सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

खादी संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या विक्री केंद्रांचे नूतनीकरण करून खादी क्षेत्राला नवी झळाळी देण्याचे खादी सुधारणा आणि विकास कार्यक्रमाचे उद्दिष्ट

Posted On: 22 DEC 2022 4:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 डिसेंबर 2022

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या माध्यमातून खादी सुधारणा आणि विकास कार्यक्रम (केआरडीपी) राबवण्याचे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे उद्दिष्ट असून खादी संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या विक्री केंद्रांचे नूतनीकरण करून कारागिर आणि विणकरांचे  उत्पन्न आणि रोजगाराच्या संधी वाढवून  खादी क्षेत्राला नवी झळाळी देणे   हा त्यामागील उद्देश आहे.

खादी सुधारणा पॅकेज अंतर्गत खालील क्षेत्रांमध्ये सुधारणा अपेक्षित आहेत:

(i) कारागिरांचे उत्पन्न आणि सक्षमीकरण,

(ii) 449 खादी संस्थांना (KI) सुधारणेसाठी थेट सहाय्य आणि

(iii) सुव्यवस्थित व्यवस्थापन माहिती प्रणाली (एम आय एस ) ची अंमलबजावणी. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या राज्य/विभागीय कार्यालयानुसार नूतनीकरण केलेल्या विक्री केंद्रांची संख्या आणि के आर डी पी अंतर्गत आर्थिक सहाय्य याविषयीची माहिती खालील प्रमाणे आहे .

खादीची विक्री वाढावी हा के आर डी पी अंतर्गत खादी विक्री केंद्रांचे नूतनीकरण करण्याचा मुख्य उद्देश आहे. खादीच्या कापडाच्या विक्री मध्ये वाढीचा कल आढळून येत असल्याचे खालील तक्त्यावरून दिसून येते:

Year

Sales (Rs. in crore)

2019-20

4211.26

2020-21

3527.71*

2021-22

5051.72

आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या सध्याच्या खादी संस्थांच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण आणि विक्री केंद्रांचे आधुनिकीकरणसंगणकीकरण आणि  नूतनीकरणासाठी आवश्यक विपणन पायाभूत सुविधांकरता  खादी आणि ग्रामोद्योग आयोगातर्फे आर्थिक सहाय्य दिले जाते.

या योजनेंतर्गत खादी संस्था /विभागीय विक्री केंद्रे/खादी आणि ग्रामोद्योग मंडळांच्या (के व्ही आय बी ) विक्री केंद्रांना विपणन पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी 25 रुपये लाख प्रदान करण्यात आले आहेत. योजना सुरू झाल्यापासून 2009-10 मध्ये, 2966.55 लाख रुपये आर्थिक सहाय्याने 358 विक्री केंद्रांचे नूतनीकरण करण्यात आले. 2021-22 या वर्षात 47 विक्री केंद्रांचे नूतनीकरण करण्यात आले.

State/ Divisional offices wise number of sales outlets renovated and fund spent under KRDP

Sl. No.

State/Divisional offices of KVIC

Renovated

(upto 19.12.2022)

Amount spent

(Rs.in lakh)

1

Ambala

43

332.95

2

Jaipur

2

131.83

3

Bikaner

11

121.45

4

Chandigarh

7

10.00

5

Shimla

7

37.00

6

Bhubaneswar

7

532.30

7

Kolkata

33

147.99

8

Patna

23

19.64

9

Ranchi

13

32.21

10

Guwahati

2

19.11

11

Manipur

5

27.52

12

Itanagar

1

5.00

13

Shillong

1

5.00

14

Chennai

26

393.47

15

Madurai

11

133.01

16

Bengaluru

48

412.24

17

Hubali

26

169.32

18

Vijayawada

21

135.17

19

Vishakhapatnam

8

68.00

20

Thiruvananthapuram

18

120.67

21

Telangana

0

0.00

22

Ahmedabad

33

289.01

23

Nagpur

4

50.00

24

Bhopal

8

64.83

25

Raipur

10

101.81

26

Dehradun

12

51.73

27

Lucknow

21

119.10

28

Meerut

21

265.40

29

Varanasi

27

279.17

30

Gorakhpur

17

134.41

 

Total

466

4209.34

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री भानु प्रताप सिंह वर्मा यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 

 

 

N.Chitale/B.Sontakke/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1885754) Visitor Counter : 148


Read this release in: English , Urdu , Gujarati , Tamil