निती आयोग
मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स निर्मितीसाठीच्या पीएलआय योजनेसाठी अधिकारप्राप्त समितीने फॉक्सकॉन इंडिया आणि पॅजेट इलेक्ट्रॉनिक्सला प्रोत्साहन मंजूर केले
Posted On:
20 DEC 2022 10:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 डिसेंबर 2022
पंतप्रधानांनी मांडलेली उत्पादन संलग्न योजना 14 क्षेत्रांचे सामर्थ्य, त्यांची उत्पादन क्षमता आणि जागतिक स्तरावर अव्वल बनण्याची मोहीम यावर आधारित आहे. आज आणखी एक मैलाचा टप्पा पार करत, नीति आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील अधिकारप्राप्त समितीने मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक्स निर्मितीसाठीच्या पीएलआय योजनेसाठी उत्पादन-संलग्न प्रोत्साहन योजनेंतर्गत मोबाइल निर्मितीसाठी दोन कंपन्या- एक देशांतर्गत कंपनी आणि दुसरी जागतिक कंपनीला प्रोत्साहन मंजूर केले.
मे. फॉक्सकॉन होन हाय टेक्नोलॉजी इंडिया मेगा डेव्हलपमेंट प्रा. लि. ही पहिली जागतिक कंपनी आहे, जिला वाढीव गुंतवणुक आणि विक्रीच्या आधारे 1 ऑगस्ट 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीसाठी मोबाइल निर्मितीसाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी 'मोबाईल फोन' (श्रेणी: इनव्हॉइस मूल्य 15,000 रुपये आणि त्याहून अधिक) अंतर्गत मंजुरी मिळाली आहे. विक्रीचे आकडे आणि वाढीव गुंतवणुकीवर आधारित मंजूर झालेली प्रोत्साहन रक्कम 357.17 कोटी रुपये आहे.
मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक्स निर्मिती क्षेत्रासाठीच्या उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेने फॉक्सकॉन, सॅमसंग, पेगाट्रॉन, रायझिंग स्टार आणि विस्ट्रॉन या प्रमुख जागतिक कंपन्यांना आकर्षित केले आहे, तर लावा, मायक्रोमॅक्स, ऑप्टिमस, युनायटेड टेलिलिंक्स निओलिंक्स आणि पॅजेट इलेक्ट्रॉनिक्स या देशांतर्गत प्रमुख कंपन्यांही यात सहभागी झाल्या आहेत.
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1885265)
Visitor Counter : 225