEC 2022 7:42PM by PIB Mumbai
वर्ष 2022 मधील श्रम आणि रोजगार मंत्रालयाची प्रमुख कामगिरी आणि उपक्रम:
1. ई-श्रम
ई-श्रम पोर्टल 26 ऑगस्ट 2021 रोजी सुरू करण्यात आले आणि सुमारे 16 महिन्यांच्या अल्पावधीत 28.50 कोटींहून अधिक कामगारांची नोंदणी झाली आहे.
ई-श्रम हे 30 व्यापक व्यवसाय क्षेत्रांतर्गत 400 विविध व्यवसायांमध्ये नोंदणी करण्यास अनुमती देते.
ई-श्रम हे कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC), राज्य सेवा केंद्र (SSK), मोबाईल ऍप्लिकेशन (UMANG) आणि वेब ऍप्लिकेशन यांसारख्या अनेक माध्यमांद्वारे उपलब्ध आहे.
ई-श्रम पोर्टलवर प्लॅटफॉर्म कामगारांच्या नोंदणीचे मॉड्यूल 9 सप्टेंबर 2022 रोजी सुरू केले गेले आहे.
ई-श्रमसाठी संपूर्ण अद्ययावत कॉल सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. कॉल सेंटर वर्षातील 365 दिवस कार्यरत आहे आणि हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 8 प्रादेशिक भाषांमध्ये सेवा प्रदान करते.
एक सर्वसमावेशक तक्रार हाताळणी यंत्रणा आहे जी वर्षातील 365 दिवस उपलब्ध असते.
ई-श्रमवर असंघटित कामगारांच्या नोंदणीबाबत सांख्यिकीय माहिती देण्यासाठी एक व्यापक डॅशबोर्ड उपलब्ध करून देण्यात आला आहे.
विश्लेषण डॅशबोर्ड देखील विकसित होत आहे. अर्थपूर्ण यथार्थ ज्ञान, कल आणि धोरण तयार करण्यात मदत करण्यासाठी हे उपयुक्त ठरेल.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसह ई श्रम डेटा सामायिक करण्यासाठी डेटा सामायिकरण मार्गदर्शक तत्त्वे तयार केली गेली आहेत. हरियाणा राज्यासह प्रायोगिक एकीकरण पूर्ण झाले आहे आणि इतर राज्यांसह एकीकरण सुरू केले आहे.
त्याचप्रमाणे, केंद्रीय मंत्रालयांसोबत ई श्रम डेटा सामायिक करण्यासाठी एसओपी/मार्गदर्शक तत्त्वांवर चर्चा सुरू आहे.
ई श्रम डेटाच्या पडताळणीसाठी मोबाईल ऍप्लिकेशनबाबत विचारविनिमय सुरू आहे.
असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीकरिता राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांसाठी एक समान मॉडेल पोर्टल/ डेटा शेअरिंग पोर्टलवरही विचारविनिमय सुरू आहे.
ई-श्रम सोबत इतर पोर्टल्सची सांगड
असंघटित कामगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एनसीएस पोर्टलसोबत ई श्रम जोडण्यात आले आहे.
ई श्रम हे उमंग मोबाईल ऍप्लिकेशनशी जोडले आहे. कामगारांना नोंदणी आणि अद्ययावतीकरण सुलभ करण्यासाठी हे आता उमंग मोबाइल अॅपद्वारे उपलब्ध आहे.
ई श्रम ला प्रधानमंत्री श्रम योगी मान धन (पीएम -एसवायएम) सह एकत्रित केले गेले आहे, जी श्रम आणि रोजगार मंत्रालय द्वारे प्रशासित निवृत्तीवेतन योजना आहे. ई-श्रम वर नोंदणीकृत कोणताही कामगार युएएन वापरून पीएम-एसवायएम वर कधीही नोंदणी करू शकतो.
कामगारांना ई-श्रम कार्ड सहज आणि सुरक्षितपणे डाउनलोड करता यावे म्हणून ई-श्रम देखील डिजिलॉकर सोबत जोडले आहे.
ई-श्रम हे स्किल इंडिया पोर्टलसह जोडले जात आहे जे कामगारांना त्यांच्या गरजेनुसार आणि व्यवसायानुसार विविध कौशल्य कार्यक्रमांचा लाभ घेण्यास सक्षम करेल.
