विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

इलेकट्रीक वाहनांसाठी सुधारित, जड दुर्मिळ प्रदूषणमुक्त, किफायतशीर किंमतीतले चुंबक वाहतूक खर्च कमी करू शकतात

Posted On: 21 DEC 2022 9:06AM by PIB Mumbai

संशोधकांनी  सुधारित किफायतशीर किंमतीचे जड दुर्मिळ प्रदूषणमुक्त उच्च एनडी-एफई-बी ( Nd-Fe-B ) चुंबक तयार केले आहेत, या चुंबकांना इलेक्ट्रिक वाहनांसाठी जास्त मागणी असून ते ही वाहने अधिक किफायतशीर बनवू शकतात.

90% पेक्षा जास्त इलेकट्रीक वाहनांमध्ये ब्रशलेस डीसी (बीएलडीसी) मोटर्स वापरल्या जातात ज्या दुर्मिळ पृथ्वी निओडीमियम आयर्न बोरॉन (एनडी-फे-बी) चुंबकांनी बनलेल्या असतात. 1984 मध्ये सागावाने त्याचा शोध लावल्यापासून, एनडी-एफई-बी (Nd-Fe-B )   चुंबक हा चुंबकीय गुणधर्मांच्या अपवादात्मक संयोजनामुळे बर्‍याच अनुप्रयोगांसाठी सर्वाधिक मागणी असलेला टिकाऊ  चुंबकीय पदार्थ आहे.

इलेकट्रीक वाहनांमध्ये वापरलेले एनडी-एफई-बी ( Nd-Fe-B )  चुंबक 150 - 200oC इतक्या  उच्च तापमानात कार्य करतात आणि  चुंबकीय गुणधर्म नाहीसे झाल्यास (डिमॅग्नेटायझेशन) उच्च प्रतिरोध दाखवणे आवश्यक असते, अशी क्षमता शुद्ध एनडी-एफई-बी (Nd-Fe-B ) चुंबकांजवळ नसते. त्यामुळे डिस्प्रोशिअम (डीवाय) धातू डिमॅग्नेटायझेशनचा प्रतिरोध सुधारण्यासाठी मिश्रधातू म्हणून त्याला जोडला जातो. जगभरात, संशोधक महागडे डिस्प्रोशिअम धातू न जोडता एनडी-एफई-बी (Nd-Fe-B )  चुंबकांची शक्ती (डिमॅग्नेटाइझेशनचा प्रतिरोध) वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.एनडी-एफई-बी ( Nd-Fe-B) चुंबकाच्या दाण्यांमधली जागा  "अचुंबकीय" घटकांसह योग्य उष्णता देण्याचे उपाय वाढवण्याच्या अनुषंगाने (ग्रेन बाउंडरी डिफ्यूजन) चुंबकांची शक्ती वाढवण्यासाठी संशोधन समुदायाने अवलंबलेले  धोरण आहे.

अलीकडेच, भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे स्वायत्त संशोधन आणि विकास केंद्र असलेल्या पावडर मेटलर्जी अँड न्यू मटेरियल्स (एआरसीआय) या आंतरराष्ट्रीय अत्याधुनिक संशोधन केंद्रातील वाहन ऊर्जा साहित्य  केंद्रातील संशोधकांनी Nd70Cu30 या  कमी द्रवणांक  मिश्रधातूचा वापर करून ग्रेन बाउंड्री डिफ्यूजन प्रक्रियेद्वारे (जीबीडीपी ) Nd-Fe-B मेल्ट-स्पन रिबन असलेल्या निओबियमची (Nb)   शक्ती वाढवली आहे जी "अचुंबकीय" घटकासाठी स्त्रोत म्हणून कार्य करते. एनबीच्या (Nb) अवक्षेपणामुळे, त्यांनी ग्रेन बाउंडरी डिफ्यूजन दरम्यान चुंबकीय दाण्यांमध्ये प्रतिबंधीत वाढ नोंदवली आहे, जी चुंबकीय  कणांवर तांबे (सीयू) धातूचे संवर्धन सुलभ करते आणि एनडी-एफई-बी (Nd-Fe-B ) पावडरच्या विचुंबकीकरणास वाढीव प्रतिरोध करण्यास मदत करते. मटेरिअल्स रिसर्च लेटरमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात,प्राप्त झालेल्या वाहन अनुप्रयोगांसाठी  150oC वर 1 T चे शक्तीचे मूल्य इलेकट्रीक वाहन अनुप्रयोगांसाठी डिस्प्रोशिअम (डीवाय) धातूशिवाय चुंबक विकसित करण्यासाठी उपयुक्त धोरण ठरेल ज्यामुळे आयात बरीच कमी होईल.

***

S.Thakur/S.Chavan/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1885336) Visitor Counter : 171