दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
6 जी तंत्रज्ञान
Posted On:
21 DEC 2022 3:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 डिसेंबर 2022
भारतात 6 जी साठी दृष्टिकोन, अभियान आणि उद्दिष्टांसह 6जी साठी मार्गदर्शक आराखडा आणि कृती योजना विकसित करण्यासाठी दूरसंचार विभागाने 1 नोव्हेंबर 2021 रोजी 6 जी संदर्भात विविध मंत्रालये/विभाग, संशोधन आणि विकास संस्था, शैक्षणिक संस्था, प्रमाणीकरण संस्था, दूरसंचार सेवा प्रदाते आणि उद्योगातील सदस्यांसह एक तंत्रज्ञान नवोन्मेष गट (टीआयजी -6जी) स्थापन केला आहे. टीआयजी -6जी या गटाने,उद्योग, शैक्षणिक संस्था, संशोधन आणि विकास संस्था आणि सरकारसह विविध शाखांमधील नवोन्मेष उपाय ,बहुमंचीय पुढच्या श्रेणीचे अत्याधुनिक नेटवर्क, पुढील पिढीच्या गरजांसाठी स्पेक्ट्रम,उपकरणे, आंतरराष्ट्रीय मानकांचे योगदान तसेच संशोधन आणि विकास निधी यावर सदस्य म्हणून सहा कृती दलांची स्थापना केली आहे. 6जी दृष्टिकोन संदर्भातील अभ्यासामध्ये भारत, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघामध्ये (आयटीयू) देखील योगदान देत आहे.
दळणवळण राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
R.Aghor/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1885405)
Visitor Counter : 232