कृषी मंत्रालय
केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे आणि भारतीय दूतावासांद्वारे हाती घेतलेल्या केंद्रित उपक्रमांसह आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष (IYM) 2023 ची सुरुवात
Posted On:
01 JAN 2023 5:12PM by PIB Mumbai
- मोठ्या प्रमाणावर भरड धान्य लागवडीला आणि वापराला प्रोत्साहन देणे आणि आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष (IYM)च्या माध्यमातून ते संपूर्ण जगासमोर आणण्याचे कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग(DA&FW) चे उद्दिष्ट आहे.
- केंद्रीय मंत्रालये, राज्ये आणि भारतीय दूतावास आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाच्या प्रचारासाठी आणि भरड धान्यांच्या फायद्यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी तसेच विविध उपक्रम राबविण्यासाठी वर्ष 2023 मध्ये संपूर्ण एक महिना लक्ष केंद्रित करणार
- भारत सरकारच्या क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालय आणि छत्तीसगड, मिझोराम आणि राजस्थान राज्यांसाठी आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षासाठी (IYM) विविध कार्यक्रम/उपक्रम आयोजित करण्यासाठी जानेवारी 2023 हा केंद्रित उपक्रमांचा महिना म्हणून निश्चित करण्यात आला आहे.
पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली, भारत सरकारकडून आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष (IYM) 2023 चा प्रस्ताव मांडण्यात आला होता जो संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने (UNGA) स्वीकारला होता. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे करत असताना भारत सरकारला आघाडीवर ठेवण्यासाठी ही घोषणा महत्त्वपूर्ण ठरली आहे. भारताचे पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी देखील भारत हे भरड धान्याचे जागतिक केंद्र असल्याचे दर्शवत, आय वायएम (IYM) 2023 ला 'लोक चळवळ' बनवण्याचा त्यांचा दृष्टीकोन स्पष्ट केला आहे.
सिंधू संस्कृतीच्या काळात भरड धान्ये ही पिके अन्न म्हणून वापरात आलेली पहिले पीके होती हे अनेक पुराव्यांसह स्पष्ट झाले आहे. सध्या 130 हून अधिक देशांमध्ये भरड धान्ये पिकवली जात असल्याने आशिया आणि आफ्रिकेतील अर्ध्या अब्जाहून अधिक लोकांसाठी बाजरी हे पारंपरिक अन्न मानले जाते. भारतात, भरड धान्ये ही प्रामुख्याने खरीप पीके आहेत, ज्यांना इतर तत्सम मुख्य पिकां पेक्षा कमी पाणी आणि कृषी निविष्ठांची आवश्यकता असते. भरड धान्ये ही जगभर उपजीविका निर्माण करण्याच्या, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या आणि अन्न आणि पौष्टिक मूल्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या त्याच्या प्रचंड क्षमतेमुळे महत्त्वाची आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या(UN) अनेक शाश्वत विकास उद्दिष्टांना (SDGs) अनुसरून असलेल्या भरड धान्यांच्या प्रचंड क्षमतेला विचारात घेऊन, भारत सरकारने (GoI) भरड धान्यांना प्राधान्य दिले आहे. एप्रिल 2018 मध्ये, भरड धान्यांचे "न्यूट्री सीरिअल्स" म्हणून पुनर्नामकरण करण्यात आले, त्यानंतर 2018 हे वर्ष भरड धान्ये राष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करण्यात आले, ज्याचा उद्देश मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन आणि मागणी निर्माण करणे आहे. वर्ष 2021-2026 दरम्यानच्या अंदाज कालावधीत जागतिक भरड धान्य बाजाराचा कंपाउंड ऍन्युअल ग्रोथ रेट CAGR 4.5% राहण्याचा अंदाज आहे.
6 डिसेंबर 2022 रोजी, संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने (FAO) इटली रोम,येथे आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष - 2023 साठी उद्घाटन समारंभ आयोजित केला. या कार्यक्रमाला भारतातील वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते. याच श्रृंखलेत पुढे, ‘आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष (IYM) 2023’ या वर्षभराच्या उत्सवापूर्वी, कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने संसद भवनात संसद सदस्यांसाठी खास ‘भरड धान्य भोजन’ आयोजित केले होते.
कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष (IYM) 2023चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि भारतीय भरड धान्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी सक्रिय बहु-स्टेकहोल्डर प्रतिबद्धता( सर्व समावेशी) (सर्व केंद्र सरकारची मंत्रालये, राज्ये/केंद्रशासित प्रदेश, शेतकरी, स्टार्ट-अप्स, निर्यातदार, किरकोळ व्यवसाय, हॉटेल्स, भारतीय दूतावास इत्यादींना समाविष्ट करण्याचे) धोरण हाती घेतले आहे. मंत्रालये, राज्ये आणि भारतीय दूतावासांनी आयवायएम (IYM)च्या प्रचारासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी आणि भरड धान्यांच्या ग्राहक, शेतकरी आणि हवामानाविषयक फायद्यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी वर्ष 2023 मध्ये ठराविक महिन्यांची निश्चिती करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्रालयांमध्ये,वर्ष 2023 च्या जानेवारी महिन्यासाठी आयवायएम(IYM) शी संबंधित उपक्रम भारत सरकारच्या क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालयाकडून सुरू केले जातील. मंत्रालयाने जानेवारीमध्ये 15 दिवसांच्या कालावधीत 15 उपक्रमांची योजना आखली आहे ज्यात व्हिडीओ संदेशांद्वारे खेळाडू, पोषणतज्ञ आणि फिटनेस तज्ञांना सहभागी करून घेणे, आघाडीच्या पोषणतज्ञ, आहारतज्ञ आणि नामांकित खेळाडूसह भरड धान्ये विषयक वेबिनार आयोजित करणे, फिट इंडिया अॅपद्वारे जाहिरात करणे इत्यादींचा समावेश आहे. इतर मंत्रालये ज्यांनी जानेवारीमध्ये कार्यक्रमांचे नियोजन केले आहे ते म्हणजे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय जे आंध्र प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशमध्ये मिलेट फेअर-कम-प्रदर्शनाचे आयोजन करणार आहेत; एफएसएस एआय (FSSAI) पंजाब, केरळ आणि तामिळनाडू इत्यादी ठिकाणी 'इट राइट मेले' आयोजित करेल.