ईपीएफओ सोबत एकीकरण देखील चालू आहे - यामुळे संघटित/असंघटित म्हणून कामगाराची नेमकी स्थिती स्वयंचलित अद्ययावत माहिती/दर्शक प्रणालीद्वारे समजू शकेल. हे ई-श्रम डेटाबेसची नकल टाळण्यात मदत करेल आणि पात्र आणि योग्य वापरकर्ता गटांना विविध केंद्र आणि राज्य सरकारचा थेट लाभ हस्तांतरण / लाभ सुनिश्चित करेल.
डीएफपीडी (अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग) सह एकीकरण देखील नियोजित आहे. हे ओएनओआरसी मधील राज्यांतर्गत आणि आंतरराज्य पोर्टेबिलिटी व्यवहारांच्या विश्लेषणावर आधारित हंगामी, अल्पकालीन आणि दीर्घकालीन स्थलांतरण पद्धती ओळखण्यास सक्षम करेल, जे धोरण तयार करण्यासाठी श्रम आणि रोजगार मंत्रालयाला एक महत्त्वपूर्ण इनपुट प्रदान करेल.
(ii) पुरस्कार
श्रम आणि रोजगार मंत्रालयासाठी ई-श्रम हा एक प्रतिष्ठेचा प्रकल्प आहे. ई-श्रम ने डिजिटल इंडिया पुरस्कार -2022 मध्ये "सार्वजनिक डिजिटल प्लॅटफॉर्म - केंद्रीय मंत्रालये, विभाग" श्रेणी अंतर्गत "सुवर्ण पारितोषिक" जिंकले आहे. भारताच्या राष्ट्रपती 7 जानेवारी 2023 रोजी पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहतील आणि eShram टीमला हा पुरस्कार प्रदान करतील.
(iii) नोंदणीचा डेटा
28 डिसेंबर 2022 पर्यंतची ईश्रम पोर्टलवर असंघटित कामगारांची राज्यनिहाय नोंदणी…
SN
|
State
|
Total Registrations
|
1
|
UTTAR PRADESH
|
8,29,86,177
|
2
|
BIHAR
|
2,85,29,255
|
3
|
WEST BENGAL
|
2,57,36,690
|
4
|
MADHYA PRADESH
|
1,68,19,135
|
5
|
MAHARASHTRA
|
1,33,78,331
|
6
|
ODISHA
|
1,33,19,088
|
7
|
RAJASTHAN
|
1,27,44,236
|
8
|
JHARKHAND
|
91,18,026
|
9
|
GUJARAT
|
91,03,657
|
10
|
TAMIL NADU
|
83,05,074
|
11
|
CHHATTISGARH
|
82,40,953
|
12
|
ANDHRA PRADESH
|
78,72,913
|
13
|
KARNATAKA
|
73,04,135
|
14
|
ASSAM
|
68,87,931
|
15
|
KERALA
|
59,02,079
|
16
|
PUNJAB
|
54,93,483
|
17
|
HARYANA
|
52,43,117
|
18
|
TELANGANA
|
40,23,415
|
19
|
JAMMU AND KASHMIR
|
33,53,891
|
20
|
DELHI
|
32,47,916
|
21
|
UTTARAKHAND
|
29,70,380
|
22
|
HIMACHAL PRADESH
|
19,21,642
|
23
|
TRIPURA
|
8,43,199
|
24
|
MANIPUR
|
4,04,035
|
25
|
MEGHALAYA
|
2,83,250
|
26
|
NAGALAND
|
2,18,401
|
27
|
PUDUCHERRY
|
1,76,235
|
28
|
CHANDIGARH
|
1,73,901
|
29
|
ARUNACHAL PRADESH
|
1,40,011
|
30
|
THE DADRA AND NAGAR HAVELI AND DAMAN AND DIU
|
72,789
|
31
|
MIZORAM
|
58,083
|
32
|
GOA
|
51,379
|
33
|
ANDAMAN AND NICOBAR ISLANDS
|
28,404
|
34
|
LADAKH
|
28,355
|
35
|
SIKKIM
|
23,072
|
36
|
LAKSHADWEEP
|
2,410
|
|
TOTAL REGISTRATIONS
|
28,50,05,048
|
जागतिक कार्य शिखर परिषद
29 मे ते 11 जून 2022 या कालावधीत जिनिव्हा येथे आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेच्या 110 व्या सत्रादरम्यान आयएलओ आणि त्याच्या सदस्य राष्ट्रांकडून कामगार आणि आणि सर्वात असुरक्षित लोकांवर विशेष लक्ष केंद्रित करून शांतता, लवचिकता आणि सर्वसमावेशक विकासासाठी मानव-केंद्रित दृष्टिकोनातून जगातील अनेक संकटांचे सामाजिक परिणाम हाताळण्यासाठी तातडीच्या कारवाईबाबत चर्चा करण्याकरिता जागतिक कार्य (डब्ल्यूओडब्ल्यू) शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. श्रम आणि रोजगार मंत्री जागतिक कार्य शिखर परिषदेत सहभागी झाले होते आणि अनेक जागतिक संकटांना तोंड देण्यासाठी, मानवी केंद्रीत पुनर्प्राप्ती आणि लवचिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी उच्च-स्तरीय प्रतिनिधी मंडळाच्या चर्चेत सहभागी झाले होते.
