आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
उझबेकिस्तान-मेरियन बायोटेक कफ सिरप प्रकरणी प्रसिद्धीपत्रक
केंद्रीय औषध मानक नियामक संस्था सीडीएससीओ, उझबेकिस्तान औषध नियामकाच्या नियमित संपर्कात आहे
मेरियन बायोटेकच्या नोएडा येथील उत्पादन सुविधेची उत्तर प्रदेशचे औषध नियामक अधिकारी आणि सीडीएससीओ पथकाने केली संयुक्त तपासणी
नमुने घेऊन ते चंदीगड येथील प्रादेशिक औषध चाचणी प्रयोगशाळा (आरीटीएल), येथे पाठवले
Posted On:
29 DEC 2022 4:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 डिसेंबर 2022
उत्तर प्रदेशातील नोएडा येथील मेरियन बायोटेक या भारतीय कंपनीने बनवलेल्या डॉक1 मॅक्स या कफ सिरपबाबत ते दूषित असल्याचे अहवाल उझबेकिस्तानमधून आले आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खते मंत्री, डॉ. मनसुख मांडविया यांच्या निर्देशानुसार, केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (सीडीएससीओ) 27 डिसेंबर 2022 पासून उझबेकिस्तानच्या राष्ट्रीय औषध नियामकाशी नियमित संपर्कात आहे.
माहिती मिळताच, उत्तर प्रदेश औषध नियामक अधिकारी आणि सीडीएससीओ पथकाने मेरियन बायोटेकच्या नोएडा येथील उत्पादन सुविधेची संयुक्त तपासणी केली. तपासणी अहवालाच्या आधारे योग्य ती पुढील कारवाई सुरू केली जाईल.
मेरियन बायोटेक ही एक परवानाधारक उत्पादक कंपनी आहे. तिच्याकडे डॉक1 मॅक्स सिरप आणि टॅब्लेटच्या उत्पादनासाठीचा परवाना आहे.
उत्तर प्रदेश औषध नियामक यांनी त्याला निर्यातीसाठी मंजूरी दिली आहे.
कफ सिरपचे नमुने उत्पादन युनिट परिसरातून घेण्यात आले असून चंदीगड येथील प्रादेशिक औषध चाचणी प्रयोगशाळेत (आरीटीएल) पाठवले आहेत.
* * *
G.Chippalkatti/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1887314)
Visitor Counter : 201