वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बांगलादेशचे वाणिज्य मंत्री टिपू मुन्शी यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची नवी दिल्ली इथे घेतली भेट

Posted On: 22 DEC 2022 10:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 डिसेंबर 2022

बांगलादेशचे वाणिज्य मंत्री टिपू मुन्शी यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न, आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. दोन्ही देशांच्या वाणिज्य मंत्र्यांची यापूर्वीची भेट सप्टेंबर 2018 मध्ये ढाका येथे झाली होती. 

परस्परांबरोबरचे द्विपक्षीय आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी दोन्ही बाजूंनी यावेळी व्यापक चर्चा केली. 

परस्परांबरोबरच्या द्विपक्षीय मुक्त व्यापार कराराच्या (एफटीए) शक्यतेवर दोन्ही देशांमध्ये सहमती झाल्यावर, सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारा (सीईपीए) बाबतचा संयुक्त व्यवहार्यता अभ्यास करण्यात आला. दोन्ही देशांमधील व्यापार आणि व्यावसायिक भागीदारीमध्ये भरीव वाढ करण्यासाठी, सीईपीए भक्कम पाया उपलब्ध करणार असल्याचे या अभ्यासा मधून स्पष्ट झाले.

सीईपीए नवीन रोजगार निर्माण करेल, जीवनमान उंचावेल, आणि भारतामध्ये आणि बांगलादेशमध्ये व्यापक सामाजिक आणि आर्थिक संधी निर्माण करेल यावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली. याव्यतिरिक्त, ही भागीदारी विश्वसनीय आणि शाश्वत प्रादेशिक मूल्य साखळी (RVCs) स्थापित करेल.

सीईपीए वर लवकरात लवकर चर्चा सुरु करायला दोन्ही बाजूंनी सहमती दिली.

भारत-बांगलादेश आर्थिक संबंधांची पूर्ण क्षमता ओळखण्यासाठी, दोन्ही देशांच्या मंत्र्यांनी बिगर आयात शुल्क अडथळे आणि बंदर निर्बंध दूर करणे, सीमा हाट पुन्हा सुरू करणे, दोन्ही बाजूंमध्ये मानके आणि कार्यपद्धतींबाबत सुसंगती आणि परस्पर मान्यता, भारतीय रुपयामधील व्यापार, संपर्क सक्षमता (कनेक्टिव्हिटी) आणि व्यापार पायाभूत सुविधा मजबूत करणे या आणि इतर परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

बैठकी दरम्यान उपस्थित मुद्द्यांचे निराकरण करण्यासाठी, आणि सप्टेंबर 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान शेख हसीना या दोन नेत्यांच्या संयुक्त निवेदनामधील अपेक्षित परिणाम लवकरात लवकर साध्य करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यावर दोन्ही बाजूंमध्ये सहमती झाली. 

 

 

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 




(Release ID: 1885883) Visitor Counter : 146


Read this release in: English , Urdu , Bengali