ऊर्जा मंत्रालय

असुरक्षित जल प्रकल्प/ विद्युत केंद्रांसाठी पूर्व सूचना प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी ऊर्जा मंत्रालयाने संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेसोबत (डीआरडीओ) सामंजस्य करारावर केली स्वाक्षरी

Posted On: 27 DEC 2022 2:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 डिसेंबर 2022

 

  • या सामंजस्य करारावर ऊर्जा मंत्रालयाचे सचिव आलोक कुमार आणि संरक्षण विभागाचे सचिव (R&D) आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही कामत यांनी स्वाक्षरी केली.
  • हिमस्खलन, भूस्खलन, हिमनदी,  सरोवरे ओसांडणे आणि इतर भू-धोक्यांविरूद्ध योग्य शमन उपाय विकसित करण्यासाठी उर्जा मंत्रालय आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था संयुक्तपणे कार्य करतील.
  • डोंगराळ प्रदेशातील संवेदनशील जलविद्युत प्रकल्प/ विद्युत केंद्रांसाठी सर्वसमावेशक पूर्व सूचना प्रणाली विकसित करण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या कौशल्याचा उपयोग केला जाईल.

असुरक्षित जल प्रकल्प/ विद्युत केंद्रांसाठी पूर्व सूचना प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी ऊर्जा मंत्रालयाने आज संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO), संरक्षण मंत्रालयासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या सामंजस्य करारावर ऊर्जा मंत्रालयाचे सचिव आलोक कुमार आणि संरक्षण विभागाचे सचिव (R&D) आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही कामत यांनी स्वाक्षरी केली.

हिमस्खलन, भूस्खलन, हिमनदी,  सरोवरे ओसांडणे आणि इतर भू-धोक्यांविरूद्ध योग्य शमन उपाय विकसित करण्यासाठी उर्जा मंत्रालय आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था संयुक्तपणे कार्य करतील. डोंगराळ प्रदेशातील संवेदनशील जलविद्युत प्रकल्प/ विद्युत केंद्रांसाठी सर्वसमावेशक पूर्व सूचना प्रणाली विकसित करण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या कौशल्याचा कौशल्याचा उपयोग केला जाईल. या सामंजस्य कराराद्वारे विकसित झालेल्या व्यापक समजुतीनुसार संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि संबंधित प्रकल्प विकासकांदरम्यान स्वतंत्र आणि विशिष्ट कार्ये विकसित केली जातील.

केंद्रीय ऊर्जा तसेच नवी आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, ऊर्जा मंत्रालयाने जलविद्युत प्रकल्पांमध्ये विशेषत्वाने डोंगराळ प्रदेशांच्या वरच्या भागात असलेल्या जलविद्युत प्रकल्पांमध्ये पूर्व सूचना प्रणाली (EWS) लागू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पूर्व सूचना प्रणाली (EWS) ही धोक्याचे निरीक्षण करणे, अंदाज आणि भविष्य वर्तवणे, आपत्ती जोखीम मूल्यांकन करणे, संप्रेषण आणि धोकादायक घटनांपूर्वी आपत्ती धोके कमी करण्यासाठी वेळेवर कारवाईसाठी सज्जता यांची एकात्मिक प्रणाली आहे. पूर्व सूचना प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी ऊर्जा मंत्रालयाने आधीच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद - राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन परिषद (CSIR-NGRI); भारतीय हवामान विभाग (IMD); वाडिया हिमालय भूविज्ञान संस्था (WIHG) आणि राष्ट्रीय दूरसंवेदी केंद्र - भारतीय अंतराळ संशोधन केंद्र (NRSC-ISRO) सोबत सामंजस्य करार केले आहेत.

 

 

* * *

G.Chippalkatti/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1886854) Visitor Counter : 210


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu