इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘आधार’च्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या ई-केवायसी व्यवहारांमध्ये नोव्हेंबर महिन्यात 22% वाढ; ‘आधार’द्वारे प्रमाणीकरण व्यवहारांत 11% वाढ;‘आधार’चा वापर करून नोव्हेंबर महिन्यात 28.75 कोटी ई-केवायसी व्यवहार

Posted On: 29 DEC 2022 9:58PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 डिसेंबर 2022

 

देशात ‘आधार’चा वापर सातत्याने वाढत असल्याचे दिसून आले आहे. फक्त नोव्हेंबर महिन्यात 28.75 कोटी ई-केवायसी व्यवहार ‘आधार’च्या सहाय्याने झाले; त्याआधी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या व्यवहारांच्या तुलनेत ही 22% वाढ आहे.

नोव्हेंबर 2022 च्या अखेरीस, ई-केवायसी व्यवहारांची एकूण संख्या 1350.24 कोटी इतकी झाली. बँका व बँकेतर आर्थिक सेवांमध्ये ‘आधार ई-केवायसी सेवे’मुळे पारदर्शकता आली असून ग्राहकांना येणाऱ्या अनुभवातही सुधारणा झाली आहे, यामुळे व्यवसाय करण्यात सुलभता निर्माण झाली आहे.

‘आधार’धारकाने स्पष्ट मान्यता दिल्यानंतरच ई-केवायसी व्यवहार केला जातो. त्यात केवायसी संबंधित कागदोपत्री कामे आणि व्यक्तीच्या प्रत्यक्ष हजेरीची गरज संपुष्टात आली आहे.

तसेच, नोव्हेंबरमध्ये 195.39 कोटी ‘आधार’ प्रमाणीकरणामार्फत व्यवहार झाले; हे ऑक्टोबरच्या तुलनेत 11 टक्क्यांहून जास्त आहेत. यांतील बहुतांश मासिक व्यवहार बोटाच्या ठशाच्या आधारे केल्या जाणाऱ्या बायोमेट्रीक प्रमाणीकरण व त्यानंतर लोकसंख्याधारित विदा व ओटीपी अर्थात ‘वन टाईम पासवर्ड’च्या वापराद्वारे करण्यात आले.

ई-केवायसी सेवेला सुरुवात झाल्यापासून ते नोव्हेंबर 2022 अखेरपर्यंत एकूण 8621.19 कोटी ‘आधार’ प्रमाणीकरणामार्फत व्यवहार झाले आहेत. ही आकडेवारी सुशासनात आधारच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची आणि नागरिकांना मिळणाऱ्या सुविधेची ग्वाही देते. 

ई-केवायसीचा व्यक्तीची ओळख पडताळण्यासाठी वापर असो वा तळागाळातील ग्राहकापर्यंत बँकिंग सेवा नेण्यासाठी ‘आधार’च्या सहाय्याने पैसे भरण्याची यंत्रणा – एईपीएस असो, निधीचे थेट हस्तांतरण किंवा प्रमाणीकरण वा सुशासनासाठी पायाभूत डिजिटल सुविधांची उभारणी असो; जैवतंत्रज्ञान विभागाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नजरेतील ‘डिजिटल भारत’ साकारण्यात ‘आधार’ मोलाची मदत करत आहे. नोव्हेंबर 2022 अखेरीस दुर्गम टप्प्यातील बँकिंगमध्ये 1591.92 कोटी व्यवहार ‘एईपीएस’चा वापर आणि ‘सूक्ष्म एटीएम’च्या जाळ्यामार्फत करण्यात आले. 

सरकारच्या 1100 पेक्षा जास्त योजना, कार्यक्रम ‘आधार’मार्फत राबवण्याची अधिसूचना केंद्र व राज्य अशा दोन्ही पातळ्यांवर जारी करण्यात आली आहे. या डिजिटल ओळखपत्रामुळे केंद्रीय व राज्यस्तरीय विविध मंत्रालये आणि खात्यांच्या कारभारात सुधारणा करणे, पारदर्शकता आणणे व कल्याणकारी योजना योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे शक्य झाले आहे.

 

* * *

S.Patil/R.Bedekar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1887413) Visitor Counter : 239


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu