अंतराळ विभाग
अणुऊर्जा विभागाचे (DAE) 2014 ते 2022 या कालावधीतील वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम
Posted On:
31 DEC 2022 11:24AM by PIB Mumbai
a.अप्सरा-यू(APSARA-U)(BARC)- औषध, उद्योग आणि कृषी क्षेत्रातील वाढीव उत्पादनांच्या अनुप्रयोगांसाठी,तयार केलेला 2 MWth पूल प्रकारातील किरणोत्सारी रीॲक्टर (Radioactive Isotope) 10 सप्टेंबर 2018 रोजी कार्यान्वित झाला. या सुविधेचा वापर रेडिओ आयसोटोप्सच्या उत्पादनाचे विकिरण करण्यासाठी केला जात आहे.
b.ध्रुव (BARC): हा रीॲक्टर अतिशय उच्च उपलब्धतेच्या घटकांवर चालवला जातो आणि अनेक राष्ट्रीय संस्था आणि विद्यापीठे यांच्याद्वारे आण्विक आणि संबंधित विज्ञानातील अभ्यासाव्यतिरिक्त गेल्या आठ वर्षांत सुमारे 4000 नमुन्यांचे या रीॲक्टरने विकिरणन केले.
c. IGCAR / FBTR (फास्ट ब्रीडर टेस्ट रिएक्टर): युरेनियम कार्बाइड आणि प्लुटोनियम कार्बाईड हे स्वदेशी डिझाइन केलेले आणि विकसित इंधन वापरून एफबीटीआरने (FBTR) 40 मेगावॅट (MWt) इतकी रेटेड क्षमता गाठली आणि 10 MWe चे उत्पादन करून तो ग्रिडशी जोडला गेला. त्याचे एकूण पूर्ण प्रभावी क्षमतेने काम करण्याचे उर्जा दिवस (EFPD) 128 दिवस आहेत आणि या वर्षी (2022) त्यातून 23.5 दशलक्ष युनिट्स विद्युत ऊर्जा उत्पादित केली गेली आहे आणि 2014-2022 या कालावधीत एकूण 75.8 दशलक्ष युनिट विद्युत उर्जेचे उत्पादन यातून झाले आहे.
d.आयजीसीएआर/मेटल फ्युएल पिन फॅब्रिकेशन(GCAR/Metal Fuel Pin Fabrication Facility) सुविधा:उच्च शुद्धता इनर्ट वातावरण ग्लोव्ह बॉक्स ट्रेन, सोडियम बॉन्डेड मेटल फ्युएल पिन फॅब्रिकेशन या सुविधेसह स्थापन करण्यात आली. यूरेनियम-पॉलीयुरेथेन- झर्कोनियम (U-Pu-Zr) या धातूंच्या सहाय्याने विकिरणन करत त्यांच्या एफबीटीआर (FBTR) वरून इंधन पिनांच्या चाचण्या केल्या जात आहेत. ही सुविधा भारताच्या माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते मे 2018 मध्ये राष्ट्राला समर्पित केली गेली होती.
2. ऊर्जा निर्मिती
a. नॅशनल पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया/तारापूर अणुशक्ती केंद्र (NPCIL/ TAPS) 1 आणि 2 यांना कार्यरत होऊन 53 वर्षे पूर्ण झाली आहेत,या जगातील सर्वात जुन्या कार्यरत अणुभट्ट्या आहेत.
b. नॅशनल पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCIL) आतापर्यंत सुमारे 582 अणुभट्ट्या तयार केल्या आहेत.
c. नॅशनल पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया/केजीएस-1(NPCIL/KGS-1) याद्वारे 962 दिवस सतत काम करून जागतिक विक्रमाची स्थापना; RAPS-5 चे 765 दिवस (2 वर्षांपेक्षा जास्त) सतत ऑपरेशन; आरएपीएस-3 (RAPS-3) द्वारे सतत 777 दिवस काम करण्याचा विक्रम (दोन वर्षांहून अधिक काळ)दिवस;एनएपीएस -2(NAPS- 2) चा सतत 852 दिवस सतत काम करण्याचा विक्रम; आतापर्यंत 42 वेळा भारतीय अणुभट्ट्यांचा एक वर्षाहून अधिक काळ सततकाम करण्याचा विक्रम;
d. नॅशनल पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया/कॅपेक्स(NPCIL/ CAPEX) 2021-22 मध्ये 14235 कोटी रुपये.
e. नॅशनल पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया-लाभांश -2021-22 मध्ये एनपीसीआयएलचा लाभांश 1897 कोटी रुपये
f. नॅशनल पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया/सीएस आर(NPCIL/ CSR)यांचा खर्च अनुक्रमे 1897 कोटी रुपये आणि 101.96 कोटी रुपये.
3.रेडिओ-आयसोटोप उत्पादन
भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र (BARC)कर्करोगाच्या उपचारांसाठी स्वदेशी बनावटीच्या विकासासाठी आणि परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होणाऱ्या अनेक रेडिओफार्मास्युटिकल एजंट्सचा प्रत्यक्ष उपचारांमधे सहभाग(क्लिनिकल ट्रान्सलेशन) यामध्ये 177Lu-DOTA-TATE, 177Lu-PSMA-617, 177Lu-EDTMP, 177Lu-DOTMP, 90Y-hydroxyapatite अशा अतिसूक्ष्म-कणांचा समावेश आहे. Yttrium-90 च्या तीन वेगवेगळ्या रचना विकसित करून वापरात आणल्या गेल्या.
b.भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र(BARC)/ कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करण्याच्या तत्त्वज्ञानावर आधारित काम करताना, सुमारे 1 लाख Cis चे Cs पुनर्प्राप्तीकरण करण्यात आले आणि त्यातील सुमारे 6 किलोच्या पेन्सिलमध्ये विकिरणांसाठी त्यांचे रूपांतर केले गेले.
c. बीएआरसी/ब्रिट(BARC/BRIT) 106Ru इतक्या अणु कचऱ्यापासून 106Ru सिल्व्हर प्लाकमधून सर्क्युलर कॉन्फिगरेशन प्रक्रियेद्वारे पुनर्प्राप्त केले गेले; ज्याचा उपयोग डोळ्यांच्या कर्करोगाच्या उपचारासाठी तंत्रज्ञान यशस्वीरित्या विकसित करण्यासाठी केला गेला आहे. दिल्लीतील एम्ससहीत सर्व रुग्णालयांना या प्लाकाचा पुरवठा करण्यात आला.
d. ब्रिट(BRIT)/, Co-60 आधारित ब्लड इरेडिएटरला पर्याय म्हणून Cs-137 आधारित ब्लड इरेडिएटर विकसित करून वापरला गेला. Co-60 ब्लड इरेडिएटरच्या तुलनेत त्याचे आयुष्य अधिक काळासाठी उपयुक्त आहे.
4.कर्करोग सेवा
टाटा स्मारक केंद्र, येथे फक्त मुंबईत दरवर्षी जवळपास 80,000 नवीन रूग्णांची नोंदणी होत असते आणि 650,000 पेक्षा जास्त उपचाराधीन रुग्ण येत असतात. हे देशभरातील रूग्णांना त्यांची सामाजिक आर्थिक स्थिती आणि पैसे देण्याची त्यांची क्षमता लक्षात न घेता उच्च दर्जाची कर्करोग सेवा प्रदान करते; 60% पेक्षा जास्त रुग्णांवर जवळजवळ मोफत उपचार केले जातात.
5 TMC/ राष्ट्रीय स्तरावरील
नॅशनल कॅन्सर ग्रिड - संपूर्ण भारतामध्ये कॅन्सर सेवेचे एकसमान मानक तयार करण्याच्या व्यापक दृष्टीकोनासह 2012 मध्ये नॅशनल कॅन्सर ग्रिड तयार केले गेले.आता आठ वर्षांनंतर, ते 287 सदस्यांसह जगातील सर्वात मोठे कर्करोगासाठी नेटवर्क बनले आहे, ज्यामध्ये कर्करोग केंद्रे, संशोधन संस्था, रुग्णांची काळजी घेणारे गट(स्वमदत गट), सेवाभावी संस्था आणि व्यावसायिक संस्था यांचा समावेश आहे. नॅशनल कॅन्सर ग्रिडमधील (NCG) नेटवर्क सदस्य संघटना दरवर्षी 750,000 नवीन कर्करोगाच्या रूग्णांवर उपचार करते, जी संख्या संपूर्ण भारतातील कर्करोगाच्या एकूण संख्येहून 60% पेक्षा अधिक आहे.