भारताचे जी 20 अध्यक्षपद
जी 20 च्या शेर्पा प्रवाहाचा एक भाग म्हणून, भारत सरकारचे श्रम आणि रोजगार मंत्रालय, 04 रोजगार कार्य गट (EWG) बैठका आयोजित करत आहे, ज्याचा समारोप श्रम आणि रोजगार मंत्र्यांच्या बैठकीने होईल. जी 20 रोजगार कार्य गटाचा बहु-वर्षीय अजेंडा पुढे नेण्यासाठी, त्याच्या विचारार्थ खालील प्राधान्य क्षेत्रे आणि पूर्तता करण्यायोग्य बाबी निवडण्यात आल्या आहेत:
I. जागतिक कौशल्य तफावतीवर संबोधन: -
आंतरराष्ट्रीय कौशल्य तफावत मॅपिंग पोर्टल सध्याच्या आणि भविष्यातील कौशल्याच्या गरजांचे मूल्यांकन करण्यासाठी: भारताकडून 'जागतिक चांगले व्यवहार' म्हणून आयएलओ कडे सुपूर्द करणे
सामान्य कौशल्य वर्गीकरणावर लक्ष केंद्रित करणारे कौशल्य आणि पात्रता सुसुत्रीकरणासाठी एकत्रित आराखडा - जी 20 आयएलओ साठी 5 वर्षांत याची खात्री करेल.
II. गिग आणि प्लॅटफॉर्म अर्थव्यवस्था आणि सामाजिक संरक्षण: -
प्लॅटफॉर्म आणि गिग अर्थव्यवस्थांमधील कामगारांसाठी सामाजिक संरक्षणाची व्याप्ती वाढवणे
गिग आणि प्लॅटफॉर्म कामांसह कामाचे नवीन प्रकार अवलंबण्यासाठी राष्ट्रीय सांख्यिकीय क्षमता आणि पद्धतशीर दृष्टिकोन वाढवणे.
III. सामाजिक सुरक्षिततेसाठी शाश्वत वित्तपुरवठा: -
सामाजिक सुरक्षिततेकरिता शाश्वत वित्तपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सामाजिक विमा योजना आणि कर-वित्तपुरवठा योजनांसह धोरण पर्याय
सदस्य देशांमधील सामाजिक सुरक्षा प्रणालींना समर्थन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय विकास सहाय्य आणि यंत्रणा
जी 20 परिषदेनुसार, अध्यक्षपद आणि काही निवडक आंतरराष्ट्रीय संस्था, सदस्य देश आणि आमंत्रित देश रोजगार कार्य गटाच्या बैठकीदरम्यान वर उल्लेख केलेल्या प्राधान्य क्षेत्रांवर त्यांच्या कल्पना आणि अनुभव सादर करतील.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ)
i स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (AKAM) अंतर्गत ई-नामांकन- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा एक भाग म्हणून, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सदस्यांना ई-नामांकन दाखल करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी एक मोहीम सुरू केली आहे, कारण यामुळे सदस्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ईपीएफओ सेवांचा लाभ घेताना एक नवीन स्वातंत्र्य मिळेल. यामुळे मृत सदस्य/निवृत्तीवेतन धारकांच्या आश्रित कुटुंबातील सदस्यांना होणारा त्रास कमी होईल, कारण त्यांना निवृत्तीवेतन किंवा हमी लाभ मिळवण्यासाठी कायदेशीर वारसाहक्क/वारस प्रमाणपत्र किंवा इतर पुरावे सादर करावे लागणार नाहीत. 30.11.2022 पर्यंत दाखल 1.64 कोटी ई-नामांकनांपैकी 16.58 लाख ई-नामांकने दाखल होण्याचा विक्रम जानेवारी 2022 मध्ये विक्रमी झाला.
ii इंग्लंडसोबत सामाजिक सुरक्षा करारावर संयुक्त संवाद- भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामाजिक सुरक्षा करारावरील संयुक्त संवादाची दुसरी आभासी बैठक 19 जानेवारी, 2022 रोजी आयोजित करण्यात आली होती. भारताकडून ईपीएफओ, श्रम आणि रोजगार मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि वाणिज्य मंत्रालयातील अधिकारी सहभागी झाले होते.