राज्यांच्या संदर्भात, छत्तीसगड, मिझोराम आणि राजस्थान या राज्यांना आयवायएम (IYM) संदर्भात जनजागृती करण्यासाठी आणि प्रचार करण्यासाठी विशिष्ट उपक्रम राबवण्यासाठी जानेवारी महिना निश्चित करण्यात आला आहे. ही राज्ये महोत्सव/मेळे आणि खाद्य महोत्सव, शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, जागृती मोहीम, कार्यशाळा/परिसंवाद, होर्डिंग्ज लावणे आणि राज्यातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी प्रचार साहित्याचे वितरण इत्यादींसह भरड धान्य केंद्रित उपक्रम राबवणार आहेत. जानेवारी महिन्यात तत्सम उपक्रम राबविणाऱ्या इतर राज्यांमध्ये महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पंजाबचा यांचा समावेश होतो.
जानेवारी 2023 दरम्यान, कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) आणि कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग(DA&FW) बेल्जियममधील ट्रेड शोमध्ये सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग,अपेडा (APEDA), स्टार्ट-अप, निर्यातदार आणि शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) च्या प्रतिनिधींसह एक बहु-भागधारक शिष्टमंडळ सहभागी होणार आहे. हे शिष्टमंडळ आरटीई (RTE) आणि आरटीसी (RTC) बाजरी-आधारित उत्पादने, बी2बी (B2B), बी2जी (B2G) परस्परसंवाद इत्यादीद्वारे भारतीय भरड धान्यांची विविधता याविषयी अधिकची माहिती प्रदर्शित करेल.
शिवाय, 140 हून अधिक देशांमधील भारतीय दूतावास 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष(IYM) च्या उत्सवात सहभागी होतील आणि आयवायएम ( IYM) वर भारतीय प्रतिनिधींना सहभागी करून प्रदर्शन, चर्चासत्रे, चर्चा, पॅनेल चर्चा इत्यादीद्वारे इतर कार्यक्रम आयोजित करतील. जानेवारीमध्ये, अझरबैजानमधील भारतीय दूतावास आणि बेलारूसमधील भारतीय दूतावास स्थानिक चेंबर्स, फूड ब्लॉगर्स, खाद्यपदार्थांचे आयातदार आणि स्थानिक रेस्टॉरंट्स इत्यादींच्या सहभागाने बी2बी (B2B) बैठकासारखे उपक्रम राबवणार आहे. भारतीय प्रतिनिधी आणि मिलेट्स डिश यांच्या मदतीने शिजवलेले मिलेट्स डिश प्रदर्शन/स्पर्धा आयोजित केल्या जातील. आणि प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचा भाग म्हणून त्याचे वाटप केले जाईल. अबुजा येथील भारतीय उच्चायुक्तालय आणि लागोसमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने, आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष (IYM) च्या जागृतीचा एक भाग म्हणून, जानेवारी 2023 मध्ये मिलेट्स फूड फेस्टिव्हल आणि मिलेट्स फूड तयार करण्याच्या स्पर्धेची योजना आखली आहे. हा मिलेट्स फूड फेस्टिव्हल उच्चायुक्तांच्या आवारात आयोजित केला जाईल. आणि तो या पदार्थांच्या तयारीसाठी नायजेरियन मान्यवर आणि भारतीय समुदायासह निमंत्रितांना स्टॉल प्रदान करेल.
आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष - 2023 च्या भव्य सोहळ्याच्या माध्यमातून 'मिरॅकल मिलेट्स'चे विसरलेले वैभव पुनरुज्जीवित करण्यासाठी,या कार्यात,एक सहयोगी दृष्टीकोनातून,कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग( DA&FW) आंतरराष्ट्रीय संस्था, शैक्षणिक संस्था, हॉटेल्स, मीडिया, भारतीय प्रतिनिधी, स्टार्ट-अप समुदाय, नागरी समाज आणि मिलेट्स व्हॅल्यू-चेनमधील इतर सर्वांना पुढे येण्यासाठी आणि एकत्र येण्यासाठी आवाहन करते आहे.
भरड धान्ये हा देखील G-20 बैठकीचा अविभाज्य भाग आहे आणि यात सहभागी प्रतिनिधींना भरड धान्यांच्या पदार्थांची चव चाखायला देऊन, शेतकऱ्यांच्या भेटीघाटी घडवून आणि स्टार्ट-अप आणि शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) सोबत संवादी सत्रांद्वारे खऱ्या अर्थाने भरड धान्याचा अनुभव दिला जाईल.
आंतरराष्ट्रीय भरड धान्ये वर्ष 2023 साजरे करताना सरकारच्या संपूर्ण कार्यपद्धतीचा प्रत्यय खर्या अर्थाने येत आहे.
***
S.Patil/V.Yadav/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1887885)
Visitor Counter : 817