सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

यूडीआयडी कार्ड असलेल्या दिव्यांगांना एक जानेवारी 2023 पासून  डीईपीडब्ल्यूडी अंतर्गत राष्ट्रीय संस्था/सीआरसी मध्ये नोंदणी/निदान/उपचार शुल्क माफ केले जाईल


ज्यांच्याकडे दिव्यांग असल्याचे  प्रमाणपत्र आहे, आणि ज्यांनी यूडीआयडी पोर्टलवर नोंदणी केली आहे, अशा दिव्यांग व्यक्तींना त्यांचे अपंगत्व कितीही प्रमाणात असले तरीही हा लाभ मिळू शकेल.

अशा उपक्रमामुळे इतर सरकारी संस्थांनाही, दिव्यांग व्यक्तींची नोंदणी यूडीआयडी कार्डवर करण्याचा मार्ग मोकळा होईल- केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री विरेन्द्र कुमार

प्रविष्टि तिथि: 24 DEC 2022 9:41PM by PIB Mumbai

 

सर्व प्रकारचे दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींचे जीवनमान सुकर व्हावे, यासाठी त्यांना मदत करण्याच्या हेतूने, दिव्यांग सक्षमीकरण विभागाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच, या क्षेत्रातील व्यावसायिकांचे शिक्षण/पुनर्वसन कौशल्य सुधारण्यासाठी हा विभाग सातत्याने प्रयत्न करत असून या दिशेने, अनेक पावले आणि निर्णय घेण्यात आले आहेत.

दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या अखत्यारीतील सर्व राष्ट्रीय संस्था (स्वायत्त संस्था) आणि  संयुक्त प्रादेशिक केंद्रांमधे (CRCs) (स्वायत्त संस्थांचे विस्तारीत विभाग) यूडीआयडी कार्ड धारक दिव्यांगांना नोंदणी/निदान/उपचार यासाठी लागणारे शुल्क, एक जानेवारी 2023 पासून माफ करण्याचा निर्णय विभागाने  घेतला आहे. तसेच, ज्यांच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र आहे, आणि त्यांनी यूडीआयडीसाठी नोंदणी केली आहे, अशा सर्वांनाही-त्यांचे अपंगत्व प्रमाण कितीही असले तरी- या सवलतीचा लाभ मिळू शकेल.

याशिवाय, एनआय/सीआरसी मधील विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी, जे यूडीआयडी कार्डधारक आहेत, तसेच ज्यांच्याकडे अपंगत्व प्रमाणपत्र आहे आणि ज्यांनी यूडीआयडी पोर्टलवर नावनोंदणी केली आहे त्यांच्यासाठीही, अपंगत्वाची टक्केवारी विचारात न घेता पूर्ण अभ्यासक्रम शुल्क माफ केले जाईल. ही सवलत 2022-23 या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी (दोन वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीचे अभ्यासक्रम करत असलेल्या आणि त्यांच्या दुसऱ्या/तिसऱ्या/चौथ्या वर्षी असलेल्या विद्यार्थ्यांसह) लागू असेल.

त्यासह, प्रत्येक राष्ट्रीय संस्था आणि संयुक्त प्रादेशिक केंद्रांना दिव्यांग व्यक्तीला यूडीआयडी अर्ज दाखल करण्यात मदत करण्यासाठी आणि शनिवार आणि रविवारी सर्व व्यक्तींना उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक समर्पित काउंटर ठेवण्याची सूचनाही देण्यात आली आहे.

या उपक्रमाची प्रशंसा करताना विरेन्द्र सिंह म्हणाले की, अशा उपक्रमामुळे इतर सरकारी संस्थांना दिव्यांग व्यक्तींना मिळणाऱ्या फायद्यांसह यूडीआयडी कार्ड लिंक करण्याचा मार्ग मोकळा होईल.

***

S.Kakade/R.Aghor/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1886420) आगंतुक पटल : 1613
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , Telugu