•नॅशनल कॅन्सर ग्रिड NCG आयुष्मान भारत – प्रधान मंत्री जन आरोग्य योजना
नॅशनल कॅन्सर ग्रिड (NCG) हे आयुष्मान भारत – प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेसोबत
(AB-PMJAY) जोडलेले असून लक्षणांवर आधारित कर्करोगाची काळजी घेण्यासाठी आणि योजनेंतर्गत विविध सेवा देण्यासाठी सहयोग देते.पंतप्रधानांनी नुकत्याच सुरू केलेल्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानात (NDHM) मध्ये नॅशनल कॅन्सर ग्रिडने तयार केलेल्या रूग्ण आरोग्य नोंदवही (पेशंट हेल्थ रेकॉर्ड ,PHR) मोठ्या प्रमाणावर वापरली गेली.
•टाटा स्मारक केंद्राने (TMC) ने एक मोठी विस्तार योजना हाती घेतली असून त्यामुळे रुग्ण सेवा क्षमता चारपट वाढेल तसेच देशातील अनेक भौगोलिक भूभागांना त्याचा लाभ मिळेल. टाटा मेमोरियल सेंटरने(TMC) आता वाराणसी (2), गुवाहाटी, संगरूर, विशाखापट्टणम, चंदीगड आणि मुझफ्फरपूर इत्यादी सहा ठिकाणी आपल्या रुग्णालयांचा विस्तार केला आहे.
पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीर, आंध्र प्रदेश यांसारख्या ठिकाणच्या कर्करोग सेवेला बळकट करण्यासाठी केंद्र सरकार विविध राज्य सरकारांना तांत्रिक सहाय्य देत आहे.
•ॲक्ट्रेक म्हणजे कर्करोगावरील अत्याधुनिक उपचार, संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रात (ACTREC), ज्याची संख्या गेल्या वर्षीपर्यंत 100 खाटांची होती, ती यावर्षी 500 खाटांपर्यंत विस्तारली आहे (2023 च्या मध्यापर्यंत ती 900 खाटांपर्यंत इतकी वाढेल), आणि सॉलिड ट्यूमर केमोथेरपी, हेमॅटो-लिम्फॉइड कर्करोग व्यवस्थापन,उपचार यासाठी रेडिओन्यूक्लाइड आइसोटोपसह सुविधांसह अत्याधुनिक उपचार प्रदान करेल तसेच भारतात तीन ठिकाणी धातूच्या सांगाड्यावर असलेली प्रोटॉन बीम थेरपी युनिट बसविण्यात आली आहेत ज्यातील एक सरकारी रुग्णालयात सुरू करण्यात आले आहे.
• 2017 मध्ये 740 खाटांपासून सुरुवात करून,टाटा मेमोरियल सेंटरमध्ये (TMC)खाटांची संख्या 2450 पर्यंत(2022 मध्ये)वाढली आहे आणि 2023 च्या मध्यापर्यंत तिची क्षमता 2700 खाटांपर्यंत वाढेल. सध्या, टीएमसी दरवर्षी सुमारे 125,000 नव्या कर्करोगाच्या रूग्णांवर उपचार करते (संपूर्ण भारतातील कर्करोगाच्या रुग्णांपैकी अंदाजे 10%इतका हा भार आहे).
• कर्करोग सेवेचे हब आणि स्पोक मॉडेल पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये यशस्वीरित्या लागू करण्यात आले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानावरील संसदीय समितीने आपल्या 325 व्या अहवालात आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण संसदीय स्थायी समितीच्या 139 व्या अहवालात याला दुजोरा दिला आहे.
•टीएमसी(TMC)/ आंतरराष्ट्रीय स्तरावर
नॅशनल कॅन्सर ग्रिडचा (एनसीजी) आंतरराष्ट्रीय घटक एनसीजी “विश्वम” याची निर्मिती केल्यामुळे, हे नेटवर्क कर्करोगाच्या सेवा उपचारांसाठी जागतिक स्तरावर सर्वात प्रभावशाली संस्था म्हणून झपाट्याने लौकिक प्राप्त करत आहे.
•टीएमसी(TMC) मधील कमी किमतीच्या उपचारांच्या अंमलबजावणी करण्यायोग्य संशोधनानुसार जागतिक स्तरावर कर्करोगाची काळजी घेण्याची परिस्थिती बदलली आहे, विशेषत:आफ्रिका आणि विकसनशील जगात जेथे या सेवा अंमलबजावणी करण्याच्या योग्य मार्गदर्शक तत्त्वांचा भाग बनल्या आहेत. स्तनाच्या कर्करोगावरील तीन नवीन संशोधन अभ्यास या वर्षीच सादर केले गेले ज्यात कमी खर्चात आणि स्वदेशी हस्तक्षेपांचा वापर करून जगण्याच्या श्रेणीत लक्षणीय सुधारणा करण्यात यश आले आहे आणि जागतिक स्तरावर यांचा वापर करून केल्यावर 100,000 हून अधिक जीव वाचतील,अशी अपेक्षा आहे.