iii स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव (AKAM) चा भव्य सप्ताह.- आंतरराष्ट्रीय महिला दिनी, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या भव्य कार्यक्रम आठवड्याच्या अनुषंगाने, ईपीएफओद्वारे महिलास्नेही उपायांची शृंखला:
i महिलांद्वारे दाखल सर्व दाव्यांवर 05 मार्च, 2022 पर्यंत प्रक्रिया करण्याचे लक्ष्य ठेवले. या उपक्रमाने आठवडाभरात सुमारे 638 कोटी रुपये किमतीचे 1,44,069 महिलांचे दावे निकाली काढले.
ii चेन्नई, बेंगळुरू, कोलकाता, दिल्ली आणि मुंबई येथे महिला हितधारकांना वन-स्टॉप सेवा प्रदान करण्यासाठी पहिल्यांदाच "महिला सक्षमीकरण डेस्क" सुरू करण्यात आले.
iii विशेष आठवडाभर चालणाऱ्या या मोहिमेमध्ये महिला सदस्यांच्या ई-नामांकनांना गती देण्यासाठी आस्थापनांशी हातमिळवणी करण्याचा आणि ईपीएफओ च्या क्षेत्रीय कार्यालयांकडून विशेष शिबिरांद्वारे सक्रियपणे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. कॉलला प्रतिसाद देताना 10,415 आस्थापनांनी त्यांच्या महिला कर्मचाऱ्यांच्या 10% ई-नामांकन नोंदवले. देशातील अवघ्या अव्वल 100 आस्थापनांमधून एकूण 07 लाख ई-नामांकन महिला सदस्यांनी दाखल केले होते.
6. कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी):
i ईएसआयसी 'चिंतन शिबीर', 17-18 ऑगस्ट 2022.- केंद्रीय श्रम आणि रोजगार, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री, भूपेंद्र यादव यांनी हरियाणातील सुरज कुंड येथे कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या इतिहासातील पहिल्या दोन दिवसीय ईएसआयसी 'चिंतन शिबिर' चे उद्घाटन केले. चिंतन शिबिराचा समारोप महत्त्वपूर्ण परिणामांसह आणि सेवा वितरण यंत्रणेत सुधारणा आणि विस्तारासाठी दूरगामी शिफारशींसह झाला. धोरण आणि अंमलबजावणी यातील दरी कमी करून ‘स्वास्थ्य से समृद्धी’ या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाची पूर्तता करण्यात हे परिणाम मदत करतील. हे पुढे एक गेम चेंजर ठरेल आणि सर्व श्रमयोगी आणि त्यांच्या अवलंबितांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
ii वैद्यकीय सुविधांचा विस्तार: वैद्यकीय सेवांचा विस्तार करण्यासाठी, कर्मचारी राज्य विमा महामंडळाने 76 नवीन रुग्णालये आणि 180 दवाखाने स्थापन करण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे.
iii मातृत्व लाभ: ईएसआयसी ने 10.11.2022 रोजी विमाधारक महिलांकरिता मातृत्व लाभासाठी ऑनलाइन दावा दाखल करता यावा म्हणून ऑनलाइन पोर्टल सुरू केले. या सुविधेमुळे कर्मचारी राज्य विमा योजनेंतर्गत समाविष्ट 58.69 लाख विमाधारक महिलांना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे ज्या आता त्यांच्या ईएसआयसी शाखा कार्यालयात कागदपत्रे सादर करण्यासाठी न जाता त्यांच्या सोयीस्कर वेळी आणि ठिकाणी मातृत्व लाभासाठी ऑनलाइन दावा करू शकतात.
iv महिला कामगार.- 08.03.2022 रोजी मंत्र्यांच्या (श्रम आणि रोजगार) हस्ते आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त वीटभट्ट्या आणि विडी कारखान्यात काम करणाऱ्या महिलांच्या रक्तक्षय तपासणीसाठी एक पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला. राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेश राज्यातील साठ महिला कामगारांना लक्ष्य गटाचा भाग बनवण्यात आले. या महिला कामगारांची मार्च 2022 ते सप्टेंबर 2022 पर्यंत दर महिन्याला जयपूर, फरिदाबाद आणि वाराणसी च्या ईएसआयसी रुग्णालयाद्वारे तब्येतीची नोंद ठेवण्यात आली. पथदर्शी प्रकल्पाचा परिणाम म्हणून, या विडी आणि वीटभट्टी महिला कामगारांमध्ये निरीक्षण केलेल्या वैद्यकीय चाचणी मापदंडानुसार लक्षणीय सुधारणा झाली आहे. उच्च रक्तदाब 23% वरून 5%, रक्तातील साखर 14.5% वरून 8.9% आणि अशक्तपणा 26% वरून 25% वर आला आहे.
