आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
सार्वत्रिक आरोग्य छत्राच्या व्याप्तीकडील प्रवासात भारताने ओलांडला महत्त्वाचा टप्पा- 1,50,000 आयुष्मान भारत आरोग्य आणि निरामयता केंद्रे झाली कार्यरत
Posted On:
30 DEC 2022 1:05PM by PIB Mumbai
भारताच्या आरोग्यविषयक पायाभूत सुविधांच्या मजबुतीचे दर्शन घडवत साध्य केलेल्या एका लक्षणीय कामगिरींतर्गत भारताने एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला असून, 1,50,000 आयुष्मान भारत आरोग्य आणि निरामयता केंद्रे (AB-HWCs) 31 डिसेंबरपूर्वी कार्यरत झाली आहेत. ही कामगिरी निर्धारित तारखेपूर्वीच साध्य करण्यासाठी देशाने केलेल्या प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे आणि ही केंद्रे देशभरातील सर्व नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधा सहजतेने उपलब्ध करण्यात आणि त्यांचा लाभ देण्यात मोलाची भूमिका बजावतील, असे सांगितले आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी या कामगिरीबद्दल देशाचे अभिनंदन केले आहे आणि निर्धारित केलेले हे लक्ष्य भारताने साध्य केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा दृष्टीकोन प्रत्यक्षात साकार करताना राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारी राज्यांनी एकत्रित आणि सहकार्यात्मक प्रयत्नांनी भारताला सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य निगा सेवांची हमी देणाऱ्या जागतिक आदर्श बनवले आहे.
एबी-एचडब्लूसींमुळे देशातील 134 कोटींपेक्षा जास्त लोकांना लाभ झाला आहे आणि 86.90 कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांची अ -संसर्गजन्य रोगांसाठी संचित पद्धतीने तपासणी झाली आहे. या लाभार्थ्यांमध्ये उच्च रक्तदाबाच्या तक्रारीसाठी उपचार घेणारे 29.95 कोटी, मधुमेहासाठी 25.56 कोटी, मुख कर्करोगासाठी 17.44 कोटी, स्तनांच्या कर्करोगासाठी 8.27 कोटी आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगासाठी 5.66 कोटी रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत 1.60 कोटी निरामयता सत्रांचे या केंद्रांवर आयोजन करण्यात आले आहे.
त्याशिवाय शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे- आरोग्य आणि निरामयता केंद्र (UPHC-HWC) च्या छत्रांतर्गत शहरी क्षेत्रात बाह्यरुग्ण काळजी प्रणालीला बळकटी देत आणि 15 ते 20 हजार लोकसंख्येला सामावून घेत 2-3 केंद्रे कार्यरत करण्यात आली आहेत.
***
S.Kane/S.Patil/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1887570)
Visitor Counter : 240