ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाची लक्षवेधी कामगिरी

Posted On: 28 DEC 2022 11:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 डिसेंबर 2022

 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (एकेएएम)

28 एप्रिल ते 4 मे 2022 या कालावधीत ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (एकेएएम)’ कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ‘ईशान्य महोत्सव’ साजरा करण्यात आला. जन-भागीदारीच्या भावनेने ईशान्येच्या सर्व आठ राज्यांमध्ये विविध सहभागात्मक उपक्रम आयोजित करण्यात आले. 4 मे 2022 रोजी गुवाहाटी येथे, श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र येथे महोत्सवाच्या समारोप सोहळ्याला भारताचे तत्कालीन राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी, भारताच्या तत्कालीन प्रथम महिला, सविता कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास, सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्रालय आणि सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांनी या सोहळ्याचे यजमान पद भूषविले.

 

ईशान्य भारतासाठी पंतप्रधानांचा विकास उपक्रम (पीएम-डीईव्हीआयएनई)

ईशान्य प्रदेश विकास मंत्रालय (डीओएनईआर) ईशान्य प्रदेशातील विकास योजना आणि प्रकल्पांचे नियोजन, अंमलबजावणी आणि निरीक्षणाशी संबंधित प्रकरणे हाती घेते.

ईशान्य प्रदेशात लक्षणीय विकासात्मक अनुशेष आहे, या मूल्यांकनावर भर देत, ईशान्येकडील 8 राज्यांमधील, केवळ पायाभूत विकासच नाही, तर सामाजिक विकास, उपजीविका आणि सामुदायिक क्षमता या क्षेत्रांमध्ये विशेष लक्ष देण्याची गरज आहे, अशा भागात, ‘ईशान्य भारतासाठी पंतप्रधानांचा विकास उपक्रम (पीएम-डीईव्हीआयएनई)’ ही नवीन योजना सुरु करण्यात आली आहे. 2022-23 च्या अर्थसंकल्पात 100% केंद्रीय क्षेत्र योजना म्हणून घोषित करण्यात आलेल्या या योजनेचे उद्दिष्ट, विशेष परिणाम साधणाऱ्या प्रकल्पांना अर्थसहाय्य देऊन ईशान्य प्रदेशाचा जलद आणि सर्वांगीण विकास, हे आहे.

लक्षवेधी प्रमाणातील आणि सर्वसमावेशक पोहोच/उप-उपक्रमांच्या माध्यमातून, पीएम गतीशक्ती योजनेच्या भावनेने पायाभूत सुविधांना एकत्रितपणे निधी देणे; ईशान्येच्या राज्यांना जाणवणाऱ्या गरजांवर आधारित सामाजिक विकास प्रकल्पांना पाठबळ देणे; उपजीविकेच्या, विशेषतः युवा आणि महिलांसाठीच्या उपक्रमांना सहाय्य करणे आणि विविध क्षेत्रांमधील विकासाच्या त्रुटी भरून काढणे, हे याचे उद्दिष्ट आहे. पीएम-डीईव्हीआयएनई हा केंद्र आणि राज्य सरकारांच्या सध्याच्या योजनांचा पर्याय नाही.

 

कृषी क्षेत्रासाठी आंतर-मंत्रालयीन कृती दल

ईशान्य प्रदेशात कृषी क्षेत्र हे रोजगार देणारे प्राथमिक क्षेत्र असल्यामुळे, त्याच्या नियोजनबद्ध विकासाला प्राधान्य दिले जात आहे. ईशान्य प्रदेश विकास मंत्री आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्र्यांनी कृषी क्षेत्राचा संयुक्त आढावा घेतल्यानंतर, ईशान्य प्रदेशातील कृषी क्षेत्राच्या वाढीला चालना देण्यासाठी कृती दलाची स्थापना करण्यात आली.

  

कृती दलाने राज्य सरकारे आणि केंद्रीय संस्थांसह सक्रीय भागधाराकांशी सल्ला मसलत केली आणि पुढील मुद्द्यांचा विचार केला- (अ) कृषी क्षेत्राच्या विद्यमान योजनांमध्ये सुधारणा आवश्यक; आणि (ब) 10% जीबीएस च्या सुधारित वापरासाठी नवीन योजना/प्रकल्प. कृती दलाच्या शिफारशींमध्ये - फलोत्पादन, सेंद्रिय, कृषी-वनीकरण आणि वृक्षारोपण उप-क्षेत्रांना विशेष लक्ष केंद्रित करण्याची क्षेत्रे म्हणून निश्चित करण्यात आले.

 

वर्ल्ड एक्स्पो दुबई 2020- ईशान्य भारताचा सहभाग (4 ते 17 मार्च 2022)

ईशान्य क्षेप्रदेशातील राज्ये, संबंधित संस्था आणि खासगी उद्योजक/स्टार्टअप्स यांना दुबईमधील वर्ल्ड एक्स्पो 2020 मध्ये सहभागी होण्यासाठी पाठबळ देण्यात आले. सहभागी राज्ये आणि संस्थांनी सादरीकरणे केली आणि त्यानंतर या प्रदेशातील संधींची माहिती देणारे लघुपट दाखवण्यात आले. प्रवासी यात्रा संचालक आणि शाळांच्या मुख्याध्यापकांसह कौशल्य, कृषी- फलोत्पादन, पर्यटन इत्यादी क्षेत्रातील संभाव्य गुंतवणूकदार यावेळी उपस्थित होते. ईशान्येकडील राज्यांच्या अधिकार्‍यांनी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी हाती घेतलेले विविध उपक्रम आणि कंपन्या आणि मनुष्यबळ विकास संस्थांशी सहयोग करण्याची त्यांची इच्छा यावर सादरीकरण केले. 7 आणि 10 मार्च 2022 रोजी राज्यांचे अधिकारी आणि संभाव्य गुंतवणूकदार यांच्यात वन-टू-वन (प्रत्यक्ष) संवाद झाला.

 

नॉर्थ ईस्टर्न कौन्सिल (एनईसी) सुवर्ण महोत्सव

1972 मध्ये स्थापन झालेल्या एनईसीची (ईशान्य परिषद) 50 वर्षे पूर्ण झाली असून, 18 डिसेंबर 2022 रोजी शिलाँग येथे इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यात आला. शांतता, शक्ती, पर्यटन, 5-जी कनेक्‍टिव्हिटी (संपर्क सक्षमता), संस्कृती, नैसर्गिक शेती, खेळ, क्षमता- हे या प्रदेशाच्या विकासाचे आठ ‘आधारस्तंभ’, 'अष्ट लक्ष्मी'- संपत्तीच्या आठ देवी ज्याला म्हटले जाते, त्या ईशान्येच्या राज्यांना मोठे करू शकतील. या प्रदेशाच्या अलीकडच्या काळातील कामगिरीबद्दल बोलताना, पंतप्रधानांनी गेल्या 8 वर्षांत कनेक्टिव्हिटी (संपर्क सक्षमता) वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा विशेष उल्लेख केला होता. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले महत्वाचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत; या प्रदेशातील विमानतळे आणि विमान उड्डाणे, रस्ते, रेल्वे मार्ग, आणि बोगदे याच्या कामाला वेग देण्यात आला आणि पूर्ण करण्यात आले, 2014 च्या तुलनेत त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. ऑप्टिकल फायबर नेटवर्कचा विस्तार करून ईशान्येकडील डिजिटल कनेक्टिव्हिटी सुधारण्यावरही सरकार काम करत आहे.

  

 

केंद्रीय मंत्र्यांचा ईशान्येच्या राज्यांचा पाक्षिक दौरा

पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली, असा निर्णय घेण्यात आला की प्रत्येक ईशान्येकडील राज्याला दर पंधरवड्यात एक केंद्रीय मंत्री भेट देईल, ज्यामुळे सरकारी प्रकल्प / योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी द्वारे ईशान्य प्रदेशाच्या विकासाला गती मिळायला मदत होईल. ईशान्य प्रदेश विकास मंत्रालय केंद्रीय मंत्र्यांच्या ईशान्येच्या राज्यांच्या भेटींचे संचालन आणि आयोजन करते.

   

2015 मध्ये सुरू करण्यात आलेल्या, मात्र त्यानंतर टाळेबंदी आणि प्रवासावरील बंदी इत्यादीमुळे मार्च, 2020 पासून बंद करण्यात आलेल्या या पाक्षिक भेटी अलीकडेच पुन्हा सुरू करण्यात आल्या. केंद्रीय मंत्र्यांनी याचा मोठ्या प्रमाणात असा उपयोग केला:

जानेवारी ते नोव्हेंबर-2022 या काळात केंद्रीय मंत्र्यांनी ईशान्य प्रदेशाला 135 पेक्षा जास्त वेळा भेट दिली. त्यांच्या अहवालांवर आधारित भेटी आणि पाठपुरावा स्थानिक लोकसंख्येच्या आकांक्षा आणि भावनांचे मॅपिंग करण्यात आणि ईशान्य प्रदेशात सरकारी प्रकल्प/योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यामध्ये मदत करत आहेत.

 

* * *

S.Thakur/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1887262) Visitor Counter : 231


Read this release in: English , Hindi , Assamese , Manipuri