मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
मत्स्यव्यवसाय विभागाने आयोजित केला “मत्स्यव्यवसाय आणि मत्स्यशेतीसाठी विमा संरक्षण” या विषयावरील राष्ट्रीय वेबिनार
Posted On:
31 DEC 2022 6:11PM by PIB Mumbai
भारत सरकारच्या मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या मत्स्यव्यवसाय विभागाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त सध्या सुरु असलेल्या कार्यक्रमांचा भाग म्हणून, 29 डिसेंबर, 2022 रोजी “मत्स्यव्यवसाय आणि मत्स्यशेतीसाठी विमा संरक्षण” या विषयावर राष्ट्रीय वेबिनार आयोजित केला होता. भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव जतींद्र नाथ स्वेन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला देशभरातील 170 पेक्षा जास्त सहभागींनी उपस्थिती लावली. यामध्ये मच्छिमार, शेतकरी, उद्योजक, मत्स्यपालन संघटना, भारत सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी आणि विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे मत्स्यव्यवसाय अधिकारी, राज्य कृषी विभागातील प्राध्यापक, पशुवैद्यकीय आणि मत्स्यपालन विद्यापीठ, मत्स्य संशोधन संस्था, मत्स्यपालन सहकारी संस्थांचे अधिकारी, वैज्ञानिक, विद्यार्थी आणि देशभरातील मत्स्यपालन क्षेत्रातील भागधारक यांचा समावेश होता.

संबंधिताना विमा संकल्पनेची जाण नसणे ही मूळ समस्या आहे याकडे जतींद्र नाथ स्वेन यांनी लक्ष वेधले. खासगी आणि विमा क्षेत्रातील अन्य जागतिक संस्थांचा विश्वास संपादन करून त्यांना मत्स्यव्यवसाय क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी क्षमता विकास कार्यक्रम हाती घ्यायला हवेत, अशी सूचना त्यांनी केली.

यावेळी मान्यवर वक्त्यांसमोर प्रश्नोत्तराचे सत्र आयोजित करण्यात आले. यामध्ये मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील व्यावहारिक आणि प्रत्यक्ष समस्या आणि त्यावरील संभाव्य कृती, तसेच नवीन विमा उत्पादनांचा विकास या मुद्द्यांवर मान्यवर वक्त्यांनी उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.

***
N.Chitale/R.Aghashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1887760)
Visitor Counter : 213