आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कायदा, 2019 मध्ये नमूद प्रक्रियेनुसार केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी केली राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी), स्वायत्त मंडळे आणि शोध समितीच्या अर्धवेळ सदस्यांची निवड


राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारमधील 10 अर्धवेळ सदस्य, राज्य वैद्यकीय परिषदेसाठी 9 अर्धवेळ सदस्य, प्रत्येक स्वायत्त मंडळासाठी चौथा सदस्य आणि शोध समितीसाठी एका सदस्याची निवड; आगामी दोन वर्षांसाठी असणार या नियुक्‍त्या

Posted On: 28 DEC 2022 6:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 डिसेंबर 2022

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी, राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी), स्वायत्त मंडळे आणि शोध समितीच्या अर्धवेळ सदस्यांच्या नियुक्ती प्रक्रियेत, चिठ्ठ्या काढून  सोडतीद्वारे भाग घेतला. राष्‍ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी) कायदा, 2019 मध्ये नमूद केलेल्या  नियुक्ती प्रक्रियेनुसार आज  सोडत काढून नियु‍क्त्या करण्‍यात आल्या.

एनएमसी अधिनियम 2019 नुसार या नियुक्त्या दोन वर्षांसाठी केल्या जात आहेत. खालील श्रेणींमध्ये विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील सदस्यांची निवड करण्यात आली आहे:-

  • एनएमसीच्या दहा अर्धवेळ सदस्यांची निवड वैद्यकीय सल्लागार परिषदेमध्ये राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारच्या नामनिर्देशित व्यक्तींमधून केली जाते. (2020 मध्ये आधी नियुक्त): आसाम, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, पुडुचेरी, उत्तराखंड, लडाख, सिक्कीम, तेलंगणा, कर्नाटक आणि केरळ.
  • एनएमसीचे नऊ अर्धवेळ सदस्य वैद्यकीय सल्लागार परिषदेतील राज्य वैद्यकीय परिषदेच्या नामनिर्देशित व्यक्तीमधून निवडले जातात.  (2020 मध्ये यापूर्वी नियुक्त केले होते): आंध्र प्रदेश, हरियाणा, गोवा, गुजरात, दिल्ली, ओडिशा, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजस्थान
  • प्रत्येक स्वायत्त मंडळाचा चौथा  सदस्य (अंशकालीन सदस्य) वैद्यकीय सल्लागार परिषदेतील,  राज्य वैद्यकीय परिषदेच्या नामनिर्देशित व्यक्तीमधून (2020 मध्ये यापूर्वी नियुक्त केलेले) निवडला गेला आहे.
    1. पदवीपर्यंत वैद्यकीय शिक्षण मंडळासाठी: महाराष्ट्र
    2. पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण मंडळासाठी: तामिळनाडू
    3. वैद्यकीय मूल्यांकन आणि मानांकन मंडळ : उत्तर प्रदेश
    4. नैतिकता आणि वैद्यकीय नोंदणी मंडळ: बिहार
  • शोध समितीसाठी ओडिशातील एका तज्ज्ञाची निवड करण्यात आली होती.

तज्ञांच्या नावांची यादी खालील परिशिष्टात देण्‍यात आली आहे. या सोडतीमध्‍ये पारदर्शकता राखण्यासाठी, कार्यक्रमाचे ध्वनिचित्रमुद्रण करण्यासाठी प्रसार माध्‍यमातील  प्रतिनिधीही उपस्थित होते. 

या कार्यक्रमप्रसंगी  केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण, अतिरिक्त सचिव डॉ. मनोहर अगनानी, सहसचिव डॉ. सचिन मित्तल यांच्यासह आरोग्य मंत्रालयातील अधिकारी उपस्थित होते.

 

ANNEXURE:

Selected Members from States/ UTs

S No

Name of State/ UT

Name of the Member

1

Assam

Smt. Krishna Gohain, IAS (Retd.), Vice Chancellor, Srimanta Sankaradeva University of Health Sciences

2

Arunachal Pradesh

Prof. Saket Kushwaha Vice Chancellor Rajiv Gandhi University of Health Sciences

3

Puducherry

Prof. Dr. Gurmeet Singh, Vice Chancellore, Puducherry University

4

Uttarakhand

Prof. Hem Chandra , Vice Chancellor Hemwati Nandan Bahuguna Health University, Dehradun

5

Ladakh

Prof. S. K. Mehta, Vice Chancellor, University of Ladakh

6

Sikkim

Lt. Gen. (Dr.) Rajan Singh  Grewal, Vice Chancellor, Sikkim Manipal University

7

Telangana

Dr. Karunakar Reddy, Vice Chancellor, Kaloji Naryana Rao University of Health Sciences

8

Chattisgarh

Dr Ashok Chandraker, Vice Chancellor, Pandit Deendayal Upadhyaya Memorial Health Science and Ayush University of Chhattisgarh

9

Karnataka

Dr. M. K. Ramesh, Vice Chancellor, Rajiv Gandhi University of Health Sciences

10

Kerala

Dr. Mohanan Kunnummal, Vice Chancellor, Kerala University of Health and Sciences, Thrissur, Kerala

 

Selected Members from Various State Medical Councils

S No

Name of State Medical Council

Name of the Member

1

Gujarat

Dr. Mahesh Babulal Patel

2

Rajasthan

Dr. Deepak Sharma

3

Punjab

Dr. Vijay Kumar

4

Delhi

Dr. Rajiv Sood

5

Himachal Pradesh

Dr. Vinod Kashyap

6

Odisha

Prof. Datteswar Hota

7

Goa

Dr. Padmanabh Vaman Rataboli

8

Haryana

Dr. R. K. Aneja

9

Andhra Pradesh

Dr. Buchipudi Sambasiva Reddy

 

Selected Members (Part Time) for Autonomous Boards of NMC

S No

Name of State Medical Council

Name of the Part-time Member

Under-Graduate Medical Education Board

1

Maharashtra

Dr. Pallavi P. Saple

Post-Graduate Medical Education Board

1

Tamil Nadu

Dr. K. Senthil

Medical Assessment & Rating Board

1

Uttar Pradesh

Dr. Urmila Singh

Ethics & Medical Registration Board

1

Bihar

Dr. Sahajanand Prasad Singh

 

Selected Expert for Search Committee

S No

Name of State/ UT

Name of the Member

1

Odisha

Prof. Datteswar Hota

 

* * *

S.Patil/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1887125) Visitor Counter : 185