गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज कर्नाटकातील देवनहल्ली येथे केंद्रीय गुप्तहेर प्रशिक्षण संस्थेची  केली पायाभरणी आणि  इंडो-तिबेट सीमा पोलिसांच्या  निवासी आणि प्रशासकीय संकुलाचे केले उद्घाटन


भारताच्या विकासाच्या वाटचालीत कायदा आणि सुव्यवस्था उत्तम असणे अत्यंत आवश्यक आहे आणि गेल्या 3 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोच्या माध्यमातून संशोधन  सुधारण्यास मदत करण्यासाठी केलेल्या बदलांचे परिणाम आता दिसू लागले आहेत 

केंद्रीय गुप्तहेर प्रशिक्षण संस्थेचे हे केंद्र कर्नाटकची  शेजारी  राज्ये महाराष्ट्र, गोवा तसेच दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशाच्या न्यायवैद्यक  गरजा देखील पूर्ण करेल.

Posted On: 31 DEC 2022 9:42PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज कर्नाटक मधील  देवनहल्ली येथे केंद्रीय गुप्तहेर प्रशिक्षण संस्थेची  पायाभरणी केली आणि  इंडो-तिबेट सीमा पोलिसांच्या  निवासी आणि प्रशासकीय संकुलाचे उद्घाटन केले.

आपल्या भाषणात अमित शहा म्हणाले की, केंद्रीय गुप्तहेर प्रशिक्षण संस्थेच्या पायाभरणीने  पोलिस दलांसाठी सुविधा अधिक सुलभ करण्यासाठी एका उपक्रमाची सुरुवात झाली आहे.

समाजात सातत्याने होत असलेल्या बदलांनुरूप  होण्यासाठी पोलिसांसाठी संशोधन आवश्यक आहे, आणि पोलिस आणि केंद्रीय सशस्त्र दलांसाठी हे संशोधन करण्याची जबाबदारी पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोची आहे असे शहा म्हणाले.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, पोलिस दलामध्ये पद्धतशीर आणि प्रक्रियात्मक सुधारणा ही एक निरंतर प्रक्रिया असली पाहिजे, ज्यासाठी संस्थामध्ये सहकार्य , चर्चासत्रे आणि सर्वोत्तम पद्धती आणि आव्हानांची देवाणघेवाण पोलिस दलांना सर्वोत्तम बनवण्यासाठी आवश्यक आहे.पोलिस हा  राज्याचा विषय म्हणून योग्यरित्या वर्गीकरण करण्यात आला आहे, मात्र  कालांतराने अंमली पदार्थ, बनावट नोटा, हवाला व्यवसाय, उन्माद पसरवणाऱ्या संघटना, दहशतवाद, सीमावर्ती राज्यांमध्ये घुसखोरी, किनारपट्टीलगतच्या राज्यांमध्ये सागरी समस्या यासारखी कठीण आव्हानेही उभी ठाकली आहेत. देशभरातील पोलिस दलांना या समस्यांना सामोरे जावे लागले आणि त्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या.

शहा म्हणाले की, देशाला महानगर क्षेत्रातील आव्हानांवरही लक्ष केंद्रित करावे लागेल आणि नजीकच्या काळात  शहर पोलिसिंग  अधिक आव्हानात्मक होणार असल्याने संशोधन आणि परिणाम यांच्या अभ्यासातून  आपली रणनीती बदलण्याची गरज आहे.

केंद्रीय गुप्तहेर प्रशिक्षण  संस्था कर्नाटकच्या महाराष्ट्र, गोवा या शेजारी राज्यांच्या आणि दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशांच्या न्यायवैद्यक  गरजा पूर्ण करेल असे शाह म्हणाले.  भारताच्या विकासाच्या वाटचालीत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती उत्तम  असणे अत्यंत आवश्यक आहे आणि पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षात सरकारने संशोधन सुधारण्यास मदत करण्यासाठी अनेक बदल केले आहेत, ज्याचे परिणाम देखील आता दिसू लागले आहेत असे ते  म्हणाले .

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1887809) Visitor Counter : 161