आत्मनिर्भर भारत रोजगार योजना (एबीआरवाय)
23 नोव्हेंबर 2022 पर्यंत 1.51 लाख आस्थापनांमधील 60.13 लाख लाभार्थ्यांना 7833.27 कोटी रुपये एकूण लाभ देण्यात आला. तथापि, योजनेंतर्गत 23.11.2022 पर्यंत एकूण नोंदणी 75.11 आहे (आणि योजनेच्या अंतिम तारखेपासून हा आकडा स्थिर आहे).
दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण आणि विकास मंडळ (डीटीएनबीडब्ल्यूईडी)
दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण आणि विकास मंडळाची सर्वोच्च प्रशिक्षण संस्था असलेली भारतीय कामगार शिक्षण संस्था, ही डीटीएनबीडब्ल्यूईडी च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याव्यतिरिक्त सेंट्रल ट्रेड युनियन संघटना/फेडरेशन, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या कामगार संघटना कार्यकर्त्यांसाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करते, तसेच प्रादेशिक संचालनालय हे प्रादेशिक, युनिट/गाव स्तरावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतात. डीटीएनबीडब्ल्यूईडी वेगवेगळ्या कालावधीचे विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करते. डीटीएनबीडब्ल्यूईडी च्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये संघटित, असंघटित आणि ग्रामीण क्षेत्रातील कामगारांचा समावेश होतो.
नवीन उपक्रम -
i भविष्यातील रुपरेषेची शिफारस करण्यासाठी आणि डीटीएनबीडब्ल्यूईडी च्या प्रशिक्षण मॉड्यूल्स/प्रशिक्षण सामग्रीची पुनर्रचना करण्यासाठी श्रम आणि रोजगार मंत्रालयाने स्थापन केलेल्या रूपरेषा समितीच्या शिफारशींनुसार नवीन मॉड्यूलर प्रशिक्षण कार्यक्रमांचा परिचय. समितीच्या शिफारशी लागू केल्या.
ii IGNOU अर्थात इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठासोबत सामंजस्य करार – विविध विषयांवरील प्रशिक्षण कार्यक्रम आणि व्हिडिओसाठी सामग्री विकसित करण्यासाठी.
iii अलाहाबादच्या मोतीलाल नेहरू राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेसह सामंजस्य करार – प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधांची देवाणघेवाण करण्यासाठी.
iv राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ सोबत सामंजस्य करार – रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग (RPL) करिता कौशल्य वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रम (एसबीटीपी) सुरू करण्यासाठी
v. कामगार चौक / कामगार चौपाल: आवाक्याबाहेरील लोकांपर्यंत पोहोचणे: असंघटित कामगारांसाठी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा प्रचार करण्यासाठी, त्यांच्या समस्यांचा तसेच सरकारी योजनांमध्ये त्यांचा सहभाग लक्षात घेऊन, ई-श्रम पोर्टलमध्ये नावनोंदणीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी तसेच इतर सामाजिक सुरक्षा, श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत असंघटित कामगारांसाठीच्या योजना यासाठी श्रमिक चौक (लेबर मार्केट) येथे मोहीम आयोजित करण्याचे उद्दिष्ट.
vi स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत "महिला कामगारांवर लक्ष केंद्रित करून लोकसहभागासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी असंघटित आणि ग्रामीण क्षेत्रातील कामगारांचे प्रबोधन" या संकल्पनेवर विशेष कार्यक्रम.
vii श्री दत्तोपंत ठेंगडी यांची 102 वी जयंती 10 नोव्हेंबर 2022 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी दत्तोपंत ठेंगडी यांना आदरांजली वाहिली. त्यांनी कामगारांच्या शिक्षणातील ठेंगडीच्या योगदानावर प्रकाश टाकला आणि सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा योजनांची संकल्पना मांडली. यादव यांनी डीटीएनबीडब्ल्यूईडी च्या प्रशिक्षण सामग्रीवर सहज प्रवेश करण्यासाठी QR कोडसह मंडळाने तयार केलेला डिजिटल साक्षरतेचा एक शैक्षणिक व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला आहे.
***
S.Thakur/V.Joshi/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1888308)
Visitor Counter : 362