उपराष्ट्रपती कार्यालय
नव वर्षाच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींनी देशवासीयांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
31 DEC 2022 5:22PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशाला नवीन वर्ष-2023 च्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचा संपूर्ण संदेश पुढीलप्रमाणे…
"आपण सर्वजण नवीन वर्ष 2023चे स्वागत करत असताना माझ्याकडून सर्व देशवासीयांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
हे आनंदी क्षण म्हणजे विकासाच्या मार्गाने होत असलेला आपला प्रवास सुरु ठेवण्यासाठी उत्साहाने प्रयत्नशील रहाण्याची संधी आहे.
भारताला प्रगती आणि समृद्धीच्या नव्या शिखरावर घेऊन जाण्याच्या निश्चयासह आपण या नवीन वर्षात प्रवेश करुया.
आज देश प्रगतीची नवीन मानके स्थापित करत आहे, प्रगती, संधी आणि गुंतवणूकीचे नवे जागतिक केंद्र म्हणून आकार घेत आहे.
चला, आपण सर्व आपल्या जीवनात अधिक शांतता, आरोग्य, सुसंवाद आणि आनंद आणण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करुया.
***
N.Chitale/V.Sahajrao/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1887751)
Visitor Counter : 202