सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
ओरीसातल्या बारीपाडा, मयूरभंज येथे अनुसूचित जाती-जमातीच्या उद्योजकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय एससी-एसटी हब भव्य परिषदेचे आयोजन
Posted On:
27 DEC 2022 6:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 डिसेंबर 2022
उद्योजकता संस्कृतीला चालना मिळावी आणि एनएसएसएच योजना तसेच इतर योजनांबद्दल जागरूकता पसरावी यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने आज ओरिसातील सहिद, स्मृती भवन, बारीपाडा, मयूरभंज येथे राष्ट्रीय एससी-एसटी हब (एनएसएसएच) परिषदेचे आयोजन केले होते. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (सीएजी), गिरीश चंद्र मुर्मू आणि एमएसएमई राज्यमंत्री भानू प्रताप सिंग वर्मा यांच्यासह ज्येष्ठ मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात सुमारे 700 एससी-एसटी इच्छुक आणि विद्यमान उद्योजक सहभागी झाले.
जीडीपी आणि भारतातील एकूण निर्यातीमधील योगदानाच्या दृष्टीने भारतीय अर्थव्यवस्थेत एमएसएमई क्षेत्राच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर मुर्मू यांनी परिषदेला संबोधित करताना भर दिला. याप्रसंगी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री वर्मा म्हणाले की, एमएसएमई क्षेत्र केवळ कमी भांडवली खर्चात मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत नाही तर ग्रामीण आणि मागासलेल्या भागाच्या औद्योगिकीकरणातही मदत करते. त्यांनी एमएसएमई क्षेत्राला सक्षम करण्यासाठी सरकार राबवत असलेल्या विविध योजनांवर प्रकाश टाकला. या परिषदेच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती/जमातीतील उद्योजक नवोन्मेषी कल्पना आणि परस्पर व्यवसायाच्या संधी शोधतील आणि या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेतील असे ते म्हणाले.
कार्यक्रमात एससी/एसटी एमएसई सहभागींची तत्क्षणी नोंदणी करण्यासाठी उद्यम नोंदणीचे सुविधा डेस्क देखील होते.
* * *
S.Kane/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1886926)
Visitor Counter : 161