कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

18% सुधारणेसह कोळशाच्या दर्जात लक्षणीय वाढ

Posted On: 27 DEC 2022 4:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 डिसेंबर 2022

 

सर्व ग्राहकांना दर्जेदार कोळशाचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी कोळसा मंत्रालय तसेच विविध कोळसा कंपन्यांनी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. कोळशाच्या दर्जाच्या बाबतीत ग्राहकांना 100 % समाधान देण्याचा  कोळसा कंपन्यांचा प्रयत्न आहे. कोल इंडिया कंपनीच्या स्त्रोतांकडून होणाऱ्या कोळशाचा पुरवठा निर्धारित श्रेणीशी मिळताजुळता ठेवण्यात लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे. वर्ष 2017-18 मधील 51%च्या तुलनेत वर्ष 2022-23 (नोव्हेंबर महिन्यापर्यंत) मध्ये दर्जाची अनुरूपता 69%पर्यंत वाढली आहे.

कोळशाच्या दर्जात सुधारणा करण्यासाठी कोळसा खाणींचे पुनर्वर्गीकरण, सरफेस मायनर्स, धुतलेल्या कोळशाचा पुरवठा, कोठारात जलदगतीने कोळसा भरला जाण्यासाठी कोळसा पृष्ठभागाकडून बेल्टवर थेट कोळसा आणण्यासाठी पहिल्या टप्प्यातील उत्तम जोडणी सुविधा, ऑटो अॅनलायझर बसविणे यांसारख्या सुधारित खनन तंत्रज्ञानाचा वापर सुरु करणे इत्यादी पावले उचलण्यात आली आहेत. निर्धारित दर्जाशी अनुरूप दर्जाच्या कोळशाचा पुरवठा सुनिश्चित करण्याचे काम विविध अधिकारी तसेच संस्थांकडे सोपविण्यात आले आहे.

आता, कोल इंडिया कंपनीच्या सर्व ग्राहकांना, पुरविण्यात आलेल्या कोळशाच्या दर्जाचे मूल्यमापन कोणत्याही मान्यताप्राप्त  त्रयस्थ सँपलिंग संस्थेच्या माध्यमातून करून घेण्याचा पर्याय खुला करण्यात आला आहे. या मान्यताप्राप्त  त्रयस्थ संस्था कोळसा भरलेल्या वाघिणी तसेच लॉरी यांतील कोळशाचा दर्जा बीआयएस अंतर्गत विहित नियमांनुसार आहे याची खात्री करून घेण्यासाठी नेमण्यात आल्या आहेत. उर्जा तसेच बिगर-उर्जा क्षेत्रातील सर्व ग्राहकांना या नेमणूक झालेल्या संस्थांपैकी कोणत्याही संस्थेकडून सेवा घेण्याची मुभा आहे. त्रयस्थ संस्थेकडून होणाऱ्या कोळशाच्या परीक्षणाचे निम्मे शुल्क कोळसा कंपनीकडून दिले जाते. ग्राहकांसाठी संयुक्त कोळसा तपासणीची सुविधा देखील उपलब्ध आहे.  

त्रयस्थ संस्थेकडून कोळसा पुरवठ्याचे होणारे प्रमाणीकरण ग्राहक तसेच सामान्य जनतेच्या अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कोळसा विभागाने खनन केलेल्या कोळशाचे त्रयस्थ संस्थांकडून मूल्यमापन करण्यात पारदर्शकता आणण्यासाठी ' उत्तम ' नावाचे अॅप देखील सुरु केले आहे. कोळसा वापराचे नियोजन करण्यासाठी अनेक ग्राहक या अॅपचा वापर करून घेत आहेत.

 

* * *

S.Kane/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1886888) Visitor Counter : 201