5. अन्न प्रक्रिया/संरक्षणासाठी अणु कृषी आणि रेडिएशन तंत्रज्ञानाचा वापर
a. बीएआरसी BARC/आतापर्यंत बीएआरसी ने लागवडीसाठी पिकांच्या 55 जाती विकसित केल्या आहेत, ज्यात भुईमूग, मूग डाळ, चणाडाळ, उडीद डाळ, मोहरी, सोयाबीन, चवळी, तांदूळ, ताग आणि सूर्यफूल यांचा समावेश आहे. 13 नवीन बियाणांची वाणे शोधली.
b.BARC/ पर्यावरण पूरक आणि जैवविघटनशील (इको-फ्रेंडली आणि बायोडिग्रेडेबल) BARC-हायड्रोजेल आणखी सुधारित केले आहे जे स्वतःच्या वजनाच्या 550 पट पाणी शोषून घेऊ शकते.
c.बीएआरसी BARC/ 13 विकिरणीकरण करणाऱ्या (फूड इरॅडिएशन प्लांट)प्रकल्पांची स्थापना करण्यात आली आहे.त्यात बीएआरसीच्या अणुशक्ती (BARC-DAE) तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प भारतीय कृषी संशोधन विभागाच्या (आयकार ICAR) मुशाहारी, मुझफ्फरपूर, बिहार येथील राष्ट्रीय संशोधन केंद्रात लिचीवर ट्रीटमेंट करणारा प्रकल्प 29 मे 2017 रोजी कार्यान्वित करण्यात आला. जामुन उत्पादन, मोड आलेली कडधान्ये आणि मक्याची कणसे, बेकरी पदार्थ,कालवे (कवच असलेले मासे)संरक्षण करण्यासाठी माध्यम, माशांच्या सूपाची पूड अशा प्रकारचे अन्न तंत्रज्ञान विकसित करून ते अलीकडेच व्यावसायिक वापरासाठी वेगवेगळ्या कंपन्यांकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. सर्व गुणवत्तेचे गुणधर्म टिकवून 28 टन बटाट्यांचे शेल्फ लाइफ 100 दिवसांपासून आठ महिन्यांपर्यंत राखून ठेवण्यासाठी
गामा रेडिएशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.
6.तंत्रज्ञान हस्तांतरण-बीएआरसी
BARC/ग्रामीण आरोग्य सेवेसाठी, हातात घेऊन जाण्यासारखे, कमी किमतीचे 12-चॅनलचे टेली-ईसीजी (Tele- ECG) साधन, योग्य विकसित केले गेले.हे साधन मोबाइल फोन वापरून ब्लूटूथद्वारे ऑपरेट केले जाऊ शकते.
•बीएआरसी(BARC)/गाळाचे सेंद्रिय खतामध्ये रूपांतर करण्यासाठी रेडिएशन हायजिनायझेशन तंत्रज्ञान - अहमदाबाद येथे अशाप्रकारची 100 टन/दिवस क्षमतेची पहिली सुविधा बांधण्यात आली आहे. अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन (AMC) प्लांटचे 2019 मध्ये उदघाटन करण्यात आले होते; इंदूर येथे येणारा प्लांट दुसरा आहे तर पुणे महानगरपालिकेसोबत तिसऱ्या युनिटसाठी सामंजस्य करार केला गेला आहे.
c.बीएआरसी(BARC)/ भाभा कवच -हॉट-प्रेस्ड बोरॉन कार्बाइड (HPBC) आणि कार्बन नॅनोट्यूब (CNT)या स्वदेशी विकसित तंत्रज्ञानाचा वापर करून,खास डिझाइन केलेली बुलेट प्रूफ जॅकेट्स (BPJs)तयार करण्यात आली आहेत.हे तंत्रज्ञान एप्रिल 2017 मध्ये मेसर्स मिधानी आणि आणखी 3 नामांकित कंपन्यांकडे हस्तांतरित करण्यात आले. लेव्हल III+ भाभा कवचने केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आणि सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) टीमसाठी यशस्वीरित्या पात्र चाचण्या केल्या आणि लेव्हल IV घ्या धोक्यासाठी बोरॉन कार्बाइड-सीएनटी कोटेड पॉलिमर कंपोझिट बॅलिस्टिक आर्मरची यशस्वी चाचणी केली.
d.बीएआरसी(BARC)/निसर्गऋण - जैवविघटनशील घनकचऱ्याची स्वच्छता प्रक्रिया आणि विल्हेवाट लावण्यासाठी तंत्रज्ञान: स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून माथेरान नगरपरिषदेसह अनेक शहरांमध्ये निसर्गऋण प्रकल्प राबविण्यात आला.केरळमधील कन्नूर गावात दररोज 1000 किलो कचरा निसर्गऋण बसवले आहे. निसर्गऋण संयंत्रामधून उत्पादित बायोगॅसचा वापर स्वयंपाकघरात इंधन म्हणून केला जातो.
e. बीएआरसी (BARC)/ जल उपचार तंत्रज्ञान - महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार आणि ओरिसा राज्यातील अनेक गावांमध्ये हे तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे.
f.बीआरएसी(BARC)/ समुद्राचे पाणी गरम करून त्याचे विविध कारणांसाठी शुध्दीकरण (थर्मल व्हेपर कॉम्प्रेशनवर आधारित थर्मल सीवॉटर डिसेलिनेशन तंत्रज्ञान मल्टी इफेक्ट डिस्टिलेशन) तंत्रज्ञान दोन उद्योजकांना हस्तांतरित करण्यात आले.
7•नागरी आण्विक सहकार्य:
जपान, ग्रेट ब्रिटन, व्हिएतनाम, बांग्लादेश या देशांसोबत अणुऊर्जेच्या शांततापूर्ण वापरासाठी नागरी आण्विक सहकार्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
बांगलादेशमध्ये अणुऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यासाठी रशिया, बांगलादेश आणि भारत यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार.
कॅनडासोबत अणु संशोधन आणि विकास सहकार्य करार.
8•प्रकाशन आणि पेटंट
a सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्स (CEBS)/ या विभागात 516 हून अधिक वैज्ञानिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.
b गेल्या 8 वर्षांत, अणुऊर्जा विभागाने (DAE) अंदाजे 156 पेटंट दाखल केले आहेत (80 भारतीय आहेत, 13 पीसीटी आहेत आणि 63 परदेशी आहेत) त्यापैकी सुमारे 121 पेटंट्स आतापर्यंत मंजूर झाली आहेत.उर्वरित मंजुरीसाठी प्रतिक्षेच्या विविध टप्प्यात आहेत.
c.इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स IOP/ आंतरराष्ट्रीय समीक्षकांच्या समीक्षित शोधपत्रिकांमधून 700 हून अधिक पेपर प्रकाशित झाले आहेत.
d.राजा रामण्णा अत्याधुनिक तंत्रज्ञान केंद्र(RRCAT)/ सुमारे 120 एमटेक/एमएस्सी (M.Tech/ M.Sc) विद्यार्थ्यांना राजा रामण्णा अत्याधुनिक तंत्रज्ञान केंद्राच्या संशोधन आणि विकास प्रयोगशाळेत (R & D lab) दरवर्षी प्रशिक्षण दिले जाते.
e.इंदिरा गांधी परमाणू अनुसंधान केंद्र (IGCAR)/ एक भारतीय पेटंट (पेटंट क्रमांक वाटप: 396872) 13 मे 2022 रोजी “ब्लॉक एन्क्रिप्शन आणि सिंक्रोनस स्ट्रीम सिफर" या साठी एक पद्धत आणि उपकरण” आयजीकारने (IGCAR) मंजूर केले.
f.इंदिरा गांधी परमाणू अनुसंधान केंद्राची (IGCAR) प्रकाशने आणि स्पष्टिकरणे: आयजीकारची (IGCAR) प्रकाशने विज्ञान अनुक्रमित जर्नल्सच्या स्कोपस/ वेबमध्ये उत्तम प्रभाव टाकत आहेत. स्कोप्स सायटेशन (Scopus Citation) माहितीनुसार प्राप्त केलेले प्रकाशन आणि उदाहरणांची सूची खाली दिली आहे: (स्रोत: Scopus, dt. 09.12.2022)
***
S.Thakur/S.Patgaonkar/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1888009)
Visitor Counter : 492