गृह मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्लीत जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील सुरक्षा स्थिती आणि विकास कामांसंदर्भात घेतली आढावा बैठक

Posted On: 28 DEC 2022 9:38PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 डिसेंबर 2022 

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्लीत जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील सुरक्षा  स्थिती आणि विकास कामांसंदर्भात  आढावा बैठक घेतली. जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल  मनोज सिन्हा, केंद्रीय गृह सचिव, संचालक (आयबी), रॉ (RAW) प्रमुख आणि जम्मू आणि काश्मीर  केंद्रशासित प्रदेशातील अधिकाऱ्यांसह भारत सरकारचे इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

अमित शहा यांनी सुरक्षा ग्रीडच्या कामकाजाचा आणि सुरक्षेशी संबंधित विविध पैलूंचा आढावा घेतला आणि दहशतवादाला थारा न देण्याचे  धोरण अवलंबण्यासाठी आवश्यक निर्देश दिले.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी केंद्रशासित प्रदेश  जम्मू-काश्मीरमध्ये राबवण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला आणि प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला.विविध योजनांतर्गत लाभार्थींना 100 टक्के परिपूर्ती मिळवून देण्यासाठी आणि विकासाचे लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

सामान्य माणसाच्या हिताला बाधक ठरणारी,दहशतवादी-अलिप्ततावादी मोहिमेला मदत, प्रोत्साहन आणि टिकवून ठेवणाऱ्या तत्वांवर आधारलेली  दहशतवादी व्यवस्था मोडून काढण्याची गरज आहे, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.

 

* * *

S.Patil/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1887169) Visitor Counter